Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live Update Esakal

ममता बॅनर्जी यांचा मोठा अपघात

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या गाडीला अपघात झाला आहे.

जुन्नरला पुरातत्व वस्तु संग्रहालायाचे उद्घाटन

जुन्नर येथील पुरातत्वीय वस्तुसंग्रहालयाचे उदघाटन आज गुरुवार(ता.१४) रोजी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते व आमदार अतुल बेनके व माजी आमदार शरद सोनवणे यांच्या उपस्थित संपन्न झाले. अध्यक्षस्थानी सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.प्रकाश महानवर हे होते.

पानशेत खोऱ्यातील शिरकोली येथे वणव्यात आदिवासींची चार घरे जळून खाक

पानशेत भागातील शिरकोली येथे काल बुधवारी (ता.१३) रोजी दुपारी लागलेल्या भीषण वणव्यात गावातील आदीवासी कातकरी समाजाची चार घरे व झोपड्या जळुन भस्मसात झाल्या. स्थानिक नागरिकांनी वणवा विझवल्याने सुदैवाने जिवीतहानी टळली .

सोमेश्वर कारखान्याच्या जागेत शंभर बेडचे रुग्णालय; अजित पवार यांची माहिती

बारामती, रूई, सुपे या तिन्ही ठिकाणी सरकारी रूग्णालये आहेत. आता तालुक्याच्या पश्चिम भागासाठीदेखील शंभर बेडचे सरकारी रूग्णालय उभारू. सोमेश्वर कारखान्याच्या जागेत वाघळवाडी गावासाठी मंजूर झालेले प्राथमिक आरोग्य केंद्र रद्द करून त्याच जागेवर रूग्णालय करू, असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. तसेच शिक्षणसंस्था व कारखाना परिसरातील अंतर्गत रस्त्यांची कामे करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Latest Marathi News Live Update : साहेबांचं नेतृत्व मी कधीच सोडलेलं नाही- निलेश लंके

पत्रकारांनी विचारलं होतं तुम्ही काय करणार, मी म्हटलं पवार साहेबांबरोबच आहे. माझ्या प्रचार यात्रेचा शुभारंभ पवार साहेबांनी केला होता. कोरोनाच्या काळात काय होतं तुम्हाला माहिती आहे, त्यावेळी पवार साहेबांनी ज्या योजना राबवल्या त्याचा फायदा झाला. पवार साहेबांचा नेहमीच आशीर्वाद मला लाभला आहे. मी पूर्वीच्या कालखंडात जे काम केले त्यात पवारांचे सहकार्य लाभले.

माझ्या आयुष्यातील काही घटना मी पुस्तकात लिहिल्या आहेत. मी अनुवलेला कोविड असे त्या पुस्तकाचे नाव आहे. त्याचे प्रकाशन पवारांच्या हस्ते प्रकाशन करायचा मानस होता. मी त्यांना तसे सांगितले. यासाठी मी त्यांची भेट घेतली.

लहानपणापासून पवार साहेबांच्या कामाचं कौतुक होतं. साहेबांचं नेतृत्व मी कधीच सोडलेलं नाही. माझ्या कार्यालयात अजुनही त्यांचा फोटो आहे. खासदारकीची अन् कोणत्या निवडणूकीची माझी साहेबांसोबत चर्चा झालेली नाही. सर्वसामान्य जनतेला जो घेऊन चालणारा नेता आहे त्यांच्यासोबत मी आहे. असं लंके यांनी म्हटलं आहे.

पुन्हा मायबाप जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली - पियुष गोयल

उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर पियुष गोयल मुंबईत दाखल झाले.त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

राहुल गांधी त्र्यंबकेश्वर मंदिरात दाखल

भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने आज राहुल गांधी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात नुकतेच दाखल झाले आहेत.

आमदार निलेश लंके शरद पवार गटाच्या कार्यालयात दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी आठ ते नऊ महिन्यांपूर्वी अजित पवारांसोबत जात शरद पवार गटाला सोडचिठ्ठी दिली होती. मात्र, आता ते नुकतेच शरद पवार गटाच्या कार्यालयात दाखल झाले आहेत.

वसंत मोरे पवार गटाच्या कार्यालयात दाखल 

माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी दोन दिवसांपूर्वीच मनसेला राजीनामा दिला. त्यानंतर, ते नुकतेच शरद पवार गटाच्या कार्यलयात दाखल झाले आहेत.

बारामतीची जागा अजित पवार गट लढणार - चंद्रशेखर बावनकुळे

बारामतीची जागा अजित पवार गट लढणार असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात केले आहे.

Sudha Murty Becomes Rajya Sabha Member: लेखिका सुधा मूर्ती यांनी राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली

इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी लेखिका सुधा मूर्ती यांनी राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. सुधा मूर्ती यांनी सभागृहाचे अध्यक्ष जगदीप धनखड यांच्या उपस्थितीत शपथ घेतली. यावेळी त्यांचे पती नारायण मूर्ती आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल देखील उपस्थित होते.

Sudha Murty Becomes Rajya Sabha Member
Sudha Murty Becomes Rajya Sabha MemberSakal

Lok Sabha Election 2024: निवडणूक आयुक्त निवडण्यासाठी निवड समितीच्या बैठकीनंतर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी काय म्हणाले?

निवडणूक आयुक्त निवडण्यासाठी निवड समितीच्या बैठकीनंतर लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले, "या समितीमध्ये सरकारचे बहुमत आहे... केरळचे श्री कुमार आणि पंजाबचे श्री बी. संधू यांना नामनिर्देशित करण्यात आले आहे. निवडणूक आयुक्त पदासाठी. म्हणून निवड झाली आहे."

दक्षिण मुंबई लोकसभेवर भाजपसह शिवसेनेचा दावा

मुंबईत तीन जागांचा पेच अजून कायम आहे. दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम, उत्तर मध्य लोकसभा जागांवर तिढा कायम आहे.दक्षिण मुंबई लोकसभेवर भाजपसह शिवसेनेने दावा केला आहे. भाजपकडून राहुल नार्वेकर, तर शिवसेनेकडून यशवंत जाधव इच्छूक आहेत. उत्तर पश्चिममध्ये सध्या गजानन कीर्तिकर खासदार असले, तरी भाजपने दावा केला आहे. माजी खासदार संजय निरुपम यांना पक्षात घेउन उमेदवारी देण्याची चर्चा सुरू आहे. उत्तर मध्य लोकसभेत पूनम महाजन खासदार, त्यांच्या जागी नव्या चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता आहे.

मुंबई अजिंक्य! मुंबईने ४२व्यांदा कोरलं रणजी करंडकावर नाव, विदर्भाचा १६९ धावांनी पराभव

नुकताच रणजी करंडक स्पर्धेचा अंतिम सामना मुंबई आणि विदर्भ या संघांमध्ये खेळवला गेला. या सामन्यात मुंबईने विदर्भाचा १६९ धावांनी पराभव करत ४२व्यांदा या चषकावर नाव कोरलं आहे.

सुखबीर संधू आणि ज्ञानेश कुमार यांची निवडणूक आयुक्तपदी निवड

सुखबीर संधू आणि ज्ञानेश कुमार यांची निवडणूक आयुक्तपदी

दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण शरद पवारांच्या भेटीला

दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे शरद पवारांच्या भेटीला आले आहेत. त्यामुळे ते आता शरद पवार गटात पक्षप्रवेश करणार का? असा प्रश्नही निर्माण होतोय.

नीलेश लंके परत येणार असतील तर त्यांचं स्वागतच- संजय राऊत

नीलेश लंके शरद पवार गटात जाणार, अशा चर्चांना सध्या उधाण आलय. अशातच संजय राऊत यांनी यावर प्रतिकिया दिली. नीलेश लंके जर परत येणार असतील, तर त्यांचं स्वागतच केलं जाईल, असं ते म्हणाले.

भास्कर जाधव तुम्ही एकटे नाहीत...- उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी गुहागर येथील सभेत भास्कर जाधव यांची पाठराखण केली. ते म्हणाले की, "भास्कर जाधव तुम्ही एकटे नाहीत, आपला सर्व पक्ष तुमच्या पाठीशी आहे."

Sambhaji Nagar: ८७ वाळूमाफियांना नोटिस

Kannad: अवैध वाळूच्या पैशांवर प्रबळ झालेल्या वाळू माफियांवर कायद्याचा वचक बसण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी संतोष गोरड यांनी कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्या अंतर्गत तहसीलदार विद्याचरण कडवकर यांना तालुक्यातील ८७ वाळू माफियांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले.

ED News: उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्लीत 13 ठिकाणी ईडीने टाकले छापे

उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्लीत 13 ठिकाणी ईडीने छापे टाकले. माजी कॅबिनेट मंत्री गायत्री प्रजापती यांच्याशी संबंधित चालू असलेल्या वाळू उत्खनन प्रकरणाच्या संदर्भात (ईडीने) हे छापे टाकले.

Nagpur:  वाळू चोरट्यांपुढे प्रशासन हतबल, अवैध वाळू उत्खनन जोमात

Nagpur:  कामठी तालुक्यात वाळू चोरट्यांचे चांगलेच फावले आहे. चोरट्यांना जागोजागी आपले अड्डे तयार केले असून प्रशासन त्यांच्यापुढे हतबल झाल्याचे दिसून येते. वाळू चोरट्यांवर कधी अंकुश बसणार, असा सवाल करण्यात येत आहे.

Nagpur Stand Stealing: वाळू चोरट्यांपुढे प्रशासन हतबल, अवैध वाळू उत्खनन जोमात;

कामठी तालुक्यात वाळू चोरट्यांचे चांगलेच फावले आहे. चोरट्यांना जागोजागी आपले अड्डे तयार केले असून प्रशासन त्यांच्यापुढे हतबल झाल्याचे दिसून येते. वाळू चोरट्यांवर कधी अंकुश बसणार, असा सवाल करण्यात येत आहे.

Navi Mumbai News: आठ बांगलादेशींना बेलापुरातून अटक; विभागाला मिळालेली महत्वाची माहीती!

नैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने बेलापूर येथील शहाबाज गावातील इमारतीतून बेकायदा वास्तव्यास असलेल्या आठ बांगलादेशींना अटक केली आहे.

Sharad Pawar: केंद्र सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करतय

केंद्र सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर केंद्र सरकारने अन्याय केला आहे असे सभेत शरद पवार म्हणाले.

Nilesh Lanke: माझं अजून कुणाशीही बोलणं झालेलं नाही- निलेश लंके

पक्षांतर, पक्ष याचा काही सध्या विषय नाही. आम्ही दादासोबतच आहोत. माझं अजून कुणाशीही बोलणं झालं नाही. जनतेचा कौल पाहून निर्णय घेणार, असं निलेश लंके म्हणाले आहेत.

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या सभेत थेट आमदालाच धक्काबुक्की

राहुल गांधी यांच्या नाशिकमधील सभेत आमदार जेपी गावित यांना धक्काबुक्की झाली आहे. व्यासपीठावर जाण्यापासून गावित यांना पोलिसांनी रोखलं आणि त्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचं सांगण्यात येतं. ओखळ सांगितल्यानंतर त्यांना प्रवेश देण्यात आला.

Union Home Minister Amit Shah: सीएए कधीच मागे घेतले जाणार नाही- अमित शाह

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एएनआयला मुलाखत दिली. त्यात ते म्हणालेत की, आता सीएए कधीही मागे घेतले जाणार नाही.

Rahul Gandhi Yatra: राहुल गांधींच्या यात्रेत शरद पवार- उद्धव ठाकरे होणार सहभागी?

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात आली आहे. त्यांनी काल नंदुरबार, धुळे येथे सभा घेतली. आज होणार असलेल्या सभेत शरद पवार किंवा उद्धव ठाकरे सहभागी होण्याची शक्यता आहे.

One Nation One Election: 'एक देश एक निवडणूक'चा अहवाल आज राष्ट्रपतींकडे होणार सादर

'एक देश एक निवडणूक'चा अहवाल आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सादर केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समितीने २०१९ मध्ये 'एक देश एक निवडणूक' शक्य असल्याची शिफारस केली आहे.

Pratibhatai Patil : देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची तब्येत बिघडली; पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू

पुणे : देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची तब्येत बिघडल्याची माहिती आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. सध्या डॉक्टरांकडून प्रतिभाताई पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रतिभाताई पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. २००७ ते २०१२ त्यांनी राष्ट्रपतीपद भूषवलंय.

Subhashrao Shinde Passed Away : शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांचं निधन, शिंदेवाडीत आज अंत्यसंस्कार

फलटण शहर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते सुभाषराव तुकाराम शिंदे (वय ७८) यांचे पुणे येथे काल सायंकाळी सहाच्या सुमारास उपचारादरम्यान निधन झाले. शरद पवार यांचे निष्ठावान समर्थक म्हणून त्यांची राज्यभर ओळख होती. फलटण येथील जिद्द बंगल्यावर आज (ता. १४) सकाळी आठ वाजता त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सकाळी ११च्या सुमारास शिंदेवाडी (ता. फलटण) येथे त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Uniform Civil Code : समान नागरी संहिता विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंजुरी

डेहराडून : उत्तराखंडच्या समान नागरी संहिता (UCC) विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंजुरी मिळाली आहे. यासह आता समान नागरी संहितेचा कायदा करण्यात आला आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर, उत्तराखंड हे UCC लागू करणारे पहिले राज्य बनले आहे. यासाठी, उत्तराखंड सरकारने समान नागरी संहिता लागू करण्यासाठी नियम/उपविधी बनवण्यासाठी 5 सदस्यीय समिती स्थापन केली आहे.

Farmers Agitation : दिल्लीच्या रामलीला मैदानावर आज शेतकऱ्यांची महापंचायत; अटी-शर्तींसह 5 हजार लोकांना एकत्र येण्याची परवानगी

दिल्लीतील रामलीला मैदानावर आज संयुक्त किसान मोर्चाची मोठी किसान महापंचायत होणार आहे. किसान महापंचायत सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत होणार आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी राजधानीच्या सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त ठेवला आहे. दिल्ली पोलिसांनी कठोर अटींसह किसान महापंचायत आयोजित करण्यास मान्यता दिली आहे.

Ambabai Temple Kolhapur : करवीर निवासिनी अंबाबाई मूर्तीची आजपासून सलग दोन दिवस होणार पाहणी

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीची आज (गुरुवार) पासून पाहणी होणार आहे. पुरातत्त्व खात्याचे निवृत्त अधीक्षक विलास मांगीराज व आर. एस. त्र्यंबके सलग दोन दिवस पाहणी करतील.

Ratnagiri News उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे आज रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर

Latest Marathi News Live Update : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर ‘अहिल्यानगर’ असे करण्यास मंजुरी देण्यात आलीये. तर, भाजपने लोकसभेसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीची आजपासून पाहणी होणार आहे. त्याचबरोबर ‘वंचित’ला चार जागा देण्याची शरद पवार यांनी तयारी दर्शविली आहे. तसेच देशातील विविध राज्यांत वातावरणात बदल जाणवत असून काही ठिकाणी पाऊस पडत आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com