Latest Marathi News Update : दिवसभरातील सर्व बातम्या वाचा एका क्लिकवर...

दक्षिण महाराष्ट्राचा भाग आणि कोकणात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live Update Sakal

सेक्स एस्कॉर्टच्या नावावर होतेय तरुणांची फसवणूक

पुणे : सायबर चोरट्यांनी तरुणाचा फोटो मॉर्फ करून त्याला टेलीग्रामवर सात-आठ अश्लील फोटो पाठवले. त्यानंतर ते फोटो आई-वडिलांना पाठविण्याची धमकी दिली. तसेच, सेक्स एस्कॉर्टची सेवा वापरल्याचे सांगून तरुणाकडून ७८ हजार रुपये उकळले. अशा प्रकारच्या घटनांवरून सेक्स एस्कॉर्टच्या माध्यमातून तरुणांना लुबाडण्याचा प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे. 

सलमानच्या घराबाहेर गोळीबार करण्यापूर्वी शूटरने 100 मीटर अंतरावर बाईक थांबवली अन्...

14 एप्रिल रोजी अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबाराची घटना गोळीबार करण्यापूर्वी शूटरने सलमान खानच्या निवासस्थानापासून 100 मीटर अंतरावर बाईक थांबवली आणि चालत गेले. सलमान खानच्या घराबाहेर कोणीही नसल्याचे पाहून शूटरने बाईकवर येऊन गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला : मुंबई गुन्हे शाखा

खासगी जलतरण तलावात आठवीत शिकणाऱ्या मुलाचा बुडून मृत्यू

खराडी येथील एका खासगी जलतरण तलावात आठवीत शिकणाऱ्या एका मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. जलतरण तलावात जीव रक्षक उपस्थित नसल्यामुळे आणि येथील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे जलतरण तलाव संचालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पालकांनी केली आहे

कांकेरमधील चकमकीत २९ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले

कांकेर जिल्ह्यातील छोटेबेठिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगल परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत २९ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत.

पुण्यातील लोहगाव, बाणेर-बालेवाडीत जोरदार पावसाला सुरुवात

पुण्यातील लोहगावात मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली असून बाणेर-बालेवाडी येथे देखील वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. यासबोतच सिंहगड रस्ता घोरपडी परिसरात देखील रिमझिम पाऊस सुरू आहे.

 पुणे शहरात ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरूवात

पुणे शहरात पावसाच्या सरी पडत असून ढगाच्या गडगडाटासह उपनगरात पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसापासून हवेत उकाडा जाणवात होता. दरम्यान पावसाच्या सरी आल्याने पुणेकरांनाै उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळणार आहे.

छत्तीसगढमध्ये १८ नक्षलवाद्यांना कंठस्नान; अद्यापही चकमक सुरू

छत्तीसगढमध्ये  सुरक्षा यंत्रणा आणि नक्षलवाद्यामध्ये जोरदार चकमक सुरु असून आत्तापर्यंत १८ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या चकमकीत चकमकीत आतापर्यंत एकूण तीन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत.

गडकरींकडून आदर्श आचारसंहितेचा भंग? गडकरी, आमदार मोहन मतेंवर गुन्हा नोंदवण्याची काँग्रेसची मागणी

मुंबई : भारतीय जनता पक्ष सर्वकायदे धाब्यावर बसवून सातत्याने आचारसंहितेचा भंग करत आहे. भारतीय जनता पक्षाचे नागपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नितीन गडकरी व आमदार मोहन मते यांनी आदर्श आचारसंहितेचे उघडपणे उल्लंघन केले आहे. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी भगवान श्रीरामाची पोस्टर्स वापरून आचारसंहितेचा भंग केल्याने नितीन गडकरी यांची उमेदवारी रद्द करा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

छत्तीसगडमध्ये पोलिस अन् नक्षलवाद्यांमध्ये सुरु असलेल्या चकमकीत आणखी एक सुरक्षा कर्मचारी जखमी

छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत आणखी एक सुरक्षा कर्मचारी जखमी झाला आहे. छोटेबेठिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगल परिसरात चकमक सुरू आहे अशी माहिती आयजी बस्तर पी सुंदरराज यांनी दिली आहे. दरम्यान या चकमकीत आतापर्यंत एकूण तीन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सलमानच्या घरी; गोळीबारच्या घटनेनंतर घेतली भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे स्थित गेलेक्सी अपार्टमेंट या निवासस्थानी जाऊन त्याची भेट घेतली. यावेळी सलमान खान याचे वडील ज्येष्ठ पटकथाकार सलीम खान हेदेखील उपस्थित होते. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी सलमान आणि त्याच्या कुटूंबियांना त्यांच्या सुरक्षिततेची हमी दिली. तसेच त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असल्याचेही सांगितले.

सलमान याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराचा घटनेनंतर दोनच दिवसात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने यातील दोन आरोपींना अटक केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी खान कुटूंबियांची भेट घेऊन त्यांना त्यांच्या सुरक्षिततेची हमी दिली आहे. यावेळी माजी आमदार बाबा सिद्दीकी, आमदार झिशान सिद्दीकी आणि युवासेनेचे राहुल कनाल हेदेखील उपस्थित होते.

लोकसभेच्या प्रचारासाठी शरद पवार घेणार 22 दिवसात 50 सभा

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सध्या जोर आला आहे. यादरम्यान राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार देखील प्रचारासाठी राज्याचा मॅरेथॉन दौरा करणार आहेत. शरद पवारांच्या 22 दिवसात 50 सभा होणार आहेत. तर १७ तारखेला शरद पवार नगरला मुक्कामी असणार आहेत.

18 एप्रिलपासून बारामतीतून सभांना सुरुवात होणार असून ११ मेपर्यंत राज्यभरात मॅरेथॉन दौरा असेल. या काळात पवार दिवसाला तीन ते चार सभा घेणार आहेत.

Salman Khan: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार सलमान खानची भेट 

Salman Khan: अभिनेता सलमान खान याच्या भेटीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे वांद्रे येथील निवासस्थानी पोहोचणार आहेत. मुंबई पोलिसांकडून या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे दोन दिवसापूर्वी सलमान खान यांच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांची घरी जाऊन भेट घेतली होती त्यानंतर आता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील वांद्रे येथील सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट या निवासस्थानी भेट घेण्यासाठी दाखल होणार आहेत.

Pune: पुण्यातील बुधवार पेठ परिसरात दुमजली इमारतीला लागली आग

Pune: पुण्यातील बुधवार पेठ परिसरात दुमजली इमारतीला आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून अग्निशमन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.

यूपीएससीचा निकाल जाहीर; आदित्य श्रीवास्तव देशात प्रथम

यूपीएससीचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये आदित्य श्रीवास्तव देशात रँक एक आला आहे.महाराष्ट्रातील उमेदवारांचा देखील यादीमध्ये समावेश आहे. पहिल्या १०० जणांच्या यादीमध्ये अनिकेत हिरडे याचे नाव असून त्याची रँक ८१ आहे. महाराष्ट्रातील प्रियांका सुरेश मोहिते हिचा रँक ५९५ आला आहे, तर अर्चित डोंगरे याचा रँक १५३ आहे.

माढ्याचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भरला उमेदवारी अर्ज

माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. मोजक्याच कार्यकर्त्यांना सोबत घेऊन उमेदवारी अर्ज भरला आहे. शेतकरी, विद्यार्थी, सर्वसामान्य जनतेसाठी ही लढत असेल, असं धैर्यशील यांनी सांगितलं आहे.

भाऊ रंगारी गणपती मंदिराजवळ जुन्या वाड्याला आग

भाऊ रंगारी गणपती मंदिराजवळ जुन्या वाड्याला आग लागली आहे. वाड्यातील गोडाऊन मधील मालाचे नुकसान झाले आहे. अग्निशामक दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Rahul Gandhi : निवडणूक रोखे ही पंतप्रधान मोदींची मास्टर स्किम

निवडणूक रोखे ही पंतप्रधान मोदी यांची मास्टर स्किम आहे. ही मोदींची आयडिया होती. त्यांना पारदर्शकता ठेवायची होती, तर त्यांनी नावे का लपवून ठेवली असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.

Devendra Fadanvis: ऊसतोड कामगाराच्या मुलाला उमेदवारी दिली-देवेंद्र फडणवीस

राम सातपुते यांचे वडील आमदार, मंत्री नव्हते. एका ऊसतोड कामगाराच्या मुलाला उमेदवारी देण्यात आली आहे, असं देवेंद्र फडणवीस सोलापुरातील रॅलीमध्ये म्हणाले आहेत. सातपुते यांचा अर्ज भरताना शक्तीप्रदर्शन करण्यात आलं आहे.

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांच्याकडून मशाल चिन्हाबाबत गीत लाँच

उद्धव ठाकरे यांनी आज मशाल गीत लाँच केलं आहे. यावेळी ते म्हणाले की, अंधेरी पोटनिवडणूक जिंकून आपण विजयी सुरुवात केली आहे

Salman Khan: सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींची सुनावणी समाप्त

सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींची सुनावणी समाप्त झाली आहे. पोलिसांनी १४ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे. कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे. यात आंतरराष्ट्रीय रॅकेटचा सहभाग असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. आरोपी पनवेल फार्म हाऊसच्या जवळ घर भाड्याने घेऊन रहात आल्याचा पोलिसांनी खुलासा केला आहे. सांताक्रुझ रेल्वे ट्रॅक जवळ त्यांनी कपडे बदलले आणि पसार झाले

Mumbai News: सीएसएमटी स्थानकातून 40 लाख रुपयांची रोकड जप्त

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर-मुंबई दुरांतो एक्सप्रेस मधून लाखो रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. जीआरपी आणि आरपीएफने ही संयुक्त कारवाई केली आहे. कपड्याच्या पार्सल पाठवण्याच्या नावाखाली रोकड पाठवण्यात आली होती. आरपीएफला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आलीये.

शिवसेना पक्ष, चिन्हाबाबत 6 मे ला सुनावणी

शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात 6 मे रोजी सुनावणी होणार आहे.

दुष्काळसंबंधी मनसेचे शिष्टमंडळ घेणार राज्यपालांची भेट.

बाळा नांदगावकर आणि मनोज चव्हाण यांच्या नेतृत्वात मनसेचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे. राज्यात अनेक ठीकाणी दुष्काळ आहे, अनेक भागात पिण्यासाठी पाणी नाही त्यामुळे सरकारकडून उपाययोजन लवकर करण्यात याव्यात म्हणून ही भेट घेतली जाणार आहे.

कोल्हापूरात महाविकास आघाडीचे शक्तीप्रदर्शन

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महाविकास आघाडीने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. थोड्याच वेळात हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.

नक्षलग्रस्त भागात मतदान पथके रवाना

विजापूरमधील नक्षलग्रस्त भागात मतदान पथके रवाना झाली आहेत. जिल्हाधिकारी आणि पोलिसांनी निवडणुका शांततेत पार पाडण्याचे आश्वासन दिले आहे.

PM Modi: पंतप्रधान मोदींची मुलाखत ही स्क्रिप्टेड; संजय राऊतांचा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्व भाषणं, मुलाखती स्क्रिप्टेड असतात. त्यांनी भ्रष्टाचाराबाबत खोट्या घोषणा दिल्या. निवडणूक रोखे हा सर्वात मोठा घोटाला आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

ORF report: २०२८ पर्यंत रोजगारात २२ टक्क्यांनी वाढ होणार- ORF चा अहवाल

सेवा क्षेत्रामध्ये सर्वाधिक नोकऱ्यांची निर्मिती होईल. २०२८ पर्यंत रोजगाराच्या संधीमध्ये २२ टक्क्यांनी वाढ होईल असा अहवाल ओआरएफने दिला आहे. त्यामुळे ही एक दिलासादायक माहिती आहे.

सांगलीत विशाल पाटलांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नेते विशाल पाटलांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. सांगलीमध्ये महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे

Mumbai Water News: धारावी, वांद्रे, माहीमध्ये तब्बल २ दिवस येणार नाही पाणी

Maharashtra News: धारावी नवरंग कम्पाउंड येथील २४०० मिलिमीटर व्यासाच्या अप्पर वैतरणा प्रमुख जलवाहिनी व ४५० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनीच्या जल जोडणीचे काम गुरुवारी (ता. १८) सकाळी १० वाजेपासून शुक्रवारी (ता. १९) पहाटे ४ वाजेपर्यंत केले जाणार आहे. यामुळे या १८ तासांच्या कालावधीत धारावी, वांद्रे, माहीमच्या काही भागांत शंभर टक्के, तर काही भागांत २५ टक्के पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या काळात पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेने केले

Mumbai ST : उन्हाळी सुट्टीसाठी लालपरीला पसंती

उन्हाळी सुटीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने जादा वाहतुकीचे नियोजन केले आहे. त्यानुसार उन्हाळी सुट्ट्यांच्या कालावधीत मुंबई विभागातील मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, पनवेल, उरण या आगारांतून सरासरी ५० हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. 

Kolhapur Lok Sabha : काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज आज शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल करणार

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आज (ता. १६) शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार आहेत. ऐतिहासिक दसरा चौकातून त्यांच्या रॅलीला सुरुवात होईल. यावेळी महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. यात माजी खासदार संभाजीराजे, मालोजीराजे, संयोगिता राजे, मधुरिमाराजे, शहाजीराजे, यशराजे हे देखील सहभागी होणार आहेत.

Ranji Cricket Team : माजी रणजीपटू सुभाष कंग्राळकर यांचे निधन

बेळगाव : बेळगावचे सुपुत्र आणि गोवा रणजी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुभाष कंग्राळकर (वय ७४) यांचे सोमवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तानाजी गल्लीचे रहिवाशी व गोवा कर्मभूमी होती. सोमवारी दुपारी १२: ३० वाजता सदाशिवनगर स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.

Madha Lok Sabha Constituency : रणजितसिंह, धैर्यशील मोहिते माढ्यातून आज भरणार अर्ज

फलटण शहर : माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे आज (मंगळवार) सोलापूर येथे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी ते जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील हेही आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Kolhapur Ambabai : करवीर निवासिनी अंबाबाईचे आजपासून पूर्ववत दर्शन होणार सुरू

कोल्हापूर : येथील करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाली. आज (मंगळवार) सकाळी धार्मिक विधीनंतर देवीचे दर्शन पूर्ववत सुरू होणार आहे. दरम्यान, गेले दोन दिवस मूर्तीच्या संवर्धनाची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे भविकांना मूळ मूर्तीचे दर्शन बंद होते. पितळी उंबऱ्याबाहेरून उत्सवमूर्ती आणि कलशाच्या दर्शनाची सुविधा भाविकांसाठी देण्यात आली.

अभिनेता Salman Khan च्या निवासाबाहेर गोळीबार; 2 आरोपींना गुजरातच्या भुजमधून अटक

मुंबई : अभिनेता सलमान खानच्या (Actor Salman Khan) वांद्रे पश्चिम येथील निवासस्थानाबाहेर 14 एप्रिल रोजी गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केलीये. या आरोपींना मंगळवारी गुजरातच्या भुज जिल्ह्यातून (Bhuj Gujarat) पकडण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी (Mumbai Crime Branch) दिली. या आरोपींबाबत अधिक तपशील पोलिस लवकरच उघड करतील. दरम्यान, गोळीबारानंतर मुंबईतून पळून गेलेल्या दोन्ही व्यक्तींना गुजरातमधील भुज शहरात अटक करण्यात आली असून पुढील तपासासाठी त्यांना मुंबईला पाठवण्यात येणार आहे.

Weather Update : यंदा महाराष्ट्रात धो-धो पाऊस बरसणार

Latest Marathi News Live Update : यंदा महाराष्ट्रात धो-धो पाऊस बरसणार आहे. दक्षिण महाराष्ट्राचा भाग आणि कोकणात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी बंडाचा झेंडा फडकावल्याच्या पार्श्‍वभूमीवर आज प्रदेश काँग्रेस नेत्यांनी आमदार विश्‍वजित कदम, आमदार विक्रम सावंत आणि शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना नागपूरला बोलावून घेतले आहे. कोल्हापुरात करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाली असून आज सकाळी धार्मिक विधीनंतर देवीचे दर्शन पूर्ववत सुरू होणार आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे आज सोलापूर येथे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उदयनराजे गुरुवारी (ता. १८) उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे. तसेच देशातील वातावरणात बदल जाणवत असून काही भागांत पाऊस पडत आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com