Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना केंद्र सरकारने बहुचर्चित नागरिकत्व सुधारणा कायद्याची (सीएए) अधिसूचना जारी केलीये.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live Update Esakal

महापालिकेतील ‘बंडल’ प्रकरणात नोटा प्रकरणाची आणखी एक चौकशी समिती

पुणे महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्याच्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ५०० रुपयांचे बंडल सापडून एक आठवडा झाला. तरीही प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशीच सुरू आहे. पथ विभाग प्रमुखांनी अहवाल दिल्यानंतर आता अधिक्षक अभियंता साहेबराव दांडगे आणि जगदीश खानोरे या दोघांची चौकशी समिती गठित केली आहे. या समितीच्या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, संबंधित कनिष्ठ अभियंत्याला सात दिवस सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे, असे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

Tamil Nadu BJP President Annamalai: ड्रग्ज प्रकरणावरुन भाजपचे तमिळनाडूमध्ये आंदोलन

डीएमके सरकारविरोधात ड्रग्ज प्रकरणात भाजपने तमिळनाडूमध्ये आंदोलन केले आहे. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई यांनी चेन्नईमध्ये आंदोलन केले.

Haryana CM Nayab Singh Saini: मनोहरलाल खट्टर यांचे आभार; हरियाणाचे नवे मुख्यमंत्री सैनी नेमकं काय म्हणाले?

नव्याने स्थापन झालेले मंत्रिमंडळ खट्टर यांचे आभार मानते. खट्टर यांनी चांगले प्रशासन काय असते हे दाखवून दिलं आहे. त्यांनी सरकार चालवताना कोणताही भेदभाव केला नाही, असं हरियाणाचे नवे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी म्हणाले आहेत.

Pakistani boat with narcotics: अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या सहा पाकिस्तानी तस्करांना अटक

अमली पदार्थाची तस्करी करणारी एक पाकिस्तानी बोट ताब्यात घेण्यात आली आहे. बोटवरील सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

Sakal Survey Loksabha: शरद पवार की अजित पवार? महाराष्ट्रातील जनतेचा कौल कुणाला

सकाळच्या सर्वेक्षणात अजित पवारांना फटका बसेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार(१२.६ टक्के) तर राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) ३.९ टक्के लोकांची पसंती मिळत आहे. यात ३४,९७८ लोकांनी सर्वेक्षणात आपली मतं मांडली होती.

येत्या २०२४ च्या निवडणुकीत लोक २०१९ प्रमाणेच मतदान करणार का? जाणून घ्या

सकाळच्या सर्व्हेमध्ये लोकांना विचारण्यात आलं होतं की, तुम्ही २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत २०१९ प्रमाणेच मतदान करणार का? यावरुन लोकांनी पुढील प्रमाणे कौल दिला आहे.

होय- ५६.३ टक्के

नाही-२४.६ टक्के

काही सांगता येत नाही- १२.८ टक्के

Sakal Survey 2024: एनडीए की इंडिया आघाडी? लोकांची कुणाला पसंती?

लोक कोणत्या पक्षाला पसंती देतील याबाबत सर्व्हेक्षण करण्यात आला होतो. यात लोकांची भारतीय जनता पक्षाच्या युतीला म्हणजे एनडीएला एकूण ४३.३ टक्के पसंती मिळाली आहे. दुसरीकडे, इंडिया आघाडीला लोकांची अधिक पसंती मिळत असल्याचं चित्र आहे. इंडिया आघाडी/ महाविकास आघाडीच्या पारड्यात लोकांनी ४५.७ टक्के पसंती टाकली आहे. अपक्षांना ३.७ टक्के आणि १०.३ टक्के जनतेने कोणताच पर्याय निवडलेला नाही.

Sakal Survey Loksabha 2024 : कोणत्या मुद्द्याला लोक देशात सर्वाधिक महत्त्व? हिंदूत्व की पंतप्रधान पदाचा चेहरा

लोकसभा निवडणुकीला मतदान करताना पंतप्रधान पदाचा उमेदवार या मुद्द्याला सर्वाधिक (२१.४%) तर पक्ष (१२.९%), नेत्यांनी केलेली कामे (११.६%), पूर्ण झालेली विकास कामे (१०.१%) या मुद्द्यांना मतदार सर्वाधिक प्राधान्य देताना दिसतात. (Maharashtra election survey for 2024)

Latest Marathi News Live Update : कल महाराष्ट्राचा, सकाळचा सर्वे काय सांगतो?

Sharad Pawar: काँग्रेसचं शिष्टमंडळ शरद पवारांच्या भेटीला

राहुल गांधींची यात्रा महाराष्ट्रात आली आहे. त्यांच्या यात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रण देण्यासाठी काँग्रेसचं शिष्टमंडळ शरद पवार यांच्या भेटीला गेले आहे.

Rahul Gandhi: आदिवासी हे खरे देशाचे मालक; राहुल गांधींची टीका

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रातील नंदुरबार येथे पोहोचले आहे. यावेळी आयोजित सभेत बोलताना राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली. आदिवासी हे खरे देशाचे मालक आहेत. पण, मोदींनी आदिवासींचे कर्ज माफ केलं का? त्यांनी उद्योगपतींचे कर्ज माफ केले, असं म्हणत त्यांनी निशाणा साधला.

नंदुरबारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, माजी मंत्री भाजपच्या वाटेवर

नंदुरबारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री पद्माकर वळवी उद्या भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत.

थोड्याच वेळात सुरु होणार राहुल गांधींचीं सभा

नंदुरबारमध्ये थोड्याच वेळात राहुल गांधी यांच्या सभेला सुरुवात होणार आहे.

बोरिवलीत अपघातात ३ जणांचा मृत्यू

बोरिवली पूर्वेत इमारतीचा भाग कोसळल्याने ३ जणांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी आहे.

भारतीय वायुसेनेतील तेजस लढाऊ विमान दुर्घटनाग्रस्त, वैमानिकाचा जीव वाचला

भारतीय वायुसेनेचं LCA तेजस हे लढाऊ विमान अपघातात दुर्घटनाग्रस्त झालं आहे. या अपघातात वैमानिक सुरक्षित असून दुर्घटनेचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राहुल गांधी नंदुरबारमध्ये दाखल

भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. राहुल गांधी नंदुरबारमध्ये सभा घेणार आहेत.

मनसे सोडल्यानंतर वसंत मोरे यांचे डोळे पाणावले

राजीनामा दिल्यानंतर वसंत मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांचे डोळे पाणावले होते. मी माझे परतीचे दोर कापले आहे, परत मनसेत जाणार नाही, असंही त्यांच्याकडून सांगण्यात आलं.

मला माझ्याच पक्षातून विरोध होतोय- वसंत मोरे

वसंत मोरे यांनी मनसेतून राजीनामा दिल्यानंतर पक्षातून विरोध होत असल्याचे सांगितले. थोड्याच वेळात ते पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करतील. यावेळी असंख्य कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

दोन ते तीन दिवसात पुढची भूमिका स्पष्ट करणार- मोरे

पुढच्या दोन ते तीन दिवसात पुढची भूमिका स्पष्ट करणार असल्याचं वसंत मोरे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली असून अंतर्गत राजकारणामुळे निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं आहे.

वसंत मोरे यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद

वसंत मोरे यांची मनसेला सोडचिठ्ठी

मनसे नेते वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. मंगळवारी सकाळीच त्यांनी फेसबुक पोस्ट करत नाराजी बोलून दाखवली होती.

अजित पवार गटाचा शिंदे गटाला इशारा, तर...

शिंदे गटाचे नेते शिवतारे यांनी अजित पवारांविरोधात भूमिका घेतल्यानंतर अजित पवार गटाने शिंदे गटाला इशारा दिला आहे. तुम्ही तर बारामतीमध्ये डॅमेज केलं तर आम्ही ठाण्यात डॅमेज करु, अशा इशारा देण्यात आला आहे.

नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.

भावना गवळींच्या विरोधात ठाकरे गट उमेदवार देण्याच्या तयारीत

ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे वाशिम-यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून भावना गवळींच्या विरोधात उमेदवार देण्याच्या हालचाली सुरु असल्याची माहिती आहे.

 10 वर्षांचे काम म्हणजे फक्त ट्रेलर, मला बराच पल्ला गाठायचा आहे - पंतप्रधान मोदी

Gujrat News:  10 वर्षांचे काम म्हणजे फक्त ट्रेलर, मला बराच पल्ला गाठायचा आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात मध्यल्या एका कार्यक्रमात म्हणाले.

सोमवार पासून होणार धारावीतील झोपड्यांचे सर्वेक्षण

धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत धारावीतील लाखो झापड्यांचे सर्वेक्षण सोमवार, १८ मार्चपासून सुरू होणार आहे.

Nagpur Crime: मोठ्या भावाने हातोडीने केला लहान भावाच्या डोक्यावर वार

दारूच्या नशेत मोठ्या भावाने छोट्या भावाच्या डोक्यावर वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (ता.१०) रात्री अकरा वाजताच्या सुमारास हुडकेश्‍वर पोलिस हद्दीतील पवनपुत्रनगर येथे उघडकीस आली. याप्रकरणी मोठ्या भावाला पोलिसांनी अटक केली.

Mahadev Jankar:  भाजपनं माझ्यासोबत धोका केला - महादेव जानकर

भाजपनं माझ्यासोबत धोका केला, ज्या दिवशी मी यांना धोका करेन त्या दिवशी यांचे सरकार राहणार नाही. असे महादेव जानकर म्हणाले. परभणीत रासपच्या मेळाव्यात ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर कोस्टल रोड आजपासून वाहतुकीसाठी खुला

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर कोस्टल रोड आजपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. वरळी ते नरिमन पॉइंट अंतर अवघ्या १० मिनिटात पार होणार आहे. देशातील पहिला सागरी बोगदा आजपासून खुला करण्यात आला आहे. प्रवासी वाहन तसेच बेस्ट बस या मार्गाचा वापर करणार आहेत. वरळी बिंदू माधव ठाकरे चौक ते नरिमन पॉईंट ९.५ किलोमीटर लांब मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

Waris Pathan: सरकार निवडणुकीपूर्वी ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे; वारिस पठाण यांचे वक्तव्य

सीएए अधिसूचनेवर, एआयएमआयएमचे राष्ट्रीय प्रवक्ते वारिस पठाण म्हणाले, "घटनाक्रम समजून घ्या, वेळ पहा, निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत, 2024 मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत आणि सरकार अचानक सीएएचा विचार करते. गेली 5 वर्षे सरकार काय करत होते? आधी का आणले नाही? सरकार निवडणुकीपूर्वी ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. विकासाच्या आघाडीवर ते अपयशी ठरले आहेत. आम्ही यापूर्वीही यावर आक्षेप घेतला होता आणि आजही आम्ही म्हणतो की हा कायदा असंवैधानिक आहे.

महायुतीची आज दिल्लीत होणारी बैठक रद्द

महायुतीची आज दिल्लीत होणारी बैठक रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभा निवडणुका आणि जागावाटपावर चर्चा होणार होती. मात्र काल पाठोपाठ आजही ही बैठक रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार होते. यापुढील ही बैठक दोन ते तीन दिवसांनी होण्याची शक्यता आहे.

अमरावतीमध्ये पोलिसांवर दगडफेक; २५ पोलिस जखमी

पांढरी खानापूर येथील कमानीचा वाद पेटला आहे. यावेळी आंदोलक आणि पोलिस यांच्यामध्ये झटापट झाली, यावेळी आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत २५ पोलिस जखमी झाले आहेत. तर गाड्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.

उध्दव ठाकरे यवतमाळ-वाशिम दौऱ्यावर

उध्दव ठाकरे दोन दिवसांसाठी यवतमाळ-वाशिम दौऱ्यावर आहेत. यावेळी ते मतदारसंघात दौरे, सभा घेत आहे.

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत खासदार संजय राऊत सहभागी होणार

नाशिक : राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत शिवसेना खासदार संजय राऊत ही सहभागी होणार असल्याची माहिती आहे. तसेच शरद पवार यांच्यासह संजय राऊत चांदवडमधील सभेत सहभागी होणार आहेत. 14 मार्चला भारत जोडो यात्रा चांदवड मार्गे नाशिकमध्ये दाखल होणार आहे. संजय राऊत आजपासून पुढील 3 दिवस नाशिक मुक्कामी असणार आहेत.

Chandoli Dam Earthquake : चांदोली धरण परिसरात भूकंपाचा धक्का

वारणावती : वारणा धरण परिसरात सौम्य स्वरूपाचा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. सोमवारी पहाटे ५ वाजून ०१ मिनिटांनी ३.० रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला आहे, अशी माहिती धरण प्रशासनाने दिली आहे. हा धक्का वारणावती परिसरात जाणवला असून, यामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू वारणा धरणापासून २२.४ किलोमीटर अंतरावर होता.

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज येणार महाराष्ट्रात

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज मंगळवारी नंदुरबारमार्गे महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. नंदुरबारमधील सीबी मैदानावर राहुल गांधी यांची जाहीर सभा देखील होणार आहे. 

'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार'  पक्षाची 37 जणांची कार्यकारिणी जाहीर

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची जिल्हा ग्रामीण कार्यकारिणी जाहीर झाली. त्यात ३७ जणांचा समावेश असून त्यांना नियुक्तीपत्र वाटप पक्षाच्या जिल्हा कार्यालयात जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्या हस्ते करण्यात आले.

Operation Bharat Shakti : भारताच्या तिन्ही सेना पोखरणमध्ये करणार 'भारत शक्ती'चा सराव

Operation Bharat Shakti : भारताला धोरणात्मकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्याची मोदी सरकारची मोहीम वेगाने पुढे जात आहे. तिन्ही सेना पोखरणमध्ये ‘भारत शक्ती’ सराव सुरू करणार आहेत. लष्करात सामील होणारी शस्त्रे आणि स्वदेशी शस्त्रांची मारक क्षमता आणि सामर्थ्य पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पोखरणमध्ये उपस्थित राहणार आहेत.

Sulkud Water Scheme : जिल्हाधिकारी कार्यालयात 'सुळकूड'प्रश्नी आज बैठक

इचलकरंजी : सुळकूड पाणी योजना अंमलबजावणीप्रश्नी आज (ता. १२) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात जिल्हास्तरीय तज्ज्ञ समितीची बैठक आयोजित केली आहे. बैठकीस इचलकरंजी महापालिका आयुक्तांसह पाटबंधारे विभाग, जीवन प्राधिकरणचे अधिकारी तसेच दुधगंगा बचाव समिती व सुळकूड योजना कृती समितीचे प्रतिनिधी यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

Loksabha Election : लोकसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता 

महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत अतिशय महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. भाजपची दिल्लीत केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार आशिष शेलार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीला गेले आहेत. या बैठकीआधी भाजपच्या राज्याच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. त्यानंतर पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपची उमेदवारांची दुसरी यादी आज येण्याची शक्यता आहे. 

Railway Project : रेल्वेच्या विविध प्रकल्पांचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज उद्‌घाटन-लोकार्पण

Latest Marathi News Live Update : देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना केंद्र सरकारने बहुचर्चित नागरिकत्व सुधारणा कायद्याची (सीएए) अधिसूचना जारी केलीये. तसेच निवडणूक रोख्यांच्या मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयालयाने ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ला (एसबीआय) मोठा दणका देत याबाबतची सविस्तर माहिती आजपर्यंत (मंगळवार ता. १२) म्हणजेच कार्यालयीन कामकाजाची वेळ संपण्याच्या आधी न्यायालयात सादर करा, असे निर्देश दिलेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कथित खलिस्तानी समर्थकाने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. रेल्वेच्या विविध प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन प्रणालीद्वारे होणार आहे. तसेच देशातील विविध राज्यांत वातावरणात बदल जाणवत असून काही ठिकाणी पाऊस पडत आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com