Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

काँग्रेस पक्षाने काल (शनिवार) रात्री उशिरा उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live Update Esakal

कंगना रणौत निवडणुकीच्या रिंगणात

भाजपने अभिनेत्री कंगना रणौत हिलादेखील उमेदवारी जाहीर केली आहे. हिमाचल प्रदेशच्या मंडीमधून कंगनाला लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे.

लोकसभेसाठी भाजपकडून पाचवी यादी जाहीर

नवीन जिंदल यांचा काँग्रेसला रामराम

कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार नवीन जिंदल यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. जिंदल हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जातंय.

मनसे लोकसभा निवडणूक लढवणार नाही- सूत्र

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भाजपसोबत बोलणी सुरु असली तरी प्रत्यक्षात मनसे पक्ष लोकसभेची निवडणूक लढवणार नसल्याची माहिती येत आहे. 'साम टीव्ही'ने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमबाहेर चाहत्यांनी तुफान गर्दी

गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील IPL सामन्यापूर्वी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमबाहेर चाहत्यांनी तुफान गर्दी केली आहे. वृत्तसंस्था पीटीआयने या गर्दीचा व्हिडीओ शेअर केला आहे.

काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या शिवसेनेत

उमरेड मतदारसंघाचे काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. ते आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. पारवे यांना रामटेक लोकसभेसाठी शिवसेनेची उमेदवारी मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे.

जानकरांची दिलजमाई

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी महायुतीमध्ये कायम राहण्याचा निर्णय घेतला.

पुण्यात अमोल कोल्हेंच्या उपस्थितीत महागाईच्या होळीचं दहन

पुण्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून महागाईच्या होळीचं दहन करण्यात आले. पक्षाचे नेते अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत ही होळी करण्यात आली. यावेळी अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

केजरीवालांच्या अटकेविरोधात आपचं दिल्लीत आंदोलन

दिल्लीच्या मंत्री अतिशी यांच्या नेतृत्वाखाली आप कार्यकर्त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात नवी दिल्लीच्या गोविंदपुरी परिसरात निदर्शने.

मुखमंत्र्यांच्या वर्षा निवसस्थानावर महायुतीची बैठक सुरू; जागावाटपाचा तिढा आजच सुटणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानावर सध्या महायुतीची बैठक सुरू असून आज जागावाटपाच्या मुद्द्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. महादेव जानकर देखील या महायुतीच्या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे.

दिल्लीत चार वर्षीय मुलीवर अत्याचार ; संतप्त जमावाकडून गाड्यांची तोडफोड

दिल्ली: एका 4 वर्षीय मुलीवर तिच्या ट्युशन सेंटरमध्ये एका व्यक्तीने अत्याचार केल्याच्या आरोपानंतर पांडव नगर परिसरात लोकांनी निषेध केला आणि गाड्यांची तोडफोड केली.

सिंगापूरचे राष्ट्रपती  थर्मन षण्मुगरत्नम जोधपूरमध्ये दाखल

सिंगापूरचे राष्ट्रपती थर्मन षण्मुगरत्नम हे जोधपूरमध्ये दाखल झाले आहेत.

 केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी 'स्वातंत्र वीर सावरकर' या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला लावली हजेरी 

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी 'स्वातंत्र वीर सावरकर' या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली. यावेळी पियुष गोयल म्हणाले, "भारतात 'क्रांतीवीर सावरकर' यांच्याविषयी कोणाचाही गैरसमज नाही. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतासाठी दिले. वीर सावरकरांच्या बलिदानाचा अभिमान सर्व देशभक्तांना वाटतो."

उन्हाचा तडाखा वाढताच लिंबाच्या दरात वाढ

Increase in Lemon Price: अद्रकाच्या पाठोपाठ आता लिंबाची होणारी आवक घटल्याने आणि उन्हाळ्याच्या तोंडावरच किरकोळ बाजारात एक लिंबासाठी दहा रुपये मोजावे लागत आहे. ठोक बाजारात १०० लिंबासाठी ४०० ते ५०० रुपये द्यावे लागत आहे. लिंबाची दररोज दीड ते दोन हजार गोण्यांची आवक होत आहे.

दिल्लीमध्ये एका कारखान्याला लागली भीषण आग 

दिल्लीमध्ये नरेला भागात एका कारखान्याला आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी हजर झाल्या आहेत. आग विझवण्याचे काम जोमात सुरु आहे.

साताऱ्यातून उदयनराजेंना उमेदवारी निश्चित?

साताऱ्यातून उदयनराजेंना उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

१२ वाजून १२ मिनिटांनी अपक्ष फॉर्म भरणार- विजय शिवतारे

विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा अपक्ष लढवण्याबाबत मोठी घोषणा केली आहे. १२ वाजून १२ मिनिटांनी अपक्ष फॉर्म भरणार, असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर गंभीर आरोप केले आहेत.

आमदार दत्ता भरणेंनी घेतली विजय शिवतारेंची भेट

आमदार दत्ता भरणेंनी विजय शिवतारे यांची भेट घेतली. विजय शिवतारे बारामती लोकसभा निडणूक लढवण्यावर ठाम आहेत.

पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर दाखल

पंकजा मुंडे परळीतील गोपीनाथ गडावर दाखल झाल्या आहेत. यावेळी आमदार धनंजय मुंडेही उपस्थित आहेत.

विरोधकांना माझ्या नावाची भिती- रश्मी बर्वे

विरोधकांना माझ्या नावाची भिती वाटते, त्यामुळे जात प्रमाणपत्रावर प्रश्न केले जात आहेत, असं रश्मी बर्वे यांच्याकडून सांगण्यात आलं. रश्मी बर्वे यांना काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

चंद्रपूरची जागेसाठी हायकमांड सावध पाऊल टाकत आहे- विजय वडेट्टीवार

चंद्रपूर लोकसभेची जागा जिंकण्यासाठी हायकमांड सावध पाऊल टाकत आहे, असं विजय वडेट्टीवार यांच्याकडून सांगण्यात आलं. गडकरींच्या विरोधात आम्ही तगडा उमेदवार दिलाय, असंही ते म्हणाले.

पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर जाणार

पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच गोपीनाथ गडावर जाणार आहे.

Mumbai Crime: पोलिस अधिकाऱ्याचाच मुलगा चालवत होता देह व्यापाराचा धंदा; वाचा काय आहे प्रकरण?

Mumbai Crime: सेक्स रॅकेटप्रकरणी मुंबई पोलिस दलातील अधिकाऱ्याच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. अश्‍विन कदम असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी या कारवाईत कृतिका लाड (वय ३१) या महिलेलाही अटक केली असून तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.

Holi News: दारू पिऊन वाहने चालविल्यास जेलची हवा

Nagpur: होळी आणि धूलिवंदनाच्या दिवशी शहरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली असून नाकेबंदीही करण्यात आली आहे. त्यासाठी विविध ३९ फिक्स पॉईन्ट लावण्यात येणार आहे. याशिवाय दारू पिऊन गाडी चालवताना आढळल्यास पोलिस स्टेशनच्या लॉकअपमध्येच होळी साजरी करावी लागणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली. शह

लोकसभा निवडणुकीमुळे सीईटी सेलने परीक्षांच्या वेळापत्रकात केला बदल

१५ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान होणार होत्या विविध विभागाच्या परीक्षा होत्या. आता बदल करत २ मे ते २९ मे च्या दरम्यान होणार आहे. नवीन सुधारित वेळापत्रक सीईटी सेलने संकेतस्थळावर उपलब्ध केलं आहे. पीसीबी गटाची परीक्षा ही २२ ते ३० एप्रिल दरम्यान पार पडणार आहे.

पुण्यात राजकीय घडामोडींना वेग, आमदार रवींद्र धंगेकर शरद पवारांच्या भेटीला

पुणे लोकसभा निवडणुकीकरिता महाविकास आघाडीकडून आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर होताच रवींद्र धंगेकर यांनी निवडणुकीची रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. रविवारी पहाटे आमदार रवींद्र शरद पवार यांच्या भेटीसाठी मोदी बागेत दाखल झाले आहेत.त्यांच्यासोबत मोहन जोशी आणि इतर काँग्रेस चे पदाधिकारी देखील आहेत. पुणे लोकसभा उमेदवारी मिळाल्यानंतर पहिल्यांदा धंगेकर शरद पवार यांच्या भेटीला आले आहेत.

Kadegaon MIDC : युरियाचा ३७ लाखांचा साठा जप्त, कडेगाव एमआयडीसीत कृषी विभागाची  कारवाई

कडेगाव : कडेगाव औद्योगिक वसाहतीत कृषी विभागाने केलेल्या कारवाईत ३७ लाख ८९ हजार ७७९ रुपयांचा सुमारे २१० टन बेकायदेशीर युरिया खताचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी कडेगाव पंचायत समितीचे कृषी अधिकारी राहुल सुकुमार बिरनाळे यांनी फिर्याद दिली असून, गोदाम व्यवस्थापक शंकर जगन्नाथ काळे (वय ५३, रा. आटके, ता. कऱ्हाड) याच्याविरुद्ध कडेगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

Local Railway : मुंबईत लोकल सेवेचा आज आणि उद्या मेगा ब्लॉग!

मुंबईत लोकल सेवेचा आज आणि उद्या मेगा ब्लॉग घेण्यात येणार आहे. या दरम्यान देखभाल, दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्याती माहिती आहे. 

सीपीआय (एम) पक्षाकडून राज्यातील चार प्रमुख मतदारसंघांसाठी उमेदवारांची घोषणा

कोलकाता (पश्चिम बंगाल) : पश्चिम बंगाल सीपीआय (एम) पक्षाने शनिवारी राज्यातील चार प्रमुख मतदारसंघांसाठी उमेदवारांची घोषणा केली. सीपीआय (एम) चे राज्य सचिव मोहम्मद सलीम यांना मुर्शिदाबाद मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. राणाघाट मतदारसंघात अल्केश दास हे माकपचे उमेदवार आहेत. वर्धमान-दुर्गापूर मतदारसंघासाठी माकपने सुकृती घोष यांना उमेदवारी दिली आहे.

Papua New Guinea Earthquake : पापुआ न्यू गिनीमध्ये ६.९ तीव्रतेचा भूकंप

पोर्ट मोरेस्बी : आज पहाटे (स्थानिक वेळेनुसार) उत्तर पापुआ न्यू गिनीच्या दुर्गम भागात 6.9 तीव्रतेचा भूकंप झाला, अशी माहिती युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हे (USGS) ने दिली आहे. भूकंपाची खोली 35 किमी इतकी मोजली गेली असून भूकंपाचे केंद्र अंबुंती या छोट्या वस्तीपासून 32 किमी पूर्व-उत्तर-पूर्वेस होते.

वाराणसीतून अजय राय यांचा थेट पंतप्रधान मोदींशी सामना

नवी दिल्ली : काँग्रेसने शनिवारी लोकसभा निवडणुकीसाठी 46 उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. यामध्ये पक्षाच्या उत्तर प्रदेश युनिटचे अध्यक्ष अजय राय आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांची प्रमुख नावे आहेत. अजय राय यांना वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली आहे, तर दिग्विजय सिंह यांना मध्य प्रदेशातील राजगडमधून तिकीट देण्यात आले आहे.

Liquor Policy Case : बीआरएस नेत्या कविता यांच्या ED कोठडीत 26 मार्चपर्यंत वाढ

नवी दिल्ली : दिल्लीतील मद्य धोरण गैरव्यवहारप्रकरणी विशेष न्यायालयाने भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) नेत्या के. कविता यांच्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कोठडीमध्ये २६ मार्चपर्यंत वाढ केली आहे.

Mahayuti : 'महायुती'चा तिढा आज सुटणार - देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली : महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा उद्यापर्यंत (ता. २४) सुटलेला असेल, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपचे काही जागांचे उमेदवार आज जाहीर होऊ शकतात. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या (सीईसी) बैठकीसाठी उपमुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत आले आहेत.

Prakash Ambedkar : 'वंचित'चा 'मविआ'ला 26 मार्चपर्यंत अल्टिमेटम

मुंबई : महाविकास आघाडीसोबत जागा वाटपाच्या चर्चेला अंत दिसत नसल्याने अखेरीस लोकसभा निवडणुकीला आघाडीसोबत सामोरे जायचे की स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची याबाबतचा निर्णय २६ मार्चपर्यंत घेतला जाणार असल्याचे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी करत ‘मविआ’ला तीन दिवसांची मुदत दिली आहे.

Loksabha Election : रात्री उशिरा काँग्रेसची चौथी यादी जाहीर

Latest Marathi News Live Update : काँग्रेस पक्षाने काल (शनिवार) रात्री उशिरा उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली असून, त्यात विदर्भातील चार जागांचा समावेश आहे. महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा उद्यापर्यंत (ता.२४) सुटलेला असेल, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला. महाराष्ट्रातील भाजपचे काही जागांचे उमेदवारही आज जाहीर होऊ शकतात. तसेच सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळावी, यासाठी खासदार उदयनराजे भोसले गेली तीन दिवस दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. आज रात्री उशिरा दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीने २६ मार्चपर्यंत ‘मविआ’ला अल्टिमेटम दिला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरुन देशात ठिकठिकाणी आपकडून आंदोलन सुरु आहे. मॉस्कोतील क्रोकस सिटी हॉल या सभागृहात हल्लेखोरांनी शुक्रवारी रात्री प्रवेश करून नागरिकांवर बेछूट गोळीबार केला. यात ११५ जण ठार झाले असून १०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. कोल्हापुरात 'वंचित'च्या प्रकाश आंबेडकरांनी शाहू महाराजांना पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच देशातील विविध राज्यांत वातावरणात बदल जाणवत असून काही ठिकाणी पाऊस पडत आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com