Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर....

नवी मुंबईत आजपासून दोन दिवस पादुका सोहळा रंगणार असून लाखो भाविकांची पावले वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरकडे वळू लागली आहेत.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live Update Esakal

काँग्रेसची उमेदवारांची सातवी यादी जाहीर!

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली आहे.

काँग्रेस नेत्यांची दिल्लीत महत्वाची बैठक, तेजस्वी यादवही उपस्थित

काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल हे पक्षाचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांच्या निवासस्थानी पोहोचले. आरजेडी नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव काही वेळापूर्वी तिथे आले आहेत.

शिवसेना शिवतरेंना कारणे दाखवा नोटीस पाठवणार

अजित पवारांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या विजय शिवतरेंना शिवसेनेकडून कारवाई का करू नये, याबाबत नोटीस बजावण्यात येणार आहे. शिवतरे बारामती लोकसभा मतदरसंघातून निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहे. मात्र, महायुतीत ही जागा राष्ट्रवादीला देण्यात आली असून त्या ठिकाणी दादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची जागा जवळपास निश्चित आहे. तरीही शिवतरे आपल्या भूमिकांवर ठाम असून अजित पवारांविषयी आक्षेपार्ह विधानं करत आहेत.

'वंचित'शिवाय महाविकास आघाडीचा ‌फॉर्म्युला तयार

'वंचित'शिवाय महाविकास आघाडीचा ‌फॉर्म्युला तयार. ठाकरे गट २०, काँग्रेस १८ तर पवार गट १० जागांवर लढणार असल्याची सुत्रांची माहिती. भिवंडीची जागा पवार गटाकडं जाण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचंही सांगितलं जात आहे.

शिवाजी आढळराव पाटील यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा शिंदेंच्या शिवसेनेतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आज प्रवेश झाला. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरुर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येणार आहे. शरद पवार गटाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्याशी त्यांची लढत होणार आहे.

'अकोला पश्चिम' विधानसभेची पोटनिवडणूक हायकोर्टाकडून रद्द! 

अकोला पश्चिम विधानसभेची पोटनिवडणूक हायकोर्टानं रद्द केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आता केवळ चारचं महिने शिल्लक असल्यानं ही निवडणूक रद्द करण्यात आली आहे.

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांची मुंबई काँग्रेस कार्यालयात बैठक

दक्षिण मुंबईतील जागेसंदर्भात रणनीती आणि चर्चा करण्यासाठी इंडिया आघाडीच्या पक्षांची बैठक मुंबई काँग्रेस कार्यालयात सुरु आहे. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी आणि शिवसेनेचे महत्वाचे पदाधिकारी मुंबई काँग्रेस कार्यालयात पोहोचले. या बैठकीला काँग्रेसकडून आमदार आणि काँग्रेस मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड,आमदार आमीन पटेल आणि काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित आहेत.

Devendra Fadnavis: सुरुवात चांगली झाली असून त्याचा परिणामही चांगला होईल- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने आम्ही चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सुरुवात चांगली झाली असून त्याचा परिणामही चांगला होईल. या वेळी महाराष्ट्रातून सुधीर मुनगंटीवार यांचा उमेदवारी अर्ज भरला आहे.

शिवसेनेचा दक्षिण मुंबई, ठाणे, शिर्डी आणि नाशिकवर दावा कायम

शिवसेनेचा दक्षिण मुंबई, ठाणे, शिर्डी आणि नाशिकवर दावा कायम आहे. इच्छुक उमेदवारांची नावे भाजपकडे पाठवली आहेत. शिवसेनेकडून दक्षिण मुंबई, ठाणे, शिर्डी आणि नाशिक या मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे. या चारही जागांवर महायुतीमध्ये चर्चा सुरू आहे. शिवसेनेने दक्षिण मुंबई, ठाणे, शिर्डी आणि नाशिक या चार जागांवरील इच्छुक उमेदवारांची नावे भाजपकडे पाठवल्याची माहिती शिवसेनेतील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.

काँग्रेसला मोठा धक्का माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडीनी दिला राजीनामा   

गडचिरोलीतले काँग्रेसचे नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव आणि आदिवासी काँग्रेस अध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

के कविता यांना ९ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी

बीआऱएस पक्षाच्या नेत्या के कविता यांना दिल्ली कोर्टाने ९ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

नाशिकचे आमदार अनिल कदम ठाकरेंच्या भेटीला

नाशिकचे आमदार अनिल कदम उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आले आहेत.

चंद्रपुरात भाजपची सभा, थोड्याच वेळात मुनगंटीवार भरणार अर्ज

चंद्रपुरमध्ये सध्या भाजपची सभा सुरु आहे. सुधीर मुनगंटीवर आज अर्ज भरतील. या सभेला चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते.

महायुतीत ठाणे, रत्नागिरी आणि पालघरचा तिढा सुटला...

ठाण्याची जागा शिवसेना लढवणार, राजन विचारेंच्या विरोधात रवि फाटक याचं नाव जवळपास निश्चित आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा भाजप लढवणार असून रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेसाठी राणेच्या नावाची चर्चा आहे. तर पालघरच्या जागेवर भाजपचा दावा कायम असून शिवसेनेचे खासदार गावित भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याची माहिती, सुत्रांकडून मिळत आहे.

जळगावमध्ये रक्षा खडसे आणि पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी

रक्षा खडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही कार्यकर्ते नाराज झाले होते. ज्यानंतर पदाधिकारी आणि रक्षा खडसे यांच्याच खडाजंगी बघायला मिळाली. या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Pune News: घरांच्या नोंदणीत फेब्रुवारीमध्ये २३ टक्के वाढ

पुणे : पुणे शहरातील रिअल इस्टेट क्षेत्राची वेगाने वाढ होत असून, घरांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. फेब्रुवारीमध्ये घरांच्या नोंदणीमध्ये वार्षिक २३ टक्के वाढ झाल्याचे आढळून आले आहे. फेब्रुवारी महिन्यात एकूण १७,५७० घरांची नोंदणी झाली. मागील वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात ही संख्या १४,२८४ होती.

रक्षा खडसेंना मिळालेल्या तिकीटामुळे कार्यकर्ते नाराज;व्हिडियो व्हायरल 

रावेर मतदार संघातून रक्षा खडसेंना भाजपने तिकीट दिले आहे. यावेळी भाजपमध्ये नाराजी असल्याचे दिसून येत आहे.

Paduka Darshan Sohala : सर्व १८ संतमहात्म्यांच्या पादुका पोहोचल्या कार्यक्रम स्थळी

‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ‘श्री फॅमिली गाइड प्रोग्रॅम’च्या माध्यमातून मंगळवारी (ता. २६) आणि बुधवारी (ता. २७) नवी मुंबईत ‘श्रीगुरू पादुकादर्शन उत्सव’ आयोजित केला आहे. या सोहळ्यात १८ संत आणि सद्‍गुरूंच्या पादुकांचे दर्शन एकाच ठिकाणी होणार आहे. 

Crime News: तरुणीची गळा दाबून केली हत्या; पश्चिम बंगालमधून मारेकऱ्याला अटक

Dahanu Crime: डहाणू तालुक्यातील लोणी पाडा येथे एका २२ वर्षीय तरुणीची गळा दाबून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपीला डहाणू पोलिसांनी पश्चिम बंगालमधून अटक केली आहे.

Sanjay Raut: शिवसेनेची पहिली यादी तयार; संजय राऊतांनी दिली माहिती

शिवसेना उबाठा गटाची पहिली यादी तयार आहे. वंचितसोबत अद्याप चर्चा सुरु आहे. चार जागांचा प्रस्ताव अजूनही कायम आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.

Maharashtra News: वंचित बहुजन आघाडीची बुधवारी महत्त्वाची पत्रकार परिषद

वंचित बहुजन आघाडीची उद्या महत्त्त्वाची पत्रकार परिषद होणर आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Nagpur: काँग्रेसचे विकास ठाकरे आज नागपूरसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार

विकास ठाकरे आज काँग्रेसकडून नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी ते शक्तीप्रदर्शन करतील. भाजपच्या नितीन गडकरी यांच्याविरोधात त्यांची लढत होईल.

MNS News: मनसेच्या मुंबईतील नेत्यांची बुधवारी दहा वाजता महत्त्वाची बैठक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुंबईच्या नेत्यांनी उद्या महत्त्वाची बैठक होणार आहे. बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्त्वात सकाळी दहा वाजता ही बैठक होणार आहे.

Gherao PM's residence: आपच्या आंदोलनाला परवानगी दिली नाही- दिल्ली पोलीस

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात आज आपने पंतप्रधानाच्या निवासस्थानाला घेराव घालण्याच्या निर्णय घेतला आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितलंय की, आपला आंदोलनाची परवानगी देण्यात आलेली नाही.

Mahayuti : जागा वाटपावरुन भाजप-राष्ट्रवादीत वाद पेटण्याची चिन्हे, अजितदादांच्या पक्षाची आज पुण्यात बैठक

जागावाटपावरुन भाजप व राष्ट्रवादीत वाद पेटण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक आज (मंगळवार) पुण्यात होत असून, यामध्ये साताऱ्यातील उमेदवारीवर चर्चा होणार आहे. सातारा लोकसभेचा तिढा सुटलेला नाही.

Bhandup Police : 15 वर्षीय मुलीच्या अपहरणप्रकरणी पोलिसांकडून चार महिलांना अटक

महाराष्ट्र : भांडुपमध्ये 15 वर्षीय मुलीच्या अपहरणप्रकरणी पोलिसांनी चार महिलांना अटक केली आहे. या अटक आरोपींना 28 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती भांडुप पोलिसांनी दिली.

Britain Parliament : लंडनमध्ये ब्रिटनच्या संसदेवर शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा

ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये शेतकऱ्यांनी संसदेवर ट्रॅक्टर मोर्चा काढून आपला निषेध नोंदवला. सोमवारी मोठ्या संख्येने शेतकरी ट्रॅक्टर चालवत तेथे पोहोचले आणि त्यांनी संसद चौकात ट्रॅक्टर मोर्चा सुरु केला. सरकार आपली उपजीविका आणि अन्न सुरक्षा दोन्ही धोक्यात आणत असल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केलाय.

खाणसम्राट आणि माजी मंत्री जी. जनार्दन रेड्डींचा पुन्हा भाजपमध्ये प्रवेश

बंगळूर : खाणसम्राट आणि माजी मंत्री जी. जनार्दन रेड्डी यांनी सोमवारी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. बेकायदेशीर खाण प्रकरणातील आरोपी असलेल्या गंगावतीच्या आमदाराने गेल्या वर्षी राज्य विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘कल्याण राज्य प्रगती पक्ष’ (केआरपीपी) स्थापन केला होता आणि भाजपसोबतचा त्यांचा दोन दशकांचा जुना संबंध तोडला होता. रेड्डी यांनी आज त्यांचा ‘केआरपीपी’ पक्षही भाजपमध्ये विलीन केला.

Weather Update : राज्यात पुढील 24 तासात पावसाची शक्यता

पुढील 24 तासात राज्यात पावसाची शक्यता आहे. विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोलीत  गडगडाटी वादळासह गारपीट होऊ शकते. विदर्भ, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, गंगेचे पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, आसाम आणि मेघालय लिकले येथे पुढील 24 तासांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

Central Railway : जरंडेश्वर-सातारा मार्गावर आजपासून ‘ट्रॅफिक ब्लॉक’

कोरेगाव : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील लोहमार्गाच्या दुहेरीकरणातील इंजिनिअरिंग व इतर कामांसाठी पुणे-सातारा लोहमार्गातील जरंडेश्वर-सातारा या दरम्यान आजपासून (ता. २६) शुक्रवारअखेर (ता. २९) ‘ट्रॅफिक ब्लॉक’ घेण्यात आलेला असून, त्यामुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Shiv Sena : मुंबईमधून शिवसेनेची (शिंदे गट) पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर महायुतीचा उमेदवार कोण, याची चर्चा चांगलीच रंगली आहे; मात्र या तर्कवितर्कांना आज (ता.२६) पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. मुंबईमधून शिवसेनेची (शिंदे गट) पहिली यादी आज जाहीर होईल. त्यामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचाही उल्लेख असेल, असे सांगितले जात आहे.

Paduka Darshan Sohala : नवी मुंबईत आजपासून दोन दिवस रंगणार पादुका सोहळा

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईत आजपासून दोन दिवस पादुका सोहळा रंगणार असून लाखो भाविकांची पावले राज्यभरातून वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरकडे वळू लागली आहेत. तसेच राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोचली असतानाच सत्ताधारी ‘महायुती’तील जागा वाटपाचा पेच मात्र अद्याप सुटलेला नाही. मुंबईमधून शिवसेनेची (शिंदे गट) पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून अद्याप महायुती व महाविकास आघाडीकडून उमेदवारीची घोषणा झालेली नाही. मध्यप्रदेशातील महाकाल मंदिरातील गर्भगृहामध्ये भस्मारती प्रसंगी उडालेल्या आगीच्या भडक्यामध्ये चौदा सेवक आणि पुजारी होरपळले आहेत. तसेच देशातील विविध राज्यांत वातावरणात बदल जाणवत असून काही ठिकाणी पाऊस पडत आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com