अयोध्या प्रकरण : मुस्लिम पक्षकारांची बाजू मांडणाऱ्या धवन यांच्याबाबत घेतला मोठा निर्णय

पीटीआय
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

- मुस्लिम पक्षकारांचा निर्णय 

- प्रकृतीचे कारण देत उचलबांगडी 

नवी दिल्ली : अयोध्येतील बहुचर्चित रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादात मुस्लिम पक्षकारांची सर्वोच्च न्यायालयामध्ये बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ राजीव धवन यांच्याकडून या खटल्याचे वकीलपत्र काढून घेतले आहे. खुद्द धवन यांनीच आज फेसबुकवरून याची माहिती दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

धवन यांनी पक्षकारांच्या या निर्णयावर स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली असून, आपली प्रकृती बरी नसल्याचे निरर्थक कारण देत आपल्याला या खटल्यापासून वेगळे करण्यात आल्याचा तक्रारीचा सूर त्यांनी आळवला आहे. आता या अनुषंगाने दाखल झालेली पुनर्विचार याचिका अथवा मुख्य खटल्याशी आपला काही एक संबंध राहिलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

प्रत्यक्ष करसंकलनात पाच टक्के वाढ - सीतारामन

"या खटल्यामध्ये "जमियत'ची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ एजाज मकबूल यांनीच आपल्याला या खटल्यापासून वेगळे केले असून, आपणदेखील यावर कसलाही आक्षेप न घेता बाजूला होण्याची तयारी दर्शविणारे पत्र पाठविले आहे. या अनुषंगाने दाखल झालेली पुनर्विचार याचिका अथवा मुख्य खटल्याशी आपला कसलाही संबंध राहिलेला नाही,'' असे धवन यांनी स्पष्ट केले.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे मला या खटल्यापासून दूर केल्याचे संकेत मदानी यांनी दिले आहेत. खरेतर हा शुद्ध मूर्खपणा आहे, ते त्यांचे वकील एजाज मकबूल यांना माझ्या हकालपट्टीबाबत सूचना करू शकतात. मकबूल यांनीही त्यांच्या सांगण्यावरून तसे केले. पण, या सगळ्यासाठी जे कारण पुढे केले जात आहे ते मात्र माझी प्रतिमा मलिन करणारे आणि खोटे असल्याचा आरोप धवन यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केला आहे. 

धक्कादायक पोलिस बलात्कार करत असताना दोघांचा पहारा

धवन यांचा सवाल 

सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येप्रकरणी दिलेल्या ऐतिहासिक निवाड्याच्या अनुषंगाने जमियत-उलेमा-ए-हिंद या संघटनेचे प्रमुख मौ. अर्शद मदानी यांनी पुनर्विचार याचिका सादर केली आहे. आपल्याला मुस्लिम पक्षकारांमध्ये फूट पाडायची नाही. आपण सर्वच पक्षकारांची बाजू न्यायालयामध्ये संयुक्तपणे मांडली. मुस्लिम पक्षकारांनी आधी त्यांच्यातील मतभेद मिटवावेत. माझी प्रकृती खरोखरच बरी नसेल, तर मग मी न्यायालयामध्ये युक्तिवाद कसा केला, असा सवालही धवन यांनी केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lawyer Rajeev Dhawan removed as counsel from the panel in the Ayodhya Ram Mandir case