Sukha Duneke Murder : लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली 'सुक्खा'च्या हत्येची जबाबदारी! फेसबुकवर इतरांनाही दिली धमकी

lawrence bishnoi gang Claim responsibility of murdering sukhdool singh Duneke alias sukha in Canada facebook post
lawrence bishnoi gang Claim responsibility of murdering sukhdool singh Duneke alias sukha in Canada facebook post

कॅनडात हत्या झालेला गँगस्टर सुक्खा याच्या हत्येबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगने कॅनेडातील पिनीपेग सिटीत झालेल्या सुखदूल सिंह उर्फ सुक्खा यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. लॉरेन्स बिश्नोई या फेसबुक प्रोफाइलवरून पोस्ट करत या हत्येची जबाबदारी घेण्यात आली आहे. यासोबतच या पोस्टमध्ये इतर गँगस्टर्सना धमकी देखील देण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगने कितीही दूर गेलात तरी पापांची शिक्षा नक्की मिळेल असंही या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

फेसबुक पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?

लॉरेन्स बिश्नोई नावाच्या फेसबुक प्रोफाइलवरून करण्यात आलेल्या पोस्टमध्ये, 'सत श्री अकाल, सर्वांना रामराम... हा सुक्खा दुनिके जो बंबिहा ग्रुपचा इचार्ज असल्याचे सांगत फिरत होता त्याची कॅनेडातील विनिपेग शहरात हत्या झाली आहे. याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई ग्रुप घेत आहे. अमली पदार्थांचं वेसन लागलेला आणि आपलं वेसन पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या पैशांसाठी त्याने अनेक घरे उध्वस्त केली आहेत.

आमचा भाऊ गुरलाल बरार, विक्की मिद्दुखेडा यांच्या हत्येवेळी बाहेर बसून यानेच सर्वकाही केलं. संदीप नांगल अंबिया मर्डर देखील यानेच करायला लावला, त्याला त्याच्या पापांची शिक्षा मिळाली आहे. फक्त एक गोष्ट सांगायची आहे, जे दोघे-तिघे अजूनही राहिले आहेत, शक्य तिथे पळून जा, जगातील कुठल्याही देशात जा. पण आमच्याशी शत्रुत्व करून तुम्ही वाचाल असे समजू नका. कमी-जास्त वेळ लागेल, पण प्रत्येकाला त्यांनी केलेल्या कृत्यांची शिक्षा मिळेल.'

lawrence bishnoi gang Claim responsibility of murdering sukhdool singh Duneke alias sukha in Canada facebook post
Sukha Duneke killed : कॅनडामध्ये पंजाबी गँगस्टर सुखदूल सिंग सुक्खा याची हत्या
lawrence bishnoi gang Claim responsibility of murdering sukhdool singh Duneke alias sukha in Canada facebook post rak94
lawrence bishnoi gang Claim responsibility of murdering sukhdool singh Duneke alias sukha in Canada facebook post rak94

नेमकं झालं काय?

पंजाब येथील रहिवासी असलेला आणि भारतातून फरार होऊन कॅनडात आश्रय घेतलेला गँगस्टर सुखदूल सिंग उर्फ सुक्खा दुनुके याची गुरुवारी कॅनडात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. आरोपी सुक्खा हा खलिस्तानी दहशतवादी अर्शदीप सिंग उर्फ अर्श डाला याचा राइट हँड होता आणि एनआयएच्या वाँटेड लिस्टमध्ये देखील त्याचा समावेश होता.

lawrence bishnoi gang Claim responsibility of murdering sukhdool singh Duneke alias sukha in Canada facebook post
Canada PM : G20 परिषदेमध्येही सुरू होते कॅनडाच्या पंतप्रधानांचे नखरे; नेमून दिलेल्या रुममध्ये राहण्यास दिला नकार - रिपोर्ट

नुकतेच ९ खलिस्तानी दहशतवादी आणि कुख्यात गँगस्टर्सचे नावे समोर आली होती, यामध्ये सुक्खाचे नाव देखील होते. याशिवाय गुरपिंदर सिंग उर्फ बाबा दल्ला, सतवीर सिंग वारिंग उर्फ सॅम, स्नोवर ढिल्लन, लखबीर सिंग उर्फ लांडा, अर्शदीप सिंग उर्फ अर्श डाला, चरणजीत सिंग उर्फ रिंकू बिहला, रमनदीप सिंग उर्फ रमन जज, गगनदीप सिंग उर्फ गगना हठूर यांच्या नावांचा देखील समावेश या यादीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com