Latest Marathi News Update: दिवसभरातील देश अन् राज्यातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलनास हिंसक वळण लागले आहे.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live UpdateSakal

गुलमर्ग हिमस्खलन: सात जणांना वाचवण्यात यश, भारतीय लष्कराच्या हिमस्खलन बचाव पथकाची तत्पर कारवाई

गुलमर्ग हिमस्खलन | गुलमर्ग बटालियनमधील भारतीय लष्कराच्या स्वत:च्या हिमस्खलन बचाव पथकाने (एआरटी) केलेल्या तत्पर कारवाईमुळे, सात जणांना वाचवण्यात आले, त्यामुळे आणखी जीवितहानी टाळण्यात आली. स्थानिक मार्गदर्शकासह एकूण 8 लोक हिमस्खलनात अडकले. भारतीय सैन्याच्या HAWS (हाय अल्टिट्यूड वॉरफेअर स्कूल) संघांना देखील सक्रिय करण्यात आले होते, ज्यामुळे बचावाचे प्रयत्न आणखी वाढले: भारतीय सैन्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरत जिल्ह्यातील काक्रापार अणुऊर्जा केंद्राला दिली भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरत जिल्ह्यातील काक्रापार अणुऊर्जा केंद्राला (KAPS) भेट दिली.

जम्मू-श्रीनगर महामार्गावर अडकलेल्या 80 हून अधिक विद्यार्थी आणि प्राध्यापकांची सुटका

जम्मूमध्ये जोरदार हिमवादळ आणि भूस्खलनानंतर, लष्कराच्या जवानांनी जम्मू-श्रीनगर महामार्गावर अडकलेल्या 80 हून अधिक विद्यार्थी आणि प्राध्यापक कर्मचाऱ्यांची सुटका केली, भारतीय लष्कराने ही माहिती दिली आहे.

West Bengal: पश्चिम बंगाल भाजप अध्यक्ष डॉ. सुकांता मजुमदार यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पश्चिम बंगाल: संदेशखळी येथे शाहजहान शेख याच्या अटकेच्या मागणीसाठी आंदोलनाला बसल्यानंतर पश्चिम बंगाल भाजप अध्यक्ष डॉ. सुकांता मजुमदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Odisha: ओडिशात ढेंकनाल जिल्ह्यात गोबिंदापूरजवळ रेल्वे इंजिनला आग

ओडिशात ढेंकनाल जिल्ह्यातील जोरांडा रोड रेल्वे स्थानकाच्या गोबिंदापूरजवळ रेल्वे इंजिनला आग लागली. ट्रेनला आग लागण्याचे कारण अस्पष्ट आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. त्या भागातील विद्युत कनेक्शन बंद करण्यात आले असून तो मार्ग इतर गाड्यांसाठीही बंद करण्यात आला आहे: अग्निशमन अधिकारी, ढेंकनाल प्रशांत ढाल

Latest Marathi News Live Update : कर्नाटकात मंदिरांवर कर; भाजपने केली टीका 

कर्नाटकात काँग्रेस सरकारने मंदिरांवर कर आकारण्यास सुरूवात केली आहे. यावरून भाजपच्या केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी टीका केली आहे.

IPL 2024 Schedule : CSK vs RCB ने श्रीगणेशा! मुंबई पहिल्याच सामन्यात गुजरातशी भिडणार

आयपीएल 2024 मधील पहिल्या 21 सामन्यांचे शेड्युल जाहीर झालं आहे. पहिला सामना हा चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोर यांच्यात 22 मार्चला होणार आहे.

Latest Marathi News Live Update : पुणे आंतराष्ट्रीय ड्रग्स तस्करी प्रकरणात हवाला मार्फत पैश्यांची देवाण घेवाण?

पुणे आंतराष्ट्रीय ड्रग्स प्रकरणात मोठी अपडेट आली आहे. पुणे आंतराष्ट्रीय ड्रग्स तस्करी प्रकरणात हवाला मार्फत पैश्यांची देवाण घेवाण झाल्याचा संशय वक्त केला जात आहे.

इतक्या मोठ्या प्रमाणात ऑर्डर कोण देत होते, त्याचा वापर नेमका कुठे कुठे केला गेला, त्यासाठीचे आर्थिक रसद कोणी व किती पुरवली याबाबत देखील चौकशी सुरू आहे. पुणे पोलिसांनी आत्तापर्यंत ३००० कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त केले आहेत.

Latest Marathi News Live Update : देशातील प्रत्येक मुलं म्हणतात मोदीने जे सांगितलं ते करून दाखवलं

गुजरातमधील नाव्हसारी येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशातील प्रत्येक मुलगा हा मोदी जे सांगतात ते करतून दाखवतात असं म्हणत आहेत. मोदींची गॅरेंटी म्हणजे गॅरेंटी पूर्ण होण्याची गॅरेंटी.

दिल्ली कॅपिटल्सचे पहिले दोन सामने होणार पुण्यात

दिल्ली कॅपिटल्स आयपीएल 2024 चे आपले पहिले दोन सामने पुणे आणि कटक येथे खेळण्याची शक्यता आहे. दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियम यावेळी उपलब्ध होण्याची शक्यता नाही. कारण अरूण जेटली स्टेडियमवर वुमन प्रीमियर लीगचा अंतिम सामना होणार आहे. आयपीएलच्या वेळापत्रकाची घोषणा आज होणार आहे.

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी केलं जंगी स्वागत

नवसारी येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जंगी स्वागत केलं. यावेळी गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील देखील उपस्थित होते.

West Bengal: खलिस्तानी मुद्द्यावर पश्चिम बंगालच्या राज्यपालांच पत्र चर्चेत

'खलिस्तानी' अपमानाच्या वादावर शीख शिष्टमंडळाला उत्तर देताना, पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस म्हणाले, "आमच्या पंजाबी बांधवांच्या भावना दुखावतील असे काहीही करू नये... बंगाल तुमच्या पाठीशी उभा आहे.”

Rahul Gandhi: सत्यपाल मलिका यांच्या 30 ठिकाणांवर सीबीआयने छापा टाकल्यानंतर  राहुल गांधी काय म्हणाले?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर  राहुल गांधी म्हणाले, माजी राज्यपाल खरे बोलत असतील तर त्यांच्या घरी सीबीआय पाठवा -ही मदर ऑफ डेमोक्रेसी? प्रमुख विरोधी पक्षाचे बँक खाते गोठवा - ही मदर ऑफ डेमोक्रसी? कलम 144, इंटरनेट बंदी, अश्रुधुराचे गोळे - ही मदर ऑफ डेमोक्रसी? मीडिया असो वा सोशल मीडिया, सत्याचा प्रत्येक आवाज दाबणार - ही मदर ऑफ डेमोक्रसी? मोदीजी, तुम्ही लोकशाहीची हत्या केली आहे हे जनतेला माहीत आहे आणि जनता त्याला उत्तर देईल. !"

Shivajirao Adhalarao Patil: म्हाडाचे नवनिर्वाचित अध्यक्ष आढळराव पाटील यांनी म्हाडाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली

म्हाडाचे नवनिर्वाचित अध्यक्ष आढळराव पाटील आज पाहिल्यादांच पुणे म्हाडा कार्यलयात दाखल झाले. पाटील यांनी म्हाडाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. म्हाडा अध्यक्षपद मिळाल्या नंतर आज पुण्यातील रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या कार्यलयात गेले, सोबत विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे ही उपस्थितीत होत्या. अधिकारी कर्मचारी यांनी केलं नवनिर्वाचित अध्यक्षांच स्वागत केलं. म्हाडा अध्यक्ष पद दिल्यानंतर राजकीय वर्तुळात आढळराव यांचा खासदारकी पत्ता कट झाल्याच्या चर्चा आहेत.

Sharmila Reddy : आंध्र प्रदेश काँग्रेस अध्यक्षा शर्मिला रेड्डी पोलिसांच्या ताब्यात

आंध्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा वाय. एस. शर्मिला रेड्डी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. विजयवाडामध्ये त्या 'चलो सचिवालय' मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या.

Thane School : शाळेच्या सहलीवर असताना दुसऱ्या इयत्तेतील मुलांचे लैंगिक शोषण; ठाण्यातील प्रकार

ठाणे शहरातून एक गंभीर प्रकार समोर आला आहे. एका शाळेतील दुसऱ्या इयत्तेतील मुले सहलीला गेली असताना, एका अनोळखी व्यक्तीने त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आलाय. शाळेने हे आरोप फेटाळले आहेत. मात्र, ही व्यक्ती मुलांसोबतच सहलीला गेली होती, आणि सात ते आठ मुलांनी एकसारखाच आरोप केल्याचं पालकांनी म्हटलं आहे.

Koshyari : कोश्यारी राज्यपाल असताना वसुललेल्या देणग्यांची माहिती राजभवनाकडे नाही; आरटीआयमधून माहिती उघड

वादग्रस्त असलेले महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आता एका नवीन अडचणीत सापडू शकतात. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिलेल्या उत्तरात महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे परिवार प्रबंधक कार्यालयाने स्पष्ट केले आहे की भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यपाल असताना त्यांच्या संबंधित असलेल्या संस्थेसाठी वसुललेल्या देणग्यांची माहिती त्यांच्या कार्यालयाशी संबंधित नाही.

अनिल गलगली यांच्या मते राज्यपाल असताना ज्या काही देणग्या वसूल करण्यात आल्या आहेत त्याची माहिती राजभवनाकडे असणे आवश्यक होते पण राज्यपालांनी गुपचूपपणे घेतलेल्या देणग्यांची माहिती लपवली आहे. याबाबत राज्य शासनाने चौकशी करणे अगत्याचे आहे, अशी मागणी अनिल गलगली यांनी विद्यमान राज्यपाल रमेश बैस सहित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांसकडे केली आहे.

Mumbai-Ahmedabad Highway : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील रस्तारोको मागे

वाढवण बंदरासाठी आंदोलकांनी मुंबई-अहमदाबाद हायवेवर रास्तारोको केला होता. तब्बल अडीच तासांपासून सुरू असणारा हा रास्तारोको आता मागे घेण्यात आला आहे.

Maratha Reservation: जरांगेची भूमिका कित्येकांना मान्य नाही - संगीता वानखेडे  

जरांगेची भूमिका कित्येकांना मान्य नाही म्हणून त्यांच्या विरोधात आज लोक बोलत आहेत. असे संगीता वानखेडे  म्हणाल्या

रिपब्लिक टीव्हीच्या त्या पत्रकाराला मिळाला जामीन

रिपब्लिक टीव्हीचा पत्रकार संतू पान यालाजामीन मिळाला आहे. पश्चिम बंगाल पोलिसांनी संदेशखळी येथे १९ फेब्रुवारी रोजी त्याला अटक केली होती.

Bjp News| शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी भाजपची जोरदार तयारी

भारतीय जनता पक्ष "ग्राम परिक्रमा यात्रा" याच्या माध्यमातून देशभरातील 1.25 लाख गावांतील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. हा कार्यक्रम 12 फेब्रुवारी रोजी सुरू झाला आणि 12 मार्चपर्यंत चालणार आहे.

ED News : हिरानंदानी ग्रुपवर ईडीची छापेमारी 

हिरानंदानी ग्रुपवर मुंबईत कित्येक ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे. फेमा नियमाचे उल्लंघन प्रकरणी ही कारवाई करण्यात आले असल्याचे समजत आहे.

भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या हस्ते 'हिरोज ऑफ मुंबई'चे उद्घाटन

भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या हस्ते 'हिरोज ऑफ मुंबई'चे उद्घाटन होणार आहे. मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी १७ थोर व्यक्तींचे पुतळे एकाच उद्यानात बसवले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह स्वातंत्र्यवीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे, सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचा यामध्ये समावेश आहे. मुंबईसह राज्याच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासात योगदान दिलेल्या थोर व्यक्तींचे अर्धा कृती पुतळे आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मंत्री मंगल प्रभाग लोढा राहणार उपस्थित असणार आहेत.

स्थनिक स्वराज्य संस्था आणि OBC प्रकरणाची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली

स्थनिक स्वराज्य संस्था आणि OBC प्रकरणाची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली आहे. ४ मार्चला होणारी सुनावणी आता पुढे ढकलली आहे. १६ एप्रिलला होण्याची शक्यता आहे. मागच्या अनेक महिन्यांपासून या प्रकरणाची सुनावणी झाली नसल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भवितव्य अंधारात गेल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Delhi CM Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांनी आज सर्व पक्षीय बैठक बोलावली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज ४ वाजता सर्व पक्षीय महत्त्वाची बैठक बोलावली आहे. बैठकीमध्ये पाणी पट्टीच्या वाढीबाबत वन टाईम सेटेलमेंट करण्याची योजना आणली जाणार आहे.

Doctor Strike: निवासी डॉक्टर आजपासून बेमुदत संपावर

विविध मागण्यांसाठी निवासी डॉक्टर आजपासून संपावर जात आहे. सायंकाळी ५ वाजल्यापासून संपाला सुरुवात होणार आहे.

Sanjay Raut: मविआत २७ फेब्रुवारीला जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय होणार- संजय राऊत

मविआत २७ फेब्रुवारीला जागावाटपाबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. ठाकरे २३ जागा लढणार असं राऊत म्हणाले.

वसई ते खाणिवडे टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा

वसई ते खाणिवडे टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावर रस्त्याच्या क्राँक्रिटीकरणाचे काम सुरु आहे.

National Flag: हैद्राबादमध्ये १०८ फूट उंच तिरंगा स्थापन; पाहा व्हिडिओ

तेलंगणातील हैद्राबादमध्ये १०८ फूट उंच तिरंगा स्थापन करण्यात आला आहे. हैद्राबादमधील वॉर मेमोरियल येथे जवानांच्या हस्ते तिरंग्याची स्थापना करण्यात आली.

12th Exam : कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचा बारावी पेपर तपासणीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय

बारावीच्या परीक्षेला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. मात्र, आता कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी १२ वीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परीक्षा महामंडळ चिंतेत आहे. 

नागपूर विद्यापीठाचे वादग्रस्त कुलगुरू डॉ. चौधरी अखेर निलंबित

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे वादग्रस्त कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांची राज्यपाल आणि कुलपती रमेश बैस यांनी हकालपट्टी केली आहे. त्यांच्या निलंबनाची कारवाई करण्याचे अधिकृत पत्र राज्यपाल कार्यालयातून विद्यापीठाच्या सामान्य प्रशासन विभागाला देण्यात आले आहे.

Prahlad Patel : मध्य प्रदेशचे मंत्री प्रल्हाद पटेल उद्या सांगली दौऱ्यावर

सांगली : मध्य प्रदेशचे पंचायत ग्रामीण विकास श्रम मंत्री प्रल्हाद सिंह पटेल हे शुक्रवारी (ता. २३) सांगली लोकसभा दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत हरिपूर रस्त्यावर सुखरूप लॉन येथे सकाळी साडेदहा वाजत भाजपच्या पदाधिकारी, युवा, महिला मोर्चा कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपचे विविध नेते देशातील वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघाचे दौरे करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मध्य प्रदेशचे पंचायत ग्रामीण विकास श्रम मंत्री प्रल्हाद सिंह पटेल सांगली दौऱ्यावर येणार आहेत. शुक्रवारी सकाळी त्यांची संघ परिवारातील पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक होणार आहे. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता हरिपूर रस्त्यावर सांगली येथील सुखरूप लॉन येथे मेळावा होणार आहे. लोकसभा क्लस्टर प्रमुख प्रशांत परिचारक उपस्थित राहणार आहेत.

Sugarcane FRP : उसाचा FRP 8 टक्क्यांनी वाढवला, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

केंद्र सरकारने बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उसाचा FRP 8% नी वाढवला आहे. एफआरपी 8 टक्क्यांनी वाढवल्यामुळे देशातील लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. हा सुधारित एफआरपी 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

Latest Marathi News Live Update
Farmer Protest: आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचे शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट; ऊसाच्या MSP मध्ये वाढ

Buldhana : एकादशीच्या फराळातून 192 जणांना विषबाधा

सुलतानपूर (जि. बुलडाणा) : लोणार तालुक्यातील सोमठाणा येथे भागवत सप्ताह सांगता कार्यक्रमात मंगळवारी (ता. २०) एकादशी दिवशी भाविकांना भगर व शेंगदाणा आमटी फराळ म्हणून देण्यात आली. हा प्रसाद सेवन केल्यानंतर अनेकांना विषबाधा झाली. खापरखेड व सोमठाणा येथील १९२ जणांवर बीबी व लोणार ग्रामीण रुग्णालय आणि मेहकर येथे उपचार करण्यात आले.

Uddhav Thackeray : कोकण दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे विदर्भ, मराठवाड्याच्या दौऱ्यावर

मुंबई : कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज, गुरुवारपासून बुलढाणा आणि हिंगोली या जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात दोन दिवसांत ते सात जनसंवाद सभा घेणार घेणार आहेत.

Raju Shetti : 'स्वाभिमानी'ची सोमवारी बाजार समित्या बंदची हाक

जयसिंगपूर : केंद्र सरकारचा बाजार समितीच्या धोरणात बदल करून निवडणुका न घेता कायमस्वरूपी प्रशासकाची नेमणूक करून कारभार चालविण्याचा निर्णय हा देशातील शेतकऱ्यांच्या अधिकारावर गदा आणणारा आहे. तातडीने हा निर्णय मागे घ्यावा, यासाठी २६ फेब्रुवारी रोजी राज्यातील बाजार समित्या बंद ठेवून या निर्णयास विरोध करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली.

Madhya Pradesh Accident : बस-ट्रॅक्टरच्या धडकेत 16 जण जखमी

मध्य प्रदेश : ग्वाल्हेरच्या हजीरा भागात बस आणि ट्रॅक्टरमध्ये झालेल्या धडकेत १६ जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Uttarakhand Car Accident : उत्तराखंडमध्ये कार दरीत कोसळून सहा जणांचा मृत्यू

उत्तराखंडमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एक कार 500 मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. टिहरी गढवाल जिल्ह्यातील यमुना पुलाजवळ ही कार दरीत पडली आहे. उत्तरकाशीहून डेहराडूनला जात असताना या कारला अपघात झाला. केमटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला आहे.

Farmer Agitation : दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलनास हिंसक वळण लागले. शंभू आणि खानौरी सीमाभाग रणक्षेत्र बनला असून हरियाना पोलिसांनी शेतकरी आंदोलकांना रोखण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा मारा करत लाठीहल्ला केला. या चकमकीत एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. याच पार्श्वभूमीवर किसान मोर्चाची आज महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. येत्या २४ फेब्रुवारीपासून तीन मार्चपर्यंत रोज गावागावांत सकाळी किंवा दुपारी ‘रास्ता रोको’, तीन मार्चला राज्यातील प्रत्येक जिल्हास्तरावर रास्ता रोको आंदोलनाची हाक मनोज जरांगेंनी दिलीये. कांद्याच्या दरात लासलगाव बाजार समितीत ४०० ते ५०० रुपयांनी घसरण झाली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणारी बारावीच्या लेखी परीक्षेला सुरूवात झाली आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com