Marathi News Live Updates: दुष्काळाच्या झळांनी लोणी गावातील दुग्ध व्यवसाय संकटात, पाणी आणि चाऱ्याअभावी साडेचारशे म्हशींचा सांभाळ कठीण, पशुपालकांवर जनावरे विकण्याची वेळ

Breaking Marathi News Live Update : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, देशाच्या बातम्या, सार्वजनिक , निवडणूक , निवडणूक आणि देश-विदेशातील ताज्या अपडेट एकाच ठिकाणी.
Breaking Marathi News live Updates
Breaking Marathi News live Updatesesakal

Akola Live दुष्काळाच्या झळांनी लोणी गावातील दुग्ध व्यवसाय संकटात, पाणी आणि चाऱ्याअभावी साडेचारशे म्हशींचा सांभाळ कठीण, पशुपालकांवर जनावरे विकण्याची वेळ

अकोला जिल्ह्यातील लोणी गावात दुष्काळामुळे दुग्ध व्यवसायाला मोठा फटका बसत असून, पाणी आणि चाऱ्याच्या तीव्र टंचाईमुळे पशुपालकांसमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. सुमारे साडेचारशे लोकसंख्या असलेल्या या गावात जवळपास साडेचारशे म्हशी असून, अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर अवलंबून आहे. मात्र, जनावरांना पुरेसे पाणी आणि चारा उपलब्ध करून देणे कठीण झाले असून, त्यांच्या पालनपोषणाचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. एका पशुपालकाला म्हशींच्या देखभालीसाठी दरमहा जवळपास सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च करावे लागत आहेत. उत्पन्न आणि वाढता खर्च यांचा ताळमेळ घालणे अवघड झाल्याने पशुपालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. दुष्काळाची परिस्थिती अशीच कायम राहिल्यास उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या म्हशी विकण्याची वेळ येईल, अशी भीती त्यांना सतावत आहे. त्यामुळे जनावरांसाठी पाणी आणि चाऱ्याची व्यवस्था करून प्रशासनाने तातडीने मदत करावी, अशी अपेक्षा लोणी गावातील पशुपालक व्यक्त करत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com