कर्नाटकाच्या 'या' नेत्याला वाटले नव्हते मंत्रीपद मिळणार

कर्नाटकाच्या 'या' नेत्याला वाटले नव्हते मंत्रीपद मिळणार

बेळगाव - मला मंत्रिपद मिळेल, असे वाटले नव्हते.  माझ्या मंत्रीपदासाठी कोणी प्रयत्न केले आहे, त्याची कल्पना नाही. मध्यरात्री दोन वाजता फोन आला व तुम्हाला उद्या मंत्रीपदाची शपथ घ्यायची आहे, बंगळूरला या, असे कळविण्यात आल्याचे मंत्री लक्ष्मण सवदी यांनी सांगितले.

सवदी यांचा मंत्रीमंडळात समाविष्ट करण्यात आल्यानंतर आज (ता. 21) त्यांचे सांबरा विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांच्याकडे मंत्रीपदाबाबत पत्रकारांनी विचारणा केली.

श्री. सवदी म्हणाले, कार्यकर्ते माझे बलस्थान आहे. पक्ष व कार्यकर्ते यांच्यासाठी काम करतो. पण, पक्ष नेतृत्व मंत्रिपद देऊन मोठी जबाबदारी टाकेल, असे वाटले नव्हते. .

कायमस्वरुपी पुनवर्सन आणि योग्य भरपाई पूरग्रस्तांना देऊन त्यांना परत उभे करण्यासाठी काम करणार आहे. एका कुटुंबाला दहा हजार रुपयांची भरपाई देण्यात येत आहे. तसेच शाळा, महाविद्यालयांना त्रास होऊ नये, या उद्देशाने तात्पुरते शेड निर्माण केले जातील.

- लक्ष्मण सवदी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com