अहमदाबाद: कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोई (Lawrence Bishnoi) गुजरातच्या साबरमती मध्यवर्ती कारागृहात (Sabarmati Central Jail) असतानाही नवा कट रचत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऑस्ट्रेलियातून (Australia) पाठवलेली एक महागडी टॉवेल आणि शेव्हर यांसारख्या 'भेटवस्तूंमुळे' सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून, तुरुंग प्रशासनात खळबळ उडाली आहे.