प्रेमासाठी कायपण! पत्नीसाठी बांधलं हुबेहूब ताज महालासारखं घर | Taj mahal | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ताज महाल सारखं घर

प्रेमासाठी कायपण! पत्नीसाठी बांधलं हुबेहूब ताज महालासारखं घर

भोपाळ: ताज महालकडे (Taj Mahal) प्रेमाचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं. बादशहा शाहजानने पत्नी मुमताजवर आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी ताज महाल बांधला. भारतातूनच नाही, तर जगभरातून लोक आग्र्यातील (Agra) ही सुंदर वास्तू पाहण्यासाठी येत असतात. आता मध्य प्रदेशातील एका व्यक्तीने पत्नीसाठी ताज महालची हुबेहूब प्रतिकृती असलेलं घर बांधलं आहे.

आनंद चोक्से यांना ताज महाल बुरहानपूरमध्ये का नाही बांधला ? असा प्रश्न पडायचा. कारण शाहजानची पत्नी मुमताजचा मृत्यू बुरहानपूरमध्ये झाला होता. असं म्हटलं जातं की, ताज महाल सर्वात आधी ताप्ती नदीच्या काठावर बांधण्याची योजना होती. पण पुढे आग्र्याला ताज महाल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. आनंद चोक्से यांनी चार बेडरुमचं बांधलेलं घर हुबेहूब ताज महालची प्रतिकृती आहे.

हेही वाचा: 'देवमाणूस२' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; पहा पहिली झलक

हे घर बांधण्यासाठी आनंद यांना तीन वर्ष लागली. हे घर बांधणाऱ्या इंजिनिअरने सांगितलं की, "ताज महालची प्रतिकृती असलेलं हे घर बांधण्यामध्ये अनेक अडचणी होत्या. खऱ्या ताज महालच्या बांधणीचा मी जवळून अभ्यास केला" त्यांनी नक्षीकाम करण्यासाठी बंगाल आणि इंदोरमधल्या कलाकारांची मदत घेतली. या घरात राजस्थान 'मकराना' ची लादी वापरण्यात आली आहे.

हेही वाचा: 'कबूल, कबूल, कबूल', मलिकांनी मध्यरात्री टाकला बॉम्ब; वानखेडेंची झोप उडणार?

मुंबईतल्या खास कारागिरांनी फर्निचरचं काम केलं आहे. या घरात एक मोठा हॉल आहे. तळमजल्यावर दोन, वरच्या मजल्यावर दोन बेडरुम्स आहे. ध्यानधारणेसाठी विशेष खोली आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे खऱ्या ताज महालप्रमाणे रात्रीच्या अंधारातही हे घर प्रकाशमान दिसतं.

loading image
go to top