Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

"या घटनांवरून पंतप्रधान मोदी आणि भाजपची मानसिकता महिलाविरोधी आणि दलितविरोधी असल्याचे दिसून येते."
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live Update Esakal

ममता बॅनर्जी तातडीने जलपाईगुडीला रवाना

परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि चक्रीवादळामुळे प्रभावित लोकांना भेटण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तातडीने जलपाईगुडीला रवाना झाल्या आहेत.

संदीपान भूमरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मंत्री संदीपान भूमरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत.

"पंतप्रधान मोदींची मानसिकता महिलाविरोधी"

"देशाच्या महामहिम राष्ट्रपती उभ्या आहेत आणि पंतप्रधान मोदी बसले आहेत. पुन्हा एकदा पीएम मोदींनी आदिवासी महिला राष्ट्रपतींचा जाणीवपूर्वक अपमान केला आहे. असे करण्याची ही पहिली वेळ नाही. जेव्हा नवीन संसदेचे उद्घाटन झाले तेव्हा आणि राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमातही राष्ट्रपतींना निमंत्रित केले गेले नाही. या घटनांवरून पंतप्रधान मोदी आणि भाजपची मानसिकता महिलाविरोधी आणि दलितविरोधी असल्याचे दिसून येते," असे ट्विट करत काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.

पश्चिम बंगालमध्ये अवकाळी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट केले आहे की "आज दुपारी अचानक मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी-मैनागुरीच्या काही भागात आपत्ती ओढवली, त्यात मानवी जीवितहानी, दुखापत, घरांचे नुकसान, झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडले. बाधित लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. जिल्हा प्रशासन यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना आणि जखमींना नियमानुसार नुकसान भरपाई देईल."

गुवाहटीत पाऊस

आसाममधी गुवाहटीत अनेक भागांमध्ये रविवारी मुसळधार पाऊस झाला.

"भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देत आहोत"

"मी भ्रष्टाचाराच्या विरोधात कारवाई करत आहे, आणि त्यामुळे काही लोकांचा संयम सुटला आहे. मोदींचा मंत्र 'भ्रष्टाचार हटाव' आहे, पण विरोधक म्हणतात 'भ्रष्टाचाऱ्यांना वाचवा'. या निवडणुकांमध्ये दोन गट लढत आहेत. एकीकडे भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई करणारा एक गट आहे, तर दुसरीकडे भ्रष्टाचाराला वाचवणारे गट आहेत. त्यांनी INDI आघाडी केली आहे, आणि त्यांना वाटते की यामुळे मोदी घाबरतील. माझा देश, माझे कुटुंब आणि मी भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देत आहोत. त्यामुळेच आता अनेक भ्रष्ट लोक तुरुंगात आहेत. या लोकांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीनही मिळत नाही," असे पंतप्रधान मोदी उत्तर प्रदेशच्या मेरठमधील सभेत म्हणाले.

"राम लल्लाने देखील होळी खेळली"

एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "गेल्या 10 वर्षात अनेक अशक्य वाटणारे टप्पे गाठले गेले आहेत. अयोध्येत भव्य राम मंदिर हे अशक्य वाटले होते, पण आता ते वास्तव झाले आहे आणि लाखो लोक रोज तिथे भेट देतात. यंदा, अवधमध्ये एक भव्य होळी साजरी झाली आणि राम लल्लाने देखील होळी खेळली."

लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून माजी मुख्यमंत्र्यांच्या बसची तपासणी

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा तपासणीचा भाग म्हणून तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या बसची पोलिसांनी तपासणी केली. सूर्यापेट येथील इदुला पारे थांडा चेकपोस्टवर ही तपासणी करण्यात आली. या तपासणीचा व्हिडीओ समोर आला आहे.

आमदार अन् भाजपचे माजी नेते सुकांता नायक बीजेडीमध्ये सामील

ओडिशा: निलागिरीचे आमदार आणि भाजपचे माजी नेते सुकांता नायक भुवनेश्वर येथे बीजेडीमध्ये सामील झाले.

दिल्लीत इंडिया आघाडीच्या नेत्यांचं जोरदार शक्तीप्रदर्शन

दिल्लीतील रामलीला मैदानावर 'लोकतंत्र बचाओ' रॅलीच्या समारोपानंतर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी एकत्र फोटो घेतला. यावेळी लोकसभा निवडणुकीपूर्वी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा अन् विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस 30 -40 किमी प्रतितास वेगाने येण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने याबद्दलचा अंदाज व्यक्त केला आहेत

लोकसभा निवडणुकीत PM मोदी मॅच फिक्सिंग करण्याचा प्रयत्न करतायत - राहुल गांधी

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी मॅच फिक्सिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप दिल्लीतील इंडिया आघाडीच्या रॅलीत राहुल गांधी यांनी केला. ज्या दिवशी मॅच फिक्सिंग यशस्वी होईल तेव्हा संविधान संपेल आणि ज्या दिवशी संविधान संपेल तेव्हा देशही राहाणार नाही, असेही राहुल गांधी म्हणाले.


खैरे-दानवेंमधील वाद मिटला

छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात वाद होता. दानवेंनी खैरेंची भेट घेत निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.

दोघे मिळून काम करुन, तिसरा नको- अंबादास दानवे

अंबादास दाने आणि चंद्रकांत खैरे यांच्यात छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरुन वाद निर्माण झाला होता. त्यानंतर दानवेंनी खैरेंची भेट घेतली. यावेळी ते म्हणाले आम्ही दोघे मिळून काम करु, दोघात तिसरा नको.

अरविंद केजरीवाल करोडो लोकांच्या हृदयात बसले- सुनीता केजरीवाल

रामलीला मैदानावरील सभेत सुनीता केजरीवाल यांच्याकडून अरविंद केजरीवाल यांच्या पत्राचं वाचन करण्यात आलं. यावेळी त्या म्हणाल्या की अरविंद केजरीवाल करोडो लोकांच्या हृदयात बसले आहे.

भाजपनं भ्रष्टाचाऱ्यांना वॉशिंग मशीनमध्ये टाकून साफ केलं-उद्धव ठाकरे

रामलीला मैदानावरील सभेत उद्धव ठाकरेंनी भाजपवर घणाघात केला. भाजपनं भ्रष्टाचाऱ्यांना वॉशिंग मशीनमधून टाकून साफ केलं, असा आरोपही ठाकरेंकडून लावण्यात आला.

रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची सभा, केजरीवालांच्या अटकेविरोधात विरोधी पक्ष एकत्र

दिल्लीच्या रामलीला मैदानावर इंडिया आघाडीचे नेते एकत्र आले आहेत. ईडीकडून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात २८ विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. या सभेला शरद पवार यांनीही हजेरी लावली आहे.

लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान

लालकृष्ण अडवाणी यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

ठाणे आणि कल्याण मतदारसंघ शिंदेंकडेच राहणार

ठाणे आणि कल्याण मतदारसंघ शिंदेंकडेच राहणार असल्याची चर्चा शिंदे आणि फडणवीस यांच्यात झाली असे म्हटले जात आहे.

अंबादास दानवेंनी घेतली चंद्रकांत खैरेंची भेट

संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंनी चंद्रकांत खैरेंची त्यांच्या निवास्थानी भेट घेतली

Jalgaon Lok Sabha Constituency : करण पवार यांची उमेदवारी निश्‍चीत?

जळगाव लोकसभा मतदार संघ शिवसेना ठाकरे गटाकडे आहे. या मतदार संघातून सध्या भाजपत असलेले पारोळा येथील माजी नगराध्यक्ष करण पवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

Maharashtra Weather Update: राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

राज्याच्या अनेक भागात कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या काही भागात गेल्या दोन दिवसांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

Uddhav Thackeray: देशात हुकुमशाही आल्यातच जमा; उध्दव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

देशात हुकुमशाही आल्यातच जमा आहे अशी टिका उध्दव ठाकरेंनी भाजपवर केली आहे.

Bhagwat Karad : भागवत कराड अजित पवारांच्या भेटीला

भाजप नेते भागवत कराड हे राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार यांच्या भेटीला गेले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, भागवत कराड हे छंत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेसाठी इच्छुक आहेत.

blindfold protest at the Ramlila Maidan: रामलिला मैदानावर काँग्रेस कार्यकर्त्यांचे डोळ्यावर काळी पट्टी बांधून आंदोलन

रामलिला मैदानावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी डोळ्यावर काळी पट्टी बांधून आंदोलन सुरु केले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ इंडिया आघाडीचे २८ पक्ष दिल्लीमध्ये एकत्र आले आहेत.

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे थोड्याच वेळात घेणार पत्रकार परिषद

उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे आज पत्रकार परिषद घेणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेप्रकरणी आज इंडिया आघाडीचे नेते एकत्र येणार आहेत. या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद असणार आहे.

PM Modi in Mumbai : पंतप्रधान मोदी सोमवारी मुंबई दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या मुंबई दौऱ्यावर आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत.

PM Modi: पंतप्रधान मोदी आज करणार प्रचाराचा शुभारंभ, मेरठमध्ये सभा

पंतप्रधान मोदी आजपासून प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. ते उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये प्रचारसभा घेतील. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने प्रचाराचा धडाका लावला आहे.

CM अरविंद केजरीवालांच्या अटकेविरोधात नवी दिल्लीत विरोधकांची आज रॅली

राजधानी दिल्लीत आज सगळे विरोधक एकवटणार आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात रामलीला मैदानावर रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. सकाळी 11 वाजता ही रॅली होणार आहे. यामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, लालू प्रसाद यादव, ममता बॅनर्जी, फारुख अब्दुल्ला, एम के स्टॅलिन, अखिलेश यादव सहभागी होणार असल्याची माहिती आहे.

Central Railway : आज मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक

आज मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्यावतीने आज रविवारी 31 मार्च  रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक घेणार आहे. या मेगाब्लॉकमुळे काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. या कालावधीत लोकल ट्रेन विलंबाने धावतील.

भिवंडी परिसरात भंगाराच्या गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

भिवंडी परिसरात एका भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे.

Weather Update : राज्यासह देशात आज पावसाची हजेरी; हवामान विभागाचा अंदाज

मुंबई : राज्यासह देशात आज पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, वेस्टर्न डिर्स्टबन्समुळे हवामानावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे देशात विविध ठिकाणी पावसाची शक्यता आहे. उत्तर भारतात तापमानाचा पारा वाढला आहे. तर, महाराष्ट्रासह मध्य प्रदेशात पावसाची शक्यता आहे. यासोबतच अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्येही पावसाची रिमझिम पाहायला मिळत आहे.

India Alliance : सातारा लोकसभेसाठी कऱ्हाडात आज इंडिया आघाडीचा मेळावा

कऱ्हाड : सातारा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीतील मित्र पक्षांचा संवाद मेळावा आज दुपारी चार वाजता येथील हॉटेल पंकज मल्टीपर्पज हॉलमध्ये आयोजित केला आहे. या संवाद मेळाव्यासाठी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शंकरराव गोडसे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष हर्षद कदम, शेतकरी कामगार पक्षाचे अॅड. रविंद्र पवार आदी पक्षांच्या नेत्यांसह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहतील.

Kolhapur Airport : कोल्हापूर-तिरुपती विमानसेवा आजपासून

शाहू नाका : कोल्हापूर विमानतळ येथून आज, रविवार (ता. ३१) पासून कोल्हापूर-तिरुपती ही विमानसेवा सुरू होत आहे. ही विमानसेवा पुन्हा एकदा सुरू होत असल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.

लोकसभा निवडणुकीत मराठा समाज अपक्ष उमेदवार देणार नाही - मनोज जरांगे

Latest Marathi News Live Update : बारामती मतदारसंघात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार’ गटाकडून सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) सुनेत्रा पवार यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या या मतदारसंघात ‘सुप्रियाताई विरुद्ध सुनेत्रावहिनी’ अशी लढत पाहायला मिळणार आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत मराठा समाज अपक्ष उमेदवार देणार नाही. शिवाय मी कुणालाही पाठिंबा देणार नाही. कुणाचाही प्रचार करणार नाही, ’’ अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत झालेल्या बैठकीत केली. येत्या दोन दिवसांत भाजपची आठवी यादी, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाची दुसरी यादी जाहीर होणार असल्याचे सांगितले जात आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सर्वोच्च नागरी ‘भारतरत्न सन्माना’चे काल राष्ट्रपती भवनातील शानदार सोहळ्यात वितरण झाले. कोल्हापूर विमानतळ येथून आजपासून कोल्हापूर-तिरुपती ही विमानसेवा सुरू होत आहे. सातारा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीतील मित्र पक्षांचा संवाद मेळावा आज दुपारी चार वाजता कराडात आयोजित केला आहे. तसेच देशातील विविध राज्यांत वातावरणात बदल जाणवत असून काही ठिकाणी पाऊस पडत आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com