

Latest Silver Rate
esakal
Silver Hits New Record Price : मागच्या काही दिवसांपासून सोने-चांदीचे भाव सातत्याने वाढत आहेत. दरम्यान चांदीच्या भावाने नवा उच्चांक गाठला आहे. चांदीच्या दरात प्रतिकिलो दोन हजार रुपयांनी वाढून २ लाख नऊ हजार रुपये (जीएसटीसह) झाला आहे. चांदीचा भाव बुधवारी २ लाख ७ हजार रुपये होता. जागतिक स्तरावरील घडामोडींमुळे चांदीची मागणी वाढत असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भाव वाढत आहे, परिणामी भारतीय बाजारातही चांदीचे भाव तेजीत असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे.