‘लष्करे’चा कमांडर दार चकमकीत ठार

दक्षिण काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश
security forces South Kashmir
security forces South Kashmirsakal

अनंतनाग : दक्षिण काश्मीरमध्ये आज सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये दोन ठिकाणी चकमकी झाल्या, यामध्ये लष्करे तैय्यबाचा कमांडर निसार अहमद दार ठार झाला असून अन्य दोन जवानही जखमी झाले आहेत. अनंतनाग जिल्ह्यात बिजबेहराच्या सिरहामा भागामध्ये ही चकमक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या भागामध्ये काही दहशतवादी दबा धरून बसले असल्याची माहिती गुप्तचरांकडून आधीच सुरक्षा यंत्रणेला प्राप्त झाली होती त्यानंतर या भागामध्ये तपास मोहीम राबविण्यास सुरूवात करण्यात आली होती. आज सकाळी दोन्ही गट समोरासमोर आले असता जोरदार चकमक झाली.

कुलगामध्ये उशिरापर्यंतच चकमक सुरूच होती असे काश्मीर विभागाचे पोलिस महानिरीक्षक विजयकुमार यांनी पत्रकारांना सांगितले. या चकमकीमध्ये दोन जवान जखमी झाले आहेत. रोहित यादव आणि अंकेश कुमार अशी त्यांची नावे असून सध्या त्यांच्यावर येथील सरकारी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. अनंतनागमधील चकमकीच्या पार्श्वभूमीवर तेथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. साधारपणे दोन्ही ठिकाणांवर लष्कराने पहाटेच शोध मोहीम सुरू केली होती त्यामुळे अनेक दहशतवादी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. आजच्या चकमकीमध्ये ठार झालेला ‘लष्करे तैय्यबा’चा कमांडर निसार अहमद दार याचा अनेक कारवायांमध्ये समावेश होता. मागील वर्ष भरात त्याने काश्मीर खोऱ्यामध्ये असंख्य हल्ले केले होते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com