Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

महायुतीतर्फे खासदार उदयनराजे भोसले हे आज (गुरुवार) रॅलीद्वारे जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live UpdateEsakal

साताऱ्यातून प्रशांत कदम यांना 'वंचित'ची उमेदवारी

सातारा लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने प्रशांत कदम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. वंचितची सहावी यादी शुक्रवारी जाहीर झाली.

चंद्रकांत खैरेंनी केली निवृत्तीची घोषणा

छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. पुढची निवडणूक आपण लढणार नसल्याचं ते म्हणाले.

हैदराबादचे लोक भाजपला स्वीकारणार नाहीत- ओवैसी

हैदराबादच्या लोकांनी भाजपचे हेतू पाहिले आहेत. ते भाजप-आरएसएसला स्वीकारणार नाहीत. ते तेलंगणातील शांततेच्या विरोधात आहेत, अशी टीका एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केली.

ईडीने कोर्टात खोटं सांगितलं- आतिशी

अरविंद केजरीवाल हे जेवणामध्ये सातत्याने गोड पदार्थ आणि चहा घेत आहेत, असा दावा ईडीने कोर्टात केला होता. त्यावर आपच्या मंत्री आतिशी यांनी प्रतिक्रिया दिली असून ईडीने कोर्टात खोटी माहिती दिल्याचं म्हटलं आहे.

माढ्यात कट्टर विरोधक येणार एकत्र

माढा लोकसभा निवडणूकीसाठी मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक उत्तम जानकर हे राष्ट्रवादीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पुण्यातील वाघोलीत कोसळल्या त्या होर्डिंग प्रकरणी होर्डिंग मालकाला नोटीस

वाघोली : वाघोलीतील साई सत्यम पार्क परिसरात होर्डिंग कोसळल्या प्रकरणी नगररोड क्षेत्रीय कार्यालयाने होर्डिंग मालकाकडुन नोटीसीद्वारे केवळ खुलासा मागविला आहे. तर नुकसान झालेल्या कार मालकानी पोलीसात तक्रार दिली आहे. या दुर्घटनेत जिवीतहानी झाली नसली तरी प्रशासनला मात्र गांभीर्य नाही. यापूर्वीही शहरात अशा प्रकारच्या दोन दुर्घटना घडून बळी गेले आहेत.

Lok Sahba Election : लहान असल्यापासून बघतोय....; संजयकाका पाटलांचा विशाल पाटलांचा टोला 

लहान असल्यापासून बघतोय, परिपक्व नसलेला नेतृत्व आहे अशा शब्दात संजय काका पाटील यांनी विशाल पाटील यांना टोला लगवाला. सांगली येथे महायुतीची सभा सुरू असून या सभेत संजयकाका पाटील बोलत आहेत.

मुरलीधर मोहोळ यांच्या विरुद्ध काँग्रेसची तक्रार

पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या विरुद्ध काँग्रेसतर्फे आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुरलीधर मोहोळ यांनी वर्तमानपत्राच्या माध्यमातून "राम मंदिर झाले आता राष्ट्रमंदिरासाठी संकल्प करूयात" या मथळ्याखाली जाहिरात करून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येतील राममूर्तीच्या पाया पडत आहेत असे छायाचित्र असलेली पत्रके वाटली.

याप्रकरणी माजी आमदार मोहन जोशी व काँग्रेसचे सोशल मीडिया राज्य समन्वयक चैतन्य पुरंदरे यांनी सांगितले की, " राम मंदिराला निवडणुक प्रचाराचा मुद्दा बनवून याद्वारे धार्मिक प्रलोभन दाखवून मोहोळ यांनी मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे."

आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी पुरंदरे यांनी मोहोळ यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यावर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने पुरंदरे यांची भेट घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले असल्याचे कॉग्रेस कडून सांगण्यात आले आहे.

DRDO चे आणखी एक यश

DRDO ने ओडिशाच्या किनाऱ्याजवळील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी श्रेणी (ITR) येथून स्वदेशी तंत्रज्ञान क्रूझ क्षेपणास्त्र (Indigenous Technology Cruise Missile) ची यशस्वी उड्डाण चाचणी केली.

Rahul Gandhi: भाजपकडून एक इतिहास, एक भाषा लादण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा दावा

भाजप हे लोकांव एक इतिहास, एक भाषा लादण्याचा प्रयत्न करत आहे, असा दावा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

Sunetra Pawar: सुनेत्रा पवार यांनी अर्ज केला दाखल; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री होते उपस्थित

सुनेत्रा पवार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते.

तटकरेंनी दाखल केला अर्ज

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी रायगड मतदारसंघातून आज अर्ज दाखल केले.

आमदार देवयानी फरांदे धमकी प्रकरणी पोलिसांकडून संशयिताला अटक

सोशल मीडियावर आमदार देवयानी फरांदे यांना धमकी प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. नाशिक पोलिसांकडून धमकी देणाऱ्या संशयिताला अटक करण्यात आली आहे. भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. आमदार देवयानी फरांदे यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली होती. गुस्ताख का साथ देने वाला बी गुस्ताख है, अशा आशयाखाली पोस्ट व्हायरल केल्या होत्या.

काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे आज भरणार अर्ज

सोलापूर लोकसभा काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. प्रणिती शिंदे आज शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरायला निघाल्या आहेत. रोड शो करत प्रणिती शिंदे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात

गुरुवारी दुपारी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात झाला. यामध्ये गाडीतील २ जण जागीच ठार, तर ३ जण गंभीर जखमी झाले. दरम्यान चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. महामार्गावरील साईड बॅरियरला तोडून गाडी उलटली आणि त्यामुळे भीषण अपघात झाला.

श्रीकांत शिंदेंसाठी प्रचारासाठी पप्पू कलानी मैदानात

श्रीकांत शिंदेंसाठी प्रचारासाठी पप्पू कलानी मैदानात उतरले आहेत. पप्पू कलानी आणि शिंदे सोबत आल्याने कार्यकर्ते, नागरिकांची गर्दी झाली आहे.

ED NEws: ईडीने राज कुंद्रांची कोट्यवधींची मालमत्ता केली जप्त

ईडीने राज कुंद्रांची कोट्यवधींची मालमत्ता जप्त केली आहे. बीटकॉइन प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. एकूण ९७.७९ कोटी रुपयांची मालमत्ता इडीने जप्त केली.

Narayan Rane: नितेश राणेंनी मानले सामंतांचे आभार

मंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांनी आज ते नारायण राणे यांना समर्थन देतीत असे जाहीर केले. पत्रकार परीषद घेत यांनी आपली भुमिका स्पष्ट केली.पत्रकार परीषद संपताच भाजप आमदार नितेश राणे यांनी दोघांना फोन केला आणि सामंतांचे आभार मानले

Shivsena Uday Samant: उदय सामंत यांची मोठी घोषणा

उदय सामंत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. महायुतीमध्ये तेढ निर्माण होऊ देणार नाही. नारायण राणे उमेदवार असले तरी त्यांचे काम करणार असं ते म्हणाले आहेत. त्यामुळे नारायण राणे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

मुंबईत गोदामाला मोठी आग

दक्षिण मुंबईत गोदामाला मोठी आग लागली आहे. यावेळी यामागचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही.

Shivsena: विदर्भ, मराठवाड्यात गोविंदा शिवसेनेचे स्टार कॅम्पेनर

Mumbai News: शिवसेनेत अलीकडे प्रवेश केलेले अभिनेते गोविंदा शिवसेनेसाठी स्टार प्रचारक ठरले आहेत. विदर्भ, मराठवाड्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्यानंतर गोविंदा पक्षासाठी क्राऊड पुलरची भूमिका बजावत आहेत. गेल्या १० दिवसांत त्यांनी १० पेक्षा अधिक रोड-शो, प्रचारसभा केल्या आहेत.

Ajit Pawar Vs Eknath Shide: अजित पवारांच्या येण्याने शिंदे गटाला फटका; तीन ते चार जागांवर नुकसान

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आतापर्यंत लोकसभेच्या दहा जागी आपले उमेदवार घोषित केले आहेत. मात्र अजूनही ते तीन ते चार जागांसाठी महायुतीत संघर्ष करत असल्याचे चित्र आहे. आधी २० ते २२ जागा लढवण्याची शक्यता असलेल्या शिंदे गटाला प्रत्यक्षात तेरा ते चौदा जागाच लढवाव्या लागत आहेत. त्याही मिळवताना त्यांना प्रचंड दमछाक होत आहे. विशेषतः अजित पवारांचा महायुतीत समावेश झाल्यानंतर शिंदे गटाला हक्काच्या जागांवर पाणी सोडावे लागल्याने ही घालमेल वाढली आहे.

chhatrapati sambhaji nagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्यातील पहिली चारा छावणी

छ. संभाजीनगरमधील गंगापूर तालुक्यातील खोजेवाडी येथे पहिली चारा छावणी सुरु करण्यात आली आहे. भाजप नेते प्रशांत बंब यांनी ही चारा छावणी सुरु केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास ५०० जनावरे छावणीत दाखल झाले आहेत.

Maharashtra Politics: महायुतीची आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद

महायुतीची आज मुंबईमध्ये संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. जागावाटपाच्या फॉर्म्युलाबाबत या पत्रकार परिषदेमध्ये घोषणा होऊ शकते.

Jay Pawar: जय पवार शेकडो गाड्या घेऊन पुण्याच्या दिशेने रवाना

जय पवार सुनेत्रा पवार यांचा प्रचार करण्यासाठी पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत शेकडो गाड्या आहेत. आज सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

Election Commission : पहिल्या टप्प्यातील मतदानाला उद्या होणार प्रारंभ

पहिल्या टप्प्यातील मतदान उद्या १९ एप्रिलला होत आहे. 21 राज्यांतील 102 लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार, लोकसभा निवडणूक सात टप्प्यात होणार आहे. 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत.

राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांनी घेतलं पुण्यातील दगडूशेठ गणपतीचं दर्शन

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी व बारामती राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन पूजा केली. खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्या आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Lok Sabha Elections : मोदी शनिवारी पुन्हा कर्नाटक दौऱ्यावर

बंगळूर : लोकसभा निवडणुकीसाठी कर्नाटकात प्रचाराला वेग देणाऱ्या भाजप-धजद आघाडीच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा राज्यात निमंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. २० एप्रिल रोजी ते राज्याचा दौरा करणार आहेत. ते चिक्कबळ्ळापूर आणि बंगळूरमध्ये पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार करणार आहेत.

CS Exam : सीएस परीक्षा अर्जांसाठी मुदतवाढ

पुणे : कंपनी सेक्रेटरी (सीएस) एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल जून २०२४ परीक्षांच्या अर्जासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. भारतीय कंपनी सचिव संस्थेने (आयसीएसआय) ऑनलाइन नोंदणीसाठी विंडो पुन्हा उघडण्याची घोषणा केली आहे.

Sangli Lok Sabha : शिंदे, फडणवीसांसह, पवार आज सांगलीत

सांगली : येथील स्टेशन चौकात आज (ता. १८) दुपारी अडीच वाजता भाजपचा मेळावा होणार असून, त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत. सभेस महायुतीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे. तत्पूर्वी महायुतीचा उमेदवार म्हणून मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, अशी माहिती खासदार संजय पाटील यांनी दिली.

Satara Lok Sabha : उदयनराजेंसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज साताऱ्यात

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीतर्फे खासदार उदयनराजे भोसले हे आज (गुरुवार) रॅलीद्वारे जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याची जय्‍यत तयारी त्‍यांच्‍या समर्थकांनी केली आहे. सकाळी दहा वाजता गांधी मैदानावरून रॅलीस प्रारंभ होणार असून, अर्ज भरण्यासाठी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे उपस्‍थित राहणार आहेत.

कोकणसह कोल्हापूर, सांगली, मिरजेत तुफान गारांसह वादळी पावसाची हजेरी

Latest Marathi News Live Update : सातारा लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीतर्फे खासदार उदयनराजे भोसले हे आज (गुरुवार) रॅलीद्वारे जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सांगलीतील स्टेशन चौकात दुपारी अडीच वाजता भाजपचा मेळावा होणार असून, त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत. कोकणासह कोल्हापूर, सांगली, मिरज शहरात तुफान गारांसह वादळी पावसाने हजेरी लावली. विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील जांभुळवाडी फाट्याजवळ चारचाकीने खासगी बसला मागून धडक दिल्याने सातजण ठार झाले. कंपनी सेक्रेटरी (सीएस) एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल जून २०२४ परीक्षांच्या अर्जासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. माजी मंत्री आणि आमदार एकनाथ खडसे यांना दाऊद इब्राहिम व छोटा शकील यांच्या नावाने जीवे मारण्याच्या धमकीचे फोन आल्याने खळबळ निर्माण झाली आहे. तसेच देशातील वातावरणात बदल जाणवत असून काही भागांत पाऊस पडत आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com