Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे भाऊ बसंत सोरेन यांनी हेमंत यांची पाठराखण केली आहे.
Live Update
Live UpdateEsakal

मुंबईत दहशतवादी घुसल्याचा फसवा कॉल

शुक्रवारी मुंबई पोलीस कंट्रोलला धमकीचा फोन आला असून कॉलरने नियंत्रण कक्षाला सांगितले की, शस्त्रे घेऊन काही दहशतवादी मुंबईच्या डोंगरी भागात घुसले आहेत आणि त्यांना पोलिसांच्या मदतीची गरज आहे. हा कॉल आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता, हा फसवा कॉल असल्याचे निष्पन्न झाले.

पुण्यातल्या वेगवेगळ्या पोलिस ठाण्यामध्ये धमकीचे फोन

पुण्यात पुन्हा बॉम्ब स्फोटाची धमकी देण्यात आलेली आहे. पुण्यातील शिवाजी नगर आणि पुणे स्टेशनसह पिंपरी चिंचवड ठाण्यातही बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आलेली आहे.

पोलीसांनी एकाला ठोकल्या बेड्या

मुंबई पोलीस कंट्रोलला धमकीचा फोन आल्याचा प्रकार समोर आला आहे. कॉलरने नियंत्रण कक्षाला सांगितले की शस्त्रे घेऊन काही दहशतवादी मुंबईच्या डोंगरी भागात घुसले आहेत आणि त्यांना पोलिसांच्या मदतीची गरज आहे. हा कॉल आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता, हा फसवा कॉल असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

Farmers Protest : दिल्लीतील अक्षरधाम-गाझीपूर रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी; Video आला समोर

शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गाझीपूर सीमेवर पोलिसांनी बॅरिकेडिंग केल्यामुळे दिल्लीतील अक्षरधाम-गाझीपूर रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.

क्रिकेटपटू सौरव गांगुलीने रुग्णालयात जाऊन घेतली  भाजप प्रदेशाध्यक्षांच्या भेट

पश्चिम बंगाल येथे माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांनी अपोलो हॉस्पिटल, सॉल्ट लेक येथे भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांता मजुमदार यांची भेट घेतली.

माझा भाऊ निर्दोषच, त्याची काहीही चूक नाही! -बसंत सोरेन

माझ्या भावानं गेल्या चार वर्षात जे काही केलं त्याबद्दल त्यांचं कौतुक करावे लागेल. तुम्ही काय काम केले हे जास्त महत्वाचे ठरते. अशा शब्दांत झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे भाऊ बसंत सोरेन यांनी हेमंत यांची पाठराखण केली आहे.

निलेश राणे मुद्दाम चिपळुणमध्ये आले. असं सांगत चिपळुणमध्ये जाणीवपूर्वक अशांतता माजवण्याचा प्रयत्न केला असल्याची प्रतिक्रिया आमदार भास्कर जाधव यांनी दिली आहे.

चिपळुणमध्ये अशांतता माजवण्याचा प्रयत्न - जाधव

Congress News: नरेंद्र मोदी खोट्यांचे सरदार, २०१४ साली दिलेल्या गॅरंटीचे काय झाले? 

Lonanvla News: पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच मोदीची गॅरंटी, मोदीची गॅरंटी असे बोलत असतात, त्यांच्या बोलण्यात मी पणा जास्त असतो. नरेंद्र मोदी सातत्याने खोटे बोलत असतात, ते खोट्यांचे सरदार आहेत. मोदींनी आजपर्यंत दिलेली एकही गॅरंटी पूर्ण केली नाही. २०१४ मध्ये मोदींनी काळा पैसा आणून प्रत्येकाला १५ लाख रुपये प्रत्येकाला देण्याची, दरवर्षी २ कोटी नोकरी देण्याची, शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करू, या गॅरंटी दिल्या होत्या या मोदी गॅरंटीचे काय झाले? असा सवाल काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केला आहे.

निलेश राणेंच्या गाडीवर ठाकरे गटाची दगडफेक

निलेश राणेंच्या ताफ्यावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली आहे. गुहागरमध्ये ही घटना घडली.

Maratha Reservation: जो कायदा मुख्यमंत्री आणतील त्याला भाजपाचा पाठिंबा

राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणासंदर्भातील दिलेल्या अहवालावर विशेष अधिवेशनात चर्चा होईल.मुख्यमंत्री जो कायदा त्याला भाजपाचा पूर्ण पाठिंबा असेल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने मोदी सरकार विरोधात आणला ठराव 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी खंबीरपणे शेतक-यांच्या पाठीशी उभी असून शेतक-यांचा आवाज दडपणा-या केंद्रातील मोदी सरकारचा धिक्कार करत आहे.असा ठराव आज मांडला. विधानसभेतील काँग्रेस पक्षाचे प्रतोद आ. सुरेश वरपुडकर यांनी या ठरावाला अनुमोदन दिले आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने एकमताने हा ठराव मंजूर केला.

Telangana News: तेलंगणा विधानसभेत काँग्रेसने आणला जात जनगणना ठराव!

तेलंगणातील काँग्रेस सरकारने शुक्रवारी विधानसभेत राज्यात जात जनगणना करण्याचा ठराव आणला आहे

Pune: इंडिया आघाडीचा पुण्यात मेळावा; शरद पवार, आदित्य ठाकरे, नाना पटोले राहणार उपस्थित

Pune: 24 तारखेला इंडिया आघाडीचा मेळावा पुण्यात होणार आहे. मेळाव्याला शरद पवार, आदित्य ठाकरे, नाना पटोले हे उपस्थितीत राहणार आहेत. पुण्यातील काँग्रेस भवन येथे इंडिया आघाडीचा मेळावा होणार आहे. इंडिया फ्रंटचे सर्व नेते या मेळाव्याला हजेरी लावणार आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीचा पुण्यात मेळावा होणार आहे.

Kolhapur: कोल्हापुरातील सर्किट हाऊसमध्ये मुख्यमंत्री आणि मराठा समाजाचे समन्वयक यांच्यात बैठक; मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत चर्चा

Kolhapur:  सकल मराठा समाजाचे समन्वयक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला येणार आहेत. कोल्हापुरातील सर्किट हाऊस इथं मुख्यमंत्री आणि मराठा समाजाचे समन्वयक यांच्यामध्ये बैठक पार पडणार आहे. गेल्या अर्धा तासांपासून ही बैठक सुरू आहे. बैठकीत मनोज जरांगे पाटील यांची तब्येत आणि त्यांचे उपोषण सुटावं यासाठी सरकार काय प्रयत्न करत आहे ? मराठा समाजाला आरक्षण कसे मिळणार या संदर्भात चर्चा होत आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या 23 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा (IIT) 23 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू. वसतिगृहाच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळूनआला मृतदेह.

'अब की बार 400 पार'; पंतप्रधान मोदींचा हरियाणामधील कार्यक्रमात नारा

शुक्रवारी (16 फेब्रुवारी) हरियाणाच्या रेवाडी येथे एका कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,"एनडीएसाठी 'अब की बार 400 पार'". यावेळी मोदींनी गेल्या दहा वर्षांतील त्यांच्या सरकारच्या कामगिरींचाही उल्लेख केला.

मनोज जरांगेच्या पाठिंब्यासाठी मराठा समाजाचा चक्काजाम

मनोज जरांगेच्या पाठिंब्यासाठी मराठा समाजाचा चक्काजाम सुरू केला आहे. अनेक भागात बंद पाळण्यात आला. जरांगे यांनी २० तारखेपर्यंत उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं आहे. दरम्यान, मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत .

Ministry of Defence: संरक्षण मंत्रालयाने भारतीय नौदलासाठी खरेदी केली विमाने

संरक्षण मंत्रालयाने भारतीय नौदलासाठी 9 सागरी विमाने आणि भारतीय तटरक्षक दलासाठी 6 विमाने खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाची किंमत सुमारे 29,000 कोटी रुपये आहे

Ajit Pawar LIVE: आपण कुठलाही पक्ष चोरलेला नाही; अजित पवारांचे वक्तव्य

लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे, आपण कुठलाही पक्ष चोरलेला नाही. मला एकट पाडण्याचा प्रयत्न केला होईल. मी आणि माझा पक्ष सोडला तर सगळे माझ्या विरोधात प्रचार करतील. संसदेत फक्त भाषण करुन काम होत नाहीत. देशात NDAचं सरकार आणायचं आहे. असे वक्तव्य अजित पवारांनी बारामतीत केलं आहे.

Congress: काँग्रेसला मोठा दिलासा! काँग्रेसचे बँक खाते पुन्हा सुरु; 21 फेब्रुवारीला होणार सुनावणी

काँग्रेसचे बँक खाते गोठवण्यात आले होते ते आता पुन्हा सुरु झाले आहे. आयटी ट्रिब्युनलकडून काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला असून खाते वापरण्याची परवानगीही देण्यात आली आहे. 21 फेब्रुवारी रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. याआधी पक्षाने दावा केला होता की त्यांची अनेक बँक खाती गोठवली गेली आहेत आणि 210 कोटी रुपये वसूल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सगेसोयरेंबाबत कायदा होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही - जरांगे

ज्यांच्या नोंदी सापडलेल्या नाहीत त्यांच्यासाठी वेगळा कायदा नको आहे. सर्व मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळालं पाहिजे. सगेसोयरेंबाबत कायदा होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असं मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

मुख्यमंत्री घेणार मराठा प्रतिनिधींची बैठक

आज दुपारी 1 वाजता कोल्हापुरात सर्किट हाउस इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा, सांगली, कोल्हापूर येथील सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. ते उपोषण सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विनंती करण्यात येणार आहे. तसेच मागासवर्ग आयोगाने दिलेला अहवाल राज्यशासनाने आज सकाळीच स्वीकारला आहे. त्यावर देखील समाजातील विधीज्ञ, कायद्याचे अभ्यासक यांची मते जाणून घेणार आहेत.

राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदी भाजप नेते हर्षवर्धन पाटील

राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी गुजरातचे केतन भाई पटेल यांची बिनविरोध निवड झाली. पन्नास वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच साखर संघावर भाजपचं वर्चस्व प्रस्थापित झालं आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या निवडीनं महाराष्ट्रातील साखर उद्योगाला चालना मिळेल असं सांगितलं जात आहे. राज्यसभा तिकीट नाकारल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात आल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

सना खान मृत्यू प्रकरणात नवा खुलासा

नागपुरातील भाजप अल्पसंख्यांक आघाडीच्या कार्यकर्त्या सना खान यांच्या हत्या प्रकरणात नवीन खुलासा करण्यात आला आहे. सना खानची हत्या झालेल्या अमित साहूच्या घरात आणि अज्ञात एका पुरुष आणि महिलेचा रक्ताचे डाग मिळून आले आहेत. मुख्य आरोपी अमित साहूच्या घरात आणखी एकदा पोलिसांनी शोध मोहिम राबवली. पोलिसांनी त्या रक्ताची फॉरेन्सिक चाचणी केली सुरू आहे. त्या घरात सना खान व्यतिरिक्त तिसरी आणि चौथी व्यक्ती कोण? त्यांचा खुनात सहभाग आहे का? यासाठी घरातील सदस्यांसह आणखी काही लोकांचे नमुने तपासण्यात येणार आहेत. काहींना मध्य प्रदेशमधून नागपूरला बोलावणार आहेत.

ठाकरेंची परतीची दारं कायमची बंद केली - शिवतरे

उद्धव ठाकरे यांनी काहींची कायमची बंद केली आहे. ज्यावेळी ते काँग्रेससोबत गेले त्यावेळी बाळासाहेबांचा विचारांचा वारसा सोडून दिला. त्यावेळीच त्यांची दारं बंद झाली. बाळासाहेबांनी शेवटपर्यंत सांगितलं होतं, पक्षाचं दुकान बंद झालं तरी मी काँग्रेससोबत जाणार नाही. बाळासाहेबांनी शेवटच्या दसरा मेळाव्यातील एक संदेश दिला होता. मात्र, ठाकरे गटांकडून एकच संदेश सांगितला जातो यांना सांभाळा त्यांना सांभाळा. त्यासोबत काँग्रेसची पंचसूत्री गाडा ही संदेश दिला होता. बाळासाहेबांच्या शेवटच्या विचारांची पायमल्ली उद्धव ठाकरे यांनी केली. त्यामुळ परतीचे दरवाजे त्यांनी स्वतःच बंद करून घेतले आहेत, असं विजय शिवतरे यांनी म्हटलं आहे.

मोदींच्या विजयासाठी मुस्लिमांनी चढवली दर्गावर चादर

मुस्लिमांसह इतर अल्पसंख्यांक समाजातील बांधवांनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यश मिळावं, यासाठी नागपुरात ताजुद्दीन बाबा दर्ग्यात विशेष प्रार्थना करण्यात आली. यावेळी मुस्लिम आणि शीख समाजच्या बांधवांनी ताजुद्दीन बाबा दर्गा परिसरात हजरत बाबा ताजुद्दीन रहमतुल्लाह अलैह यांच्या मजारावर चादर चढवत मोदींच्या विजयासाठी प्रार्थना केली. यावेळी राज्यसभेचे खासदार आणि इंडियन मायनॉरिटी फाऊंडेशनचे (आयएमएफडी) संयोजक सतनाम सिंग संधू उपस्थित होते. यावेळी हजरत ताजुद्दीन बाबा मल्‍टीस्‍पेशालिटी चॅरिटेबल हॉस्पिटलचे उदघाटनही पार पडले.

गोळीबार प्रकरणात उपचार घेत असलेल्या महेश गायकवाडांना आज डिस्चार्ज

आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात जखमी झालेले महेश गायकवाड यांना आज डिस्चार्ज दिला जाणार आहे. ठाण्याच्या जुपीटर हॅास्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. गोळीबारात महेश गायकवाड यांना ६ गोळ्या लागल्या होत्या. ⁠जमिनीच्या वादातून तसेच राजकीय वादातून हा गोळीबार झाला होता.

किशोरी पेडणेकरांना कोर्टाचा मोठा दिलासा 

मुंबई महापालिकेच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांना हायकोर्टानं दिलासा दिला आहे. २२ फेब्रुवारीपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Live Update : कात्रज-कोंढवा रस्त्यावर मराठा आंदोलकांनी केला रास्ता रोको

कात्रज-कोंढवा रस्त्यावर काही वेळ केला मराठा आंदोलकांनी रास्ता रोको केलं. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ रास्ता रोको केला आहे. यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

Pune Police: पुणे पोलीस आयुक्तांचे सर्व पोलिसांना हेल्मेट वापरण्याचे आदेश

पुणे पोलीस आयुक्तांचे सर्व पोलिसांना हेल्मेट वापरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हेल्मेट वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. हेल्मेट न वापरल्यास नियमाप्रमाणे कारवाई करण्याचे आयुक्त अमितेश कुमार यांची तंबी दिली आहे.

Eknath Shinde: कुणबी नोंदी असलेल्यांना मराठी आरक्षणाचा लाभ मिळणार - CM शिंदे

कुणबी नोंदी असलेल्यांना मराठी आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. नोंदी सापडलेल्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देऊ असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.

Eknath Shinde: मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारकडे सादर; मराठा आरक्षणावर मोठ्या घोषणेची शक्यता

मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारकडे सादर करण्यात आला आहे. मराठा आरक्षणावर मोठ्या घोषणेची शक्यता आज वर्तवण्यात येत आहे.

Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शुक्रवारी सकाळी ९ वाजता जाहीर पत्रकारपरिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते नेमकं काय बोलणार? याकडे संपूर्ण मराठा समाजाचं लक्ष लागलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सगेसोयरे अध्यादेशाचा कायदा बनवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच अधिवेशन बोलावण्याची घोषणा करू शकतात. सध्या सरकारने अधिवेशनाची तारीख २२ फेब्रुवारी ठरवली आहे.

Manoj Jarange: मनोज जरांगेच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस

मनोज जरांगेच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. उच्च न्यायालयाने मनोज जरांगे यांना उपचार घेण्याचे निर्देश देण्यात आले होते.

Karnataka Budget : मुख्यमंत्री सिध्दरामय्या आज सादर करणार विक्रमी अर्थसंकल्प

बंगळूर : मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री सिद्धरामय्या आज (ता. १६) आपला विक्रमी पंधरावा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पात कोणत्या योजना आहेत, विकासकामांसाठी किती निधी दिला जाणार आहे, पंचहमी योजना सुरू ठेवण्यासाठी निधीची कशी जमवाजमव केली जाईल, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या काँग्रेस सरकारच्या दुसऱ्या सत्राचा अर्थसंकल्प सादर करत आहेत.

माजी पंतप्रधान देवेगौडा मणिपाल रुग्णालयात दाखल

बंगळूर : माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांना मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. देवेगौडा यांना गुरुवारी (ता. १५) सकाळी श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना तत्काळ मणिपाल रुग्णालयात नेण्यात आले. तिथले फुफ्फुस तज्ज्ञ डॉ. सत्यनारायण यांनी तपासणी केली. त्यांना रुग्णालयात दाखल करुन घेण्यात आले.

Alipur Fire Incident : केमिकल गोदामांना लागलेल्या आगीत 11 कामगारांचा मृत्यू, 4 जण जखमी

दिल्ली : दोन केमिकल गोदामांना लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झालेत. मृतांना बाबू जगजीवन राम रुग्णालयात तर चार जखमींना राजा हरीश चंद्र रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. मृत व्यक्तींची ओळख अद्याप पटलेली नसल्याचे अग्निशमन विभागाने स्पष्ट केले आहे.

Live Update
Alipur Fire Incident : पेंट फॅक्टरीला भीषण आग; 11 कामगारांचा होरपळून मृत्यू, चारजण जखमी

Bharat Jodo Nyay Yatra : राहुल गांधींच्या नेतृत्वात निघालेली काँग्रेसची न्याय यात्रा आज उत्तर प्रदेशात

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेली मणिपूर ते मुंबई भारत जोडो न्याय यात्रा आज (शुक्रवारी) उत्तर प्रदेशात प्रवेश करणार आहे. या यात्रेत काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी सुद्धा सामील होणार आहे. ही यात्रा काँग्रेसचे परंपरागत बालेकिल्ले असलेले अमेठी व रायबरेली या मतदारसंघातूनही जाणार आहे. या यात्रेत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादवही सहभागी होणार आहेत.

Allahabad High Court : 'ज्ञानवापी'ची 28 फेब्रुवारीला सुनावणी, मशीद समितीची उच्च न्यायालयात याचिका

वाराणसी : ‘ज्ञानवापी’च्या तळघरात पूजा करण्यासाठी दिलेल्या परवानगीच्या विरोधात ज्ञानवापी मशीद समितीने केलेल्या याचिकेवर २८ फेब्रुवारीला सुनावणी घेण्याचे येथील न्यायालयाने जाहीर केले आहे. वाराणसी जिल्हा न्यायालयाने ३१ जानेवारीला निकाल देताना पूजेची परवानगी दिली होती. मशीद समितीने या निर्णयाविरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयातही याचिका केली आहे.

Shivsena Mahaadhiveshan : कोल्हापुरात आजपासून शिवसेनेचे (शिंदे गट) राष्ट्रीय महाअधिवेशन

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज व उद्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचे (शिंदे गट) पहिलेच राष्ट्रीय महाअधिवेशन होत आहे. यासाठी जवळपास अर्धा डझन मंत्री व नेते उपस्थित राहणार आहेत. शहरात ठिकठिकाणी सुमारे ४० स्वागत कमानी, १०० होर्डिंग्ज, ७०० फलक उभारले आहेत. चौका-चौकात भगवे झेंडे लावून वातावरण निर्मिती करण्यात आली आहे.

Farmers Protest : संयुक्त किसान मोर्चाकडून आज 'भारत बंद'ची हाक

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगेंची तब्येत खालावलीये, अद्याप मराठा आरक्षणावर कोणताही तोडगा नाहीच. शेतकरी संघटनांकडून भारत बंदची हाक देण्यात आलीये. कोल्हापुरात आजपासून शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशन, विधिमंडळ गटात अजित पवारांचं पाठबळ जास्त असल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचाच असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलंय. या शिवाय, राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com