Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

LIVE Marathi News Updates
LIVE Marathi News UpdatesEsakal

पार्थ पवार यांची पुण्यात पदाधिकाऱ्यांसोबत बैठक

पार्थ पवार यांनी गुरुवारी पुण्यामध्ये पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने बैठकीत चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.

तळोजा एमआयडीसीमध्ये भीषण आग

नवी मुंबईतल्या तळोजा एमआयडीसीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे आरोग्यमंत्री रुग्णालयात

देशात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज यांनी LNJP हॉस्पिटलला भेट दिली.

येरवडा कारागृहात कैद्याची हत्या

पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्याची हत्या झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

ठाण्यात ज्यू धर्मीयांच्या प्रार्थनास्थळी कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही

ठाण्यात सिनेगॉग चौकात ज्यू धर्मीयांच्या प्रार्थनास्थळी कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ज्यू धर्मीयांच्या प्रार्थनास्थळी बॉम्ब ठेवल्याचा ईमेल मिळाल्याची माहिती देण्यात आली होती.

शिवसंकल्प अभियानाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यभर दौरे

शिवसंकल्प अभियानाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यभर दौरे होणार आहेत. सहा जानेवारीपासून मुख्यमंत्र्यांचे राज्यभर दौरे सुरू होणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये, मतदारसंघांमध्ये मिळावे घेणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 29 जानेवारी आणि 30 जानेवारी रोजी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर असतील. 29 जानेवारीला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात तर 30 जानेवारीला हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मिळावे घेतली.

कोरोगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन दिनासाठी यंत्रणा सज्ज

१ जानेवारीला होणाऱ्या कोरोगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन दिनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. या दिवशी जवळपास ३२०० पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

राज्यात चार दिवस साजरा होणार राम मंदिर उत्सव

राज्यात चार दिवस राम मंदिर महोत्सव साजरा केला जाणार आहे. १९ ते २२ जानेवारीदरम्यान हा उत्सव राज्यातील विविध भागात साजरी करण्यात येईल.

मुख्यमंत्र्यांचा ६ जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ६ जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा करणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा आयोजित करण्यात आल्याचं समजतंय.

1 जानेवारीपासून प्रॉपर्टी एजंटसाठी महारेरा प्रमाणपत्र बंधनकारक

1 जानेवारीपासून प्रॉपर्टी एजंटसाठी महारेरा प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आलं आहे. जुन्या बांधकाम व्यायसायिकांना देखील प्रमाणपत्र घ्यावं लागणार आहे.

CM शिंदे लागले लोकसभेच्या तयारीला, ६ जानेवारीपासून करणार महाराष्ट्र दौरा

मुख्यमंत्री येत्या ६ जानेवारीपासून सुरु करणार महाराष्ट्र दौरा करणार आहेत.

असा असेल दौरा-

६ जानेवारी यवतमाळ, वाशिममध्ये आणि रामटेक मेळावा

८ जानेवारी अमरावती आणि बुलढाणा

१० जानेवारी हिंगोली आणि धाराशीव

११ जानेवारी परभणी आणि संभाजीनगर

२१ जानेवारी शिरूर आणि मावळ

२४ जानेवारी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग

२५ जानेवारी शिर्डी आणि नाशिक

२९ कोल्हापूर ३ जानेवारी हातकंणगले

भाजपकडून इंडिया आघाडीत फूट पाडण्याचा प्रयत्न - मल्लिकार्जून खर्गे

राम मंदिर उद्घाटनाच्या कार्यक्रमाबाबत CM शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी बैठक सुरू

राम मंदिर उद्घाटनाच्या कार्यक्रमाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मुंबई- ठाणे येथील पदाधिकारी उपस्थित आहेत. इतर जिल्ह्यातील पदाधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले आहेत.

राहुल गांधी यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

अस्पृक्षता ही राष्ट्रीय रा. स्व. संघाची विचारसरणी

देशाचे अधिकार जनतेच्या हातात असले पाहिजे असे आमचे मत आहे.

आम्ही लोकशक्ती जनशक्तीचा विषय करतो

आझादी लढा देशातील जनतेने लढला आहे.

मोदी यांची विचारधारा राजेशाही आहे - राहुल गांधी

राहुल गांधी नागपूर येथे काँग्रेसच्या मेळाव्यात बोलत आहेत. त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

सुनील केदार जामीन अन् शिक्षा स्थगिती प्रकरणात सुनावणी तहकूब

सुनील केदार प्रकरणात सकाळी ११ वाजता ठेवण्यात आलेली सुनावणी ३ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली होती. मात्र, व्हर्चुअल माध्यमातून वकील उपस्थित राहू शकत नसल्याने पुन्हा काही वेळासाठी सुनावणी तहकूब करण्यात आली आहे.

सोलापुरात तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

सोलापुरात पालकमंत्री चंद्रकात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनसमितीची बैठक सुरु होती. यावेळी एका तरुणानं आपल्या काही मागण्यांसाठी आत्मदहनाचा प्रयत्न केला. अंगावर इंधन ओतून घेऊन हातात जळती काठी घेऊन त्यांना पोलिसांना थेट आव्हान दिलं. पण पोलिसांना त्याला यापासून यशस्वीपणे रोखण्यात यश मिळालं.

चहा विकणाऱ्यांना आम्ही देश विकताना पकडलंय - कन्हैया कुमार

जे लोक चहा विकत होते, त्यांना आम्ही देश विकताना पकडलं आहे. त्यामुळं तेच आज चोर चोर ओरडत आहेत. देशाच्या सामान्य जनतेसमोर काँग्रेसला बदनाम केलं जात आहे. इंग्रजांसोबत लढून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम काँग्रेसनं केलं आहे. आज देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यातून देशाला वाचवण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या क्षणापर्यंत लढा द्यायचा आहे. ईडी-सीबीआयला आम्ही घाबरणार नाही, असंही यावेळी काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस पक्ष विदर्भातून नवीन सुरुवात करतोय - यशोमती ठाकूर  

काँग्रेस पक्ष विदर्भातून नवीन सुरुवात करत आहे, असं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. विदर्भाची भूमी ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ताजुद्दीन बाबा, गाडगे बाबा, यांची भूमी आहे. जेव्हा जेव्हा विदर्भातून आवाज दिला त्यावेळी मानवतेचा संदेश देण्याचं काम झालं आहे. 1920 मध्ये महात्मा गांधी यांनी असा आवाज दिला होता. आज राहुल गांधी आणि मालिकार्जुन खर्गे यांनी आवाज दिला आहे. या आवाजाला सर्वांनी साथ द्यायची आहे.

आज भगतसिंग यांची भूमिका घ्यायची आहे. सुनील केदार यांच्यावर तुरुंगात जाण्याची वेळ आली आहे. त्यांना भाजपसोबत येण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली होती, पण ते ठाम आहेत. इंग्रजांनी केलं ते आज सत्तेतील लोक करत आहेत. विचारधारा एकरूप ठेवत मानवतेचा संदेश देण्यासाठी संविधान मानणारं राज्य आपल्याला आणायचं आहे. पूर्ण ताकद लावणार का? या देशाला एकत्र ठेवणार का? असा जयघोष केला.

काँग्रेसच्या 'है तयार हम', सभेसाठी सध्या मंचावर हे नेते उपस्थित

अशोक चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण

बाळासाहेब थोरात

मिलिंद देवडा

नसीम खान

वर्षा गायकवाड

शिवाजीराव मोघे

राष्ट्रीय नेते

मुकुल वासनिक

अधीररंजन चौधरी

अजय माकन

दिग्विजय सिंह

कन्हैया कुमार

भुपेश बघेल

जयराम रमेश

सलमान खुर्शीद

यासह अनेक मान्यवर उपस्थित झाले आहे.

अयोध्देत राम मंदिराच्या उद्धाटनासाठी मोठा बंदोबस्त 

अयोध्देत राम मंदिराच्या उद्धाटनासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नेते, आणि आदि मान्यवरांच्या सुरक्षेसाठी कडा पहारा, पोलीस आणि सर्व सुरक्षा यंत्रणा सुसज्ज करण्यात आली आहे.

काँग्रेसच्या सभेसाठी राहुल गांधी नागपुरात दाखल

काँग्रसच्या सभेसाठी राहुल गांधी नागपुरात दाखल झाले आहेत. थोड्यात वेळात सभेला सुरुवात होणार आहे.

पाच पीएफआय सदस्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

पीएफआय मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने पाच पीएफआय सदस्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे

एनआयए प्रकरणात कोठडीत असताना त्यांना 21 डिसेंबर रोजी अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती.

राज ठाकरे मुख्यमंत्र्यांमध्ये अर्धा तास चर्चा

राज ठाकरे मुख्यमंत्र्यांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. वर्षभरात राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्याची ही सहावी भेट आहे. कांदा प्रश्न, वरळी बिडीडी चाळ आणि पोलिसांचा घरासंदर्भात यांच्यामध्ये चर्चा झाली.

चिखली भागात बिबट्या! पकडण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल

चिखली येथील सोनवणे वस्ती भागात बिबट्या असून त्याला पकडण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत

चिखली भागात बिबट्या
चिखली भागात बिबट्याSakal

राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहचले आहेत.

रामनगरी होणार दारूमुक्त! अयोध्येत विक्रीवर पूर्ण बंदी, योगी सरकारची घोषणा

रामनगरी अयोध्येत मद्यविक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याची तयारी सुरू आहे. लवकरच रामनगरीला दारूमुक्त घोषित केले जाईल. याबाबत उत्तर प्रदेश सरकारचे उत्पादन शुल्क मंत्री नितीन अग्रवाल यांनी मोठी घोषणा केली आहे.

पुन्हा आनंदाची बातमी, असं म्हणत फडणवीसांचं ट्विट चर्चेत

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नवीन ट्विट चर्चेत आहे. "पुन्हा आनंदाची बातमी, तीन राज्यांइतकी गुंतवणूक महाराष्ट्रात", असं ट्विट फडणवीसांनी केलं आहे.

राज ठाकरे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट, हे आहे कारण

आज राज ठाकरे टोलनाका प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत. दुपारी 12.30 वाजता वर्षा बंगल्यावर ही भेट होणार आहे.

नमो अँपच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीत धक्का तंत्र पाहायला मिळणार

नमो अँपच्या माध्यमातून भाजप खासदारांच्या कामगिरीचा सर्व्हे होणार आहे. सर्व्हेच्या माध्यमातून जनमताचा कौल भाजप घेणार.

नागपुरातील काँग्रेसच्या सभेला सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी गैरहजर राहणार - सूत्रांची माहिती

नागपुरमध्ये आज कॉंग्रेसची सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र, या सभेला सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी गैरहजर राहणार आहेत.

तमिळ अभिनेता आणि डीएमडीके पार्टीचे प्रमुख थिरू विजयकांत यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक

तमिळ अभिनेता आणि डीएमडीके पार्टीचे प्रमुख थिरू विजयकांत यांचे आज सकाळी चेन्नईमध्ये निधन झाले. त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटद्वारे शोक व्यक्त केला आहे.

२० जानेवारीला सकाळी ९ वाजता अंतरवाली सराटीमधून मोर्चा निघणार - मनोज जरांगे पाटील

२० जानेवारीला सकाळी ९ वाजता अंतरवाली सराटीमधून मोर्चा निघणार असल्याचे वक्तव्य मनोज जरांगे पाटलांनी केले आहे.

लोकसभेच्या निवडणुकीचं काँग्रेसनं फुकलं रणशिंग, नागपुरातून करणार सुरुवात

नागपुरात आज काँग्रेसकडून महारॅलीचं आयोजन कऱण्यात आलं आहे. या महारॅलीच्या माध्यमातून काँग्रेस लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजवणार आहे.

राहुल गांधींच्या बॅनरवर अज्ञाताने लावती माती

राहुल गांधी आज नागपुरात येणार आहे. त्यांच्या आगमनासाठी नागपुरात काही ठिकाणी बॅनर लावण्यात आले होते. यापैकी एका बॅनरवर अज्ञाताकडून माती लावण्यात आली.

शरद पवार बच्चू कडूंच्या घरी दाखल

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार आमदार बच्चू कडूंच्या घरी दाखल झाले आहेत.

शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत वेगळी भूमिका घेणार नाही - बच्चू कडू 

जेव्हापर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत मी वेगळा निर्णय घेणार नाही. जर ते नसते तर वेगळा निर्णय घेण्याचा विचार केला असता अशी प्रतिकिया अमरावतीमध्ये बोलताना बच्चू कडू

नायलॉन मांजाने वारंवार होणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कारवाई सुरू

मुंबई : बेजबाबदारपणे पतंग उडवणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. भारतात बंदी असलेल्या नायलॉन मांजा आणि चायनीज मांजा वापरून पतंग उडवल्याबद्दल खेरवाडी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.याशिवाय नायलॉन/चायनीज मांजा वापरल्याप्रकरणी मुंबई शहरात 7 गुन्हे दाखल झालाले आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून शहरातील पोलिस ठाण्यांना बेजबाबदारपणे पतंग उडवणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, विशेषत: पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांजवळ विशेष लक्ष देण्याचे आदेश देण्यात आले आहे.

सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त मोहम्मद जावेद यांचा टॅक्सीच्या धडकेत मृत्यू

बनावट मुद्रांक पेपर (तेलगी) गैरव्यवहारातील तपास अधिकारी राहिलेले सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त मोहम्मद जावेद (७२) यांचा मंगळवारी रात्री टॅक्सीच्या धडकेत मृत्यू झाला. याप्रकरणी टॅक्सी चालक केशव प्रसाद याला अटक करण्यात आली आहे.

सासरी छळ; विवाहितेनं दोन वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी मारुन संपवलं जीवन

गारगोटी : भेंडवडे (ता. भुदरगड) येथील विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून दोन वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. काजल अवधूत सलते (वय ३२) व मुलगा प्रियांशू (२) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी भुदरगड पोलिसांनी (Bhudargad Police) आज पती अवधूत (३५), सासरा बळवंत सलते, सासू यशोदा सलते व नणंद शामल दत्तात्रय पाटील (नाधवडे) या चौघांना अटक केली आहे.

LIVE Marathi News Updates
धक्कादायक! सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेनं दोन वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी मारुन संपवलं जीवन; पतीसह चौघांना अटक

मध्य प्रदेशात बसला आग लागून 12 जणांचा होरपळून मृत्यू

मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात बुधवारी रात्री डंपर ट्रकला धडकल्यानंतर बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत १२ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या अपघातात १४ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

LIVE Marathi News Updates
Bus Fire accident: मध्य प्रदेशात भीषण अपघातानंतर बसला लागली आग, १२ जणांचा होरपळून मृत्यू, १४ जखमी

दाजीपूर अभयारण्य पर्यटकांसाठी राहणार बंद

राशिवडे बुद्रुक : पर्यटकांची हुल्लडबाजी आणि अभयारण्याच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव दाजीपूर अभयारण्य ३० आणि ३१ डिसेंबर रोजी पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. अशाप्रकारच्या सूचना वन्य विभागाने परिस्थितीकी विकास समिती आणि पर्यटनाशी संबंधित असलेल्या सर्वांना दिल्या आहेत.

अ.भा. साहित्य संमेलनाच्या समारोपास मुख्यमंत्री येणार

साने गुरुजी साहित्यनगरी (अमळनेर, जि. जळगाव) : पूज्य साने गुरुजी यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षांत त्यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेरमध्ये ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्याचा आनंद आहे. हे संमेलन खानदेशच्या साहित्यिक वैभवात भर घालणारे ठरेल, असा विश्‍वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची तयारी त्यांनी यावेळी दर्शविली.

गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही, मनोज जरांगेंचा स्पष्ट इशारा

छत्रपती संभाजीनगर : ‘‘मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) पाच महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. आम्हाला मुंबईला जाण्याची हौस नाही; परंतु, सरकार २० जानेवारीपर्यंत आरक्षण देईल याबाबत साशंकता आहे,’’ असे आंदोलनकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी बुधवारी माध्यमांना सांगितले. गोळ्या घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नसल्याचाही इशारा त्यांनी दिला.

LIVE Marathi News Updates
Maratha Reservation : गोळ्या घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही; मनोज जरांगेंचा स्पष्ट इशारा

अभिनेता साजिद खानचे कर्करोगाने निधन

Sajid Khan Death : अभिनेता साजिद खानने वयाच्या ७० व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. अभिनेता गेल्या काही काळापासून कर्करोगाशी लढा देत होता. मात्र, साजिद ही लढाई हरला आणि सगळ्यांना रडवून निघून गेला.

LIVE Marathi News Updates
Sajid Khan Death: अभिनेता साजिद खानचे कर्करोगाने निधन, बॉलिवूड इंडस्ट्रीत पसरली शोककळा

काँग्रेसची महारॅली ऐतिहासिक ठरणार : अशोक चव्हाण

नागपूर ः काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानमित्त नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेली महारॅली ऐतिहासिक ठरणार आहे. संघभूमीतून आम्ही भाजपला जोरदार प्रत्युत्तर देणार असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी बुधवारी सांगितले. शुक्रवारी (ता.२८) दिघोरी येथील पटांगणावर काँग्रेसची महारॅली आयोजित करण्यात आली आहे. अशोक चव्हाण यांनी सभास्थळाची पाहणी केली. बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे प्रश्न हाताळण्यात व नागरिकांना दिलासा देण्यात विद्यमान भाजप सरकार अपयशी ठरले आहे. त्याला जोरदार प्रत्त्युत्तर या सभेतून दिले जाणार आहे. नागपूर ही संघभूमी आहे. त्यामुळे महारॅलीसाठी या शहराची निवड केली असून सभेच्या माध्यमातून लोकांमध्ये संदेश आणि भाजपला इशारा देण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

राम मंदिराच्या निमित्तानं लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न - शरद पवार

अमरावती : ‘‘देशात अनेक समस्या असून, सरकारचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. देशातील युवक व नागरिकांसाठी केंद्र सरकारकडे देण्यासाठी कुठलाच कार्यक्रम नसल्याने राम मंदिर प्राणप्रतिष्ठा महोत्सवाच्या निमित्ताने लोकांचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न होत आहे,’’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

कोरोना टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी डॉ. गंगाखेडकर

मुंबई : कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान वाढलेल्या रुग्णसंख्येवर उपाययोजना करण्यासाठी १३ एप्रिल २०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यात तज्ज्ञ डॉक्टरांचे विशेष कार्यदल अर्थात टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली होती. त्याच पार्श्‍वभूमीवर राज्यात कोरोनाच्या नवीन जेएन.१ या व्हेरियंटच्या प्रकारातील रुग्णवाढीची संख्या लक्षात घेत टास्क फोर्सची पुनर्रचना करून नवीन टास्क फोर्सची स्थापना करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी येथे दिली.

काँग्रेस नेते राहुल गांधींची 14 जानेवारीपासून 'भारत न्याय यात्रा'

Latest Marathi News Live Update : वर्षभरापूर्वी काढण्यात आलेल्या भारत जोडो यात्रेच्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी येत्या १४ जानेवारीपासून पूर्व-पश्चिम अशी भारत न्याय यात्रा काढणार आहेत. या यात्रेची सुरुवात मणिपूरच्या इंफाळ येथून होणार असून, येत्या २० मार्चला मुंबईत या यात्रेचा समारोप होणार आहे. तसेच पुढील वर्षी अयोध्येत २२ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या राम मंदिराच्या उद्‍घाटन सोहळ्यावरून राजकारण पेटले आहे. या सोहळ्याचे अधिकृत निमंत्रण काही मोजक्याच विरोधी नेत्यांना देण्यात आले असून त्यातूनही काही नेत्यांना वगळण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

तसेच राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. मनोज जरांगे पाटलांनी सरकारला इशारा देत 20 जानेवारीपासून आंदोलनाची घोषणा केली आहे. त्याचबरोबर देशभरात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. संपूर्ण देशात थंडीही जाणवू लागली आहे. यासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडीचा आपण लाईव्ह ब्लाॅगच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com