

Classroom shooting law college student killed by classmate
Esakal
पंजाबच्या तरनतारन इथं एका लॉ कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थीनीची तिच्याच वर्गमित्राने गोळी झाडून हत्या केलीय. गोळीबारात जखमी झालेल्या विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपी तरुणाने स्वत:वरही गोळी झाडून घेतली. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल केलं आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.