Video: झोपलेल्या प्रशासनाला जागवण्यासाठी 'हास्य आंदोलन' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

laughter protest

Video: झोपलेल्या प्रशासनाला जागवण्यासाठी 'हास्य आंदोलन'

मध्यप्रदेश: उपोषण, अमरण, उपोषण, रास्ता रोको, जलसमाधी आणि घंटानाद अशा वेगवेगळ्या आंदोलनाची स्वरूपं आपण आज पर्यंत पाहिली असतील. मात्र सध्या चर्चा सुरू आहे ती एका आगळ्या वेगळ्या आंदोलनाची. हे आंदोलन एखाद्या पक्षाचं नव्हतं, तर हे आंदोलन सामान्यांचं आंदोलन होतं. एक स्थानिक रस्ता खराब झाला असल्याने या रस्त्याची डागडूजी करावी ही मागणी घेऊन भोपाळ येथील रहिवाशांनी हास्य आंदोलन केलं.

हेही वाचा: प्रेमासाठी कायपण! पत्नीसाठी बांधलं हुबेहूब ताज महालासारखं घर

आगळ्या वेगळ्या पद्धतीच्या या आंदोलनाच्या माध्यमातून स्थानिक रहीवाशांनी सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनात स्थानिकांनी साखळी करून हास्य आंदोलन केलं. "गेल्या 2 वर्षात 3 कोटी रुपये मंजूर करूनही रस्ता बांधला गेला नाही. आम्ही विरोध केल्यावर काही काम झाले पण नंतर ते थांबवण्यात आले," असे स्थानिक सांगतात.

loading image
go to top