Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

पॅसिफिक महासागरात एका कवायतीदरम्यान दोन जपानी सागरी सेल्फ-डिफेन्स फोर्स हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याने एक क्रू मेंबर ठार झाला
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live Update Sakal

आंध्र प्रदेश आणि झारखंडसाठी काँग्रेसची उमेदवारी जाहीर

काँग्रेसने आंध्र प्रदेश आणि झारखंड लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. झारखंडच्या गोड्डा मतदारसंघातून दीपिका सिंह पांडे यांच्या जागी काँग्रेसने प्रदीप यादव यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

दिल्लीतल्या गाझीपूरमध्ये भीषण आग

दिल्लीतील गाझीपूर लँडफिल साइटवर आग लागल्याची घटना घडली आहे. भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

'मैदान सोडून गेलेले राजस्थानमधून राज्यसभेवर आले', पंतप्रधान मोदींचा सोनिया गांधींवर निशाणा!

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यावर अप्रत्यक्ष हल्ला करताना मोदी म्हणाले की, जे निवडणूक लढवू शकत नाहीत, जिंकू शकत नाहीत ते मैदानातून पळून गेले आहेत. यावेळी ते राजस्थानमधून राज्यसभेवर आले आहेत. काँग्रेसची अवस्था अत्यंत वाईट आहे.

Latest Marathi News Live Update : हायकोर्टाचा राज ठाकरेंना दिलास, २००८ मधील खटला रद्द

हायकोर्टाने राज ठाकरे यांना दिलासा दिला आहे. २००८ मधील हिंसा भटकवल्याप्रकरणी खटला रद्द केला आहे. पुरावे नसल्याचे हायकोर्टाने म्हटलं आहे.

एकनाथ खडसेंवर तपाय यंत्रणांचा दबाव - शरद पवार

एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. खडसेंवर तपास यंत्रणांचा दबाव असल्याचे पवार म्हणाले.

 भाजपच्या कार्यालयाला लागलेली आग दीड तासानंतर आटोक्यात

मुंबईतील नरीमन पाँइट येथील भाजपच्या कार्यालयाला लागलेली आग तब्बल दीड तासानंतर आटोक्यात आली आहे. दरम्यान या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आली नसून वेल्डिंग करताना शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याचे सांगितले जात आहे.

पुण्यात धडाडणार उद्धव ठाकरेंची तोफ

उद्धव ठाकरे यांची पुढील आठवड्यात पुण्यात जाहीर सभा होणार आहे. पुण्याचे महाविकास आघडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ पुण्यात सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे यांची देखील प्रचार सभा होणार आहे. २३ तारखेला मुळशी तालुक्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा ते घेणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन घोटवडे फाटा याठिकाणी करण्यात येणार आहे.

उद्या प्रसिद्ध होणार अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा जाहिरनामा

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सोमवार दिनांक २२ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता जाहिरनामा प्रसिद्ध करणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे उपस्थित राहणार आहेत.

दारू घोटाळा प्रकरणी निवृत्त आयएएस अधिकारी अनिल तुटेजा यांना अटक

दारू घोटाळा प्रकरणी ईडीने निवृत्त आयएएस अधिकारी अनिल तुटेजा यांना अटक केली आहे.

चेन्नईमध्ये चाहत्यांनी एमएस धोनीचं केलं स्वागत

चेन्नईमध्ये एमएस धोनी आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाचे चाहत्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले.

अब की मोदींचा ४०० पार चा फुगा फुटणार - अनंत गाडगीळ

जगातील एक बडे उद्योगपती आणि टेस्ला कंपनीचे प्रमुख एलन मस्क यांनी आपला नियोजीत भारत दौरा लांबणीवर टाकला आहे. आता ते निवडणूक झाल्यानंतर भारतात येणार आहे म्हणजे या निवडणुकीनंतर देशात सरकार बदलणार आहे याचा अंदाज आल्यामुळेच एलन मस्क यांनी त्यांचा दौरा पुढे ढकलला आहे. फक्त देशातल्या जनतेलाच नाही तर जगभरातल्या लोकांना मोदी पुन्हा येऊ शकत नाहीत हे कळून चुकले आहे असे प्रतिपादन माजी आमदार व काँग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी केले आहे.

Nashik News: नांदूर-शिंगोटे लोणी रस्त्यावर अपघातात 3 ठार; कंटेनर मोटरसायकल अपघात

नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुका पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या निमोण गावाजवळ कंटेनर व पल्सर मोटरसायकल अपघातात आदिवासी कुटुंबातील तीन तरुण ठार झाले. नांदुर-शिंगोटे लोणी रस्त्यावर निमोण गावालगत हा अपघात शनिवारी सायंकाळच्या सुमारास झाला. सदरच्या अपघातात कंटेनर व पळटसर मोटरसायकलच्या अपघातात हे तीन तरुण ठार झाल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी बचाव कार्यास मदत केली.

Mumbai Local Crime: लोकलमधील प्रवाशाकडून मद्याचा साठा जप्त; पोलिसांची मोठी करवाई

 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यातच कल्याणच्या लोहमार्ग पोलिसांनी तपासणीदरम्यान धावत्या लोकलमध्ये एका प्रवाशाकडून मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी मद्य साठा जप्त केला आहे. नथुराम तांबोळी असे त्याचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Uddhav Thackeray: 'जय भवानी' शब्द गीतामधून काढणार नाही

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच निवडणूक आयोगाने बजावलेली नोटीस धुडकावली आहे. उद्धव ठाकरे यांनी सांगितल्यानुसार, 'निवडणूक आयोगाने मशाल गीतामधून हिंदू आणि जय भवानी हे दोन शब्द काढण्यास सांगितलं आहे.; पण, उद्धव ठाकरे यांनी जय भवानी हा शब्द गीता मधून काढणार नाही असं म्हटल आहे.

भिवंडी लोकसभेत एमआयएम उतरवणार उमेदवार

: भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव एमआयएम पक्ष लोकसभा निवडणूक लढणार असल्याची माहिती एमआयएम पक्षाचे प्रवक्ते तथा माजी आमदार वारीस पठाण यांनी दिली. शहरातील खंडूपाडा भागात रमजान ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन एमआयएमचे शहर सचिव शादाब उस्मानी यांनी केले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

नाशिक रोडला पुन्हा दूषित पाणीपुरवठा

नाशिक रोडला पुन्हा दूषित पाणीपुरवठा करण्यात आला आहे. नागरिकांनी यासंदर्भात तक्रारी केल्या असून आरोग्याचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे.

HD Kumaraswamy: काँग्रेसने आम्हाला वाईट वागणूक दिली; एचडी कुमारस्वामी यांचं वक्तव्य

काँग्रेसने आम्हाला वाईट वागणूक दिली म्हणून आम्ही आघाडी तोडण्याचा निर्णय घेतला, असं माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी एका मुलाखतीत म्हणाले होते.

काँग्रेस सीईसीच्या बैठकीला सुरुवात

बिहारमधील निवडणुकांसाठी काँग्रेस सीईसीची बैठक दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात सुरू आहे

Sanjay Raut: मिलिंद नार्वेकर यांच्यावर बोलावं इतके ते मोठे नाहीत; संजय राऊतांचं सूचक वक्तव्य

मिलिंद नार्वेकर यांच्याबाबत बोलावं इतके ते मोठे नाहीत असं सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. त्यातच मिलिंद नार्वेकर हे शिंदे गटाकडून दक्षिण मुंबईतून लोकसभा लढवण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी हालचाल पाहायला मिळणार आहे.

Sanjay Raut: पंतप्रधान बनावं असं फडणवीस यांचं स्वप्न होतं- संजय राऊत

मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान पदाचं स्वप्न पडलं होतं. पण, मोदी-शहांनी त्यांची पंख छाटले. त्यामुळेच त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

पॅसिफिक महासागरात जपानचे दोन हेलिकॉप्टर क्रॅश

शनिवारी उशिरा पॅसिफिक महासागरात एका कवायतीदरम्यान दोन जपानी सागरी सेल्फ-डिफेन्स फोर्स हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याने एक क्रू मेंबर ठार झाला आणि सात बेपत्ता आहेत. क्योडो न्यूजने जपानच्या संरक्षण मंत्र्यांचा हवाला देत हे वृत्त दिले आहे.

दिल्ली मद्य घोटाळ्यात आणखी एक अटक

ईडीने छत्तीसगडचे निवृत्त आयएएस अधिकारी अनिल टुटेजा यांना मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली.

भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू

राजस्थानातील झालावाड जिल्ह्यातील अकलेराजवळील पाचोला येथे झालेल्या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला. ते एका व्हॅनमधून लग्नाच्या वरातीतून परतत असताना ट्रकला धडकले.

MNS News : दक्षिण मध्य मुंबईच्या जागेसाठी मनसेची आज महत्त्वाची बैठक

दक्षिण मध्य मुंबईच्या जागेसाठी मनसेची आज सकाळी 11 वाजता महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती आहे. या बैठकीला शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे उपस्थित राहणार असून त्यांच्या प्रचारासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार असं कळतंय.

Moradabad Lok Sabha : मुरादाबाद लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार कुंवर सर्वेश कुमार सिंह यांचं निधन

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उमेदवार आणि उत्तर प्रदेशातील मुरादाबाद लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार कुंवर सर्वेश कुमार सिंह यांचे शनिवारी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) येथे निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मुरादाबादमध्ये शुक्रवारी (19 एप्रिल) मतदान पूर्ण झाले. मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या १२ उमेदवारांमध्ये कुंवर सर्वेश कुमार यांचा समावेश होता.

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात आज हलक्या पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाडा, विदर्भ, ओडिशा, झारखंड, बिहार आणि उत्तर पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी गारपिटीसह मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकातही पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Lok Sabha Elections : कोल्हापूरसह हातकणंगलेमधून सात अर्ज अवैध

कोल्हापूर : लोकसभा निवडणूक प्रक्रियेतील छाननी प्रक्रिया काल झाली. निवडणुकीतील प्रमुख दावेदारांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले. कोल्हापूर मतदारसंघातील बहुजन समाज पार्टीचे संदीप नामदेव शिंदे यांचे दोन अर्ज आणि माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांचा एक अर्ज अवैध ठरला. हातकणंगले मतदारसंघातील कामगार किसान पार्टीचे संतोष केरबा खोत, अपक्ष उमेदवार जगन्नाथ भगवान मोरे, बाळकृष्ण काशिनाथ म्हेत्रे, विश्वास आनंदा कांबळे, अस्मिता सर्जेराव देशमुख या अपक्षांचे अर्ज अवैध ठरले. जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी ११.३० या वेळेत ही प्रक्रिया झाली.

Nalasopara News : नालासोपाऱ्यात 40 वर्ष जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला

चौधरीवाडी खांबाळेश्वर इथं इमारतीचा स्लॅब कोसळला आहे. नालासोपारा पश्चिममध्ये ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत राहुल मदन सिंह (वय २८) हा जखमी झाला असून त्याला नालासोपारा पश्चिमेच्या सोपारा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, इमारतीमधील काही नागरिकांना वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला बाहेर काढण्यात यश आले आहे. कोसळलेली इमारत ४० वर्ष जुनी आहे.

Elon Musk Visit to India Postponed : एलॉन मस्क यांचा भारत दौरा लांबणीवर

नवी दिल्ली : जागतिक कीर्तीचे टेक्नोक्रॅट आणि उद्योजक एलॉन मस्क यांनी त्यांचा बहुचर्चित भारत दौरा पुढे ढकलला आहे. ‘टेस्ला’शी संबंधित कामामध्ये व्यग्र असल्याने मी हा दौरा पुढे ढकलत असल्याचे त्यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर नोंदविलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. मस्क हे रविवार (ता.२१) आणि सोमवार (ता.२२) असे दोन दिवस भारत भेटी येणार होते. पुढील वर्षी आपण भारतामध्ये नक्की येऊ असेही त्यांनी म्हटले आहे.

Satara Lok Sabha : रामराजे-उदयनराजेंत साताऱ्यात बंद दाराआड खलबते

Latest Marathi News Live Update : सांगली लोकसभा मतदारसंघात पक्ष आणि महाविकास आघाडीच्या विरोधात बंड कराल तर निलंबनाची कारवाई करावी लागेल, असा इशारा प्रदेश काँग्रेस समितीने विशाल पाटील यांना दिला आहे. महायुतीचे सातारा लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले व फलटणचे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांची साताऱ्यातील प्रीती हॉटेलवर भेट झाली. या वेळी दोघांनी बंद दाराआड निवडणुकीसंदर्भात अर्धा तास चर्चा केली. जागतिक कीर्तीचे टेक्नोक्रॅट आणि उद्योजक एलॉन मस्क यांनी त्यांचा बहुचर्चित भारत दौरा पुढे ढकलला आहे. तसेच देशातील वातावरणात बदल जाणवत असून काही भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com