Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

कुलविंदरजीत सिंग उर्फ खानपुरिया 1990 मध्ये कॅनॉट प्लेस येथे बॉम्बस्फोट आणि दिल्लीतील लाल किल्ल्यावर ग्रेनेड हल्ला यासह अनेक दहशतवादी प्रकरणांमध्ये सामील होता.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live Update Esakal

बैठकीत प्रचाराच्या मुद्द्यांवर चर्चा- पृथ्वीराज चव्हाण

महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आज महाविकास आघाडीतील तिनही पक्षांची बैठक झाली. या बैठकीमध्ये प्रचाराच्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे.

बच्चू कडूंची उद्या निर्णायक पत्रकार परिषद

अमरावती लोकसभा मतदारसंघाबाबत बच्चू कडू उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत. ते उद्या स्वतंत्र उमेदवार जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जातेय.

रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद

जात पडताळणी प्रमाणपत्र वैध नसल्याचं कारण देत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद केला आहे.

रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य सूत्रधार अटकेत

बंगळूरु येथील रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला एनआयएने अटक केली आहे.

NIA च्या विशेष न्यायालयाकडून 4 दहशतवाद्यांना जन्मठेप

NIA च्या विशेष न्यायालयाने, प्रतिबंधित बब्बर खालसा आंतरराष्ट्रीय (BKI) संघटनेशी संबंधित चार दहशतवाद्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाने दोषी ठरवलेल्या आणि शिक्षा सुनावलेल्या दहशतवाद्यांमध्ये मुख्य सूत्रधार कुलविंदरजीत सिंग उर्फ खानपुरिया याचा समावेश आहे. तो 1990 मध्ये कॅनॉट प्लेस येथे बॉम्बस्फोट आणि दिल्लीतील लाल किल्ल्यावर ग्रेनेड हल्ला यासह अनेक दहशतवादी प्रकरणांमध्ये सामील होता.

रशियन सैन्यातून भारतीयांची सुटका करण्यासाठी सरकार प्रयत्नशील

परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, भारतीय नागरिकांची रशियन सैन्यातून लवकरात लवकर सुटका करण्यासाठी सरकार सतत रशियन अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे.

शिवसेनेची पहिली यादी जाहीर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसनेची लोकसभा निवडणुकीसाठी 8 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

"...हीच काँग्रेसची संस्कृती"

"दुसऱ्यांना मारणे आणि धमकावणे ही काँग्रेस संस्कृती आहे," अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

नुकतेच देशातील 600 वकिलांनी सरन्यायाधीश D Y चंद्रचूड यांना पत्र लिहून देशातील न्यायपालिकेबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी हे वक्तव्य केले.

नवनीत राणांविरोधात अभिजीत अडसूल अपक्ष लढणार

नवनीत राणा यांना आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांचं तगडं आव्हान असणार आहे. राणांविरोधात आपण अपक्ष लढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. अडसळू सध्या शिंदेंच्या शिवसेनेत कार्यरत आहेत.

महायुतीत मनसेची गरज नाही - रामदास आठवले

महायुतीत मनसेची गरज नाही, अशी भूमिका केंद्रीय मंत्री आणि रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी मांडली आहे. ते पुढे म्हणाले, इथं महायुतीत आम्हालाच काही मिळत नाही तर मनसेला काय मिळणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

अरविंद केजरीवाल यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरुन राजीनामा द्यावा - गौरव भाटीया

हे राजकीय षडयंत्र, जनताच उत्तर देईल - अरविंद केजरीवाल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, "हे राजकीय षडयंत्र आहे, जनताच याचे उत्तर देईल."

दिल्ली न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांची ईडी कोठडी १ एप्रिलपर्यंत वाढवली आहे.

दररोज ३५० युनिट्सची वीज निर्मिती, आदित्य ब्रिझ पार्कचा नवा आदर्श

बालेवाडीतील सोसायट्यांनी "ग्रीन ईनिशिएटिव " व "ग्रीन बालेवाडी" ( हरित बालेवाडी) साठी पुढाकार घ्यायला सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून आदित्य ब्रिझ पार्क सोसायटीत ७५ किलो वॅट चा सौर ऊर्जा प्रकल्प नुकताच सुरू करण्यात आला. या प्रकल्पाचे उद्घाटन महाऊर्जाचे अतिरिक्त महासंचालक पंकज तगलपल्लेवार यांचे हस्ते झाले.

पद्म पुरस्कार विजेते डॉ दमयंती बेसरा यांचा भाजपात प्रवेश

पद्म पुरस्कार विजेते डॉ दमयंती बेसरा आणि बीजेडीचे माजी नेते सिद्धांत महापात्रा यांनी दिल्लीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला

डॉ. अर्चना पाटील चाकूरकर या भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा

डॉ. अर्चना पाटील चाकूरकर या भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अर्चना पाटील चाकूरकर या माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई आहेत. अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ आता लातूरमधून देखील अर्चना पाटील चाकूरकर या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

पुण्यात कसब्याच्या जागेसाठी महाविकासआघाडीच धुसफूस

मविआच्या बैठकीत ठाकरे गटाकडून विधानसभेसाठी कसब्याच्या जागेची मागणी करण्यात आली आहे.

मुंबई विमानतळावरुन ३.५२ कोटींचं सोनं जप्त

मुंबई विमानतळावरुन ३.५२ कोटी रुपयांचं सोनं जप्त करण्यात आलं आहे.

रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द

काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांना रामटेकच्या जागेसाठी उमेदवारी जाहीर कऱण्यात आली होती. त्यांचं जातवैधता प्रमाणपत्र आता रद्द कऱण्यात आलं आहे.

खासदार धैर्यशील मानेंना महायुतीकडून पुन्हा उमेदवारी निश्चित, आज घोषणेची शक्यता

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून राहुल आवाडे मैदानात उतरण्याची शक्यता आहे. तर, खासदार धैर्यशील माने यांना महायुतीकडून पुन्हा उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती आहे. आज सायंकाळी याबाबत घोषणेची शक्यता आहे.

वाट्याला गेलात तर घरात घुसून...सुनील केदारांचा थेट इशारा

वाट्याला गेलात तर घरात घुसून हाल करेल, असा थेट इशारा काँग्रेस आमदार सुनील केदार यांनी दिला आहे.

लोकांचा प्रतिसाद पाहता माझा विजय निश्चित- पंकजा मुंडे

पंकजा मुंडे यांना बीडमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली. माध्यमांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, "लोकांचा प्रतिसाद पाहता माझा विजय निश्चित आहे."

ठाण्यात राजन विचारे यांचा प्रचार सुरु 

ठाण्यात राजन विचारे यांनी आपला प्रचार सुरु केला आहे. विचारे यांनी ठाकरे गटाकडून लोकसभेची उमेदवारी मिळली आहे.

सायन रेल्वे पूल वाहतुकीसाठी खुला

कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीमुळे मुंबईतील पर्यायी मार्गांवर वाहतूक कोंडी होत आहे. अशातच धोकादायक असलेल्या सायन रेल्वे उड्डाणपुलाचे पाडकाम करण्यात येणार आहे पण पुलाच्या उभारणीसाठी किमान दोन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याने निवडणुकीच्या काळात पूर्वनियोजित पाडकामाला रेल्वे प्रशासनाने चौथ्यांदा स्थगिती दिल्याने पूल वाहतुकीसाठी खुला राहणार आहे.

स्वतःचे वाहन पार्किंगमध्ये लावून दुचाकीची करायचे चोरी, २२ वाहने चोरणारी टोळी गजाआड

Nagpur Vehicle Theft: स्वतःचे वाहन पार्किंगमध्ये लावून बनावट चावीने दुसऱ्याचे वाहन चोरून नेत मध्यप्रदेशात विक्री करणाऱ्या तिघांना धंतोली पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून २२ वाहने जप्त केली.

Loksabha News: बहुजन समाज पार्टी कोकणातील लोकसभेच्या सर्व जागा लढावणार

बहुजन समाज पार्टीच्या वतीने ठाणे, भिवंडी कल्याण पालघर समवेत कोकण विभागातील सर्वच्या सर्व 12 लोकसभेच्या जागा लढावणार असल्याची माहिती बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव आणि मुंबई झोन प्रभारी डॉ. प्रशांत इंगळे यांनी दिली

Sanjay Raut: महाविकास आघाडीची आज दुपारी साडेचार वाजता बैठक

महाविकास आघाडीची आज दुपारी साडेचार वाजता बैठक होणार आहे. संजय राऊत यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. पुढील रणनीतीबाबत बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

Maharashtra News: राणा दाम्पत्य देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल

नवनीत राणा यांना भाजपकडून लोकसभेचं तिकीट मिळालं आहे. त्यानंतर राणा दाम्पत्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मुंबईमध्ये आले आहे.

Star campaigners: शिवसेनेकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, मोदी-शहा यांच्या नावाचा समावेश

शिंदेंच्या शिवसेनेकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी, अमित शाह, जेपी नड्डा यांच्या नावाचा देखील समावेश आहे.

Bacchu Kadu : भाजपचे एक-दोन खासदार निवडून आले नाहीत तर काही फरक पडत नाही- बच्चू कडू

नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी मिळाल्याने बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही नवनीत राणा यांना पाडणार. भाजपचे एक-दोन खासदार निवडून आले नाहीत तर काही फरक पडणार नाही, असं ते म्हणाले.

Vijay Shivtare: आज विजय शिवतारे पत्रकार परिषद घेऊन भूमिका करणार स्पष्ट

शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे आज पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी ते आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. काल, विजय शिवतारे यांनी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्यांची नाराजी दूर झाल्याचं बोललं जातं.

Eknath Shinde : शिंदे गटाची आठ जागांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता!

गेल्या काही दिवसांत राज्याच्या राजकारणाला ज्यांच्यामुळं अभूतपूर्व कलाटणी मिळाली, शिवसेनेत उभी फूट पडली, त्या शिंदेंच्या शिवसेनेकडून अद्याप एकही यादी जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, आज शिवसेना शिंदे गटाची आठ जागांची यादी जाहीर होऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे. 

Ganesamoorthy Passed Away : एमडीएमकेचे इरोडचे खासदार गणेशमूर्ती यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

एमडीएमकेचे इरोडचे खासदार गणेशमूर्ती यांचं आज पहाटे ५:०५ वाजता हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. 24 मार्च रोजी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, आज त्यांची प्राणज्योत मालवली.

महाराष्ट्र ATS चे प्रमुख सदानंद दाते यांची NIA च्या महासंचालकपदी नियुक्ती

नवी दिल्ली : महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख सदानंद दाते यांची राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यावेळी दाते यांनी अतुलनीय शौर्य दाखविले होते. या कामगिरीसाठी त्यांचा राष्ट्रपती पोलिस पदकाने गौरव करण्यात आला होता.

Earthquake In Afghanistan : अफगाणिस्तानमध्ये ४.२ तीव्रतेचा भूकंप; सध्या कोणतीही जीवितहानी नाही

अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. नॅशनल सिस्मॉलॉजी सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, नुकत्याच झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.2 इतकी मोजली गेलीये. स्थानिक वेळेनुसार पहाटे ५.४४ च्या सुमारास हा भूकंप झाला. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.

Cafe Bomb Blast Case : बंगळूरसह शिमोगा, हुबळी, चेन्नईत एनआयएचे छापे

बंगळूर : शहराला हादरवून सोडणाऱ्या व्हाईटफिल्डच्या रामेश्वरम कॅफे बाॅम्बस्फोटप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांनी बंगळूरसह राज्यातील चार शहरांमध्ये एकाचवेळी छापे टाकले. शिमोगा, बंगळूर, हुबळी, तीर्थहळ्ळी, चेन्नई येथे छापे टाकले. बाॅम्बस्फोटातील संशयित चेन्नईतील लॉजमध्ये अनेक दिवस राहिला होता. त्यामुळे एनआयएने चेन्नईतील तीन ठिकाणी छापे टाकून तपासणी केली.

PM मोदी, शहांसह फडणवीस 'स्टार प्रचारक'; भाजपकडून चाळीस जणांची यादी जाहीर

Latest Marathi News Live Update : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रासाठीची स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह ४० नावांचा या यादीत समावेश आहे. तसेच लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने अमरावती मतदारसंघातून नवनीत राणा यांना तिकीट देण्यात आले आहे. मद्यधोरण गैरव्यवहारप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळू शकला नाही. सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत अत्यंत वेगवान घडामोडी घडत आहेत. नवी मुंबईत सुरु असलेल्या पादुका सोहळ्याची काल सांगता झाली. तसेच देशातील विविध राज्यांत वातावरणात बदल जाणवत असून काही ठिकाणी पाऊस पडत आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com