esakal | ४० वर्षानंतर आज केरळमध्ये परंपरा होणार खंडीत

बोलून बातमी शोधा

केरळ निवडणूक

४० वर्षानंतर आज केरळमध्ये परंपरा होणार खंडीत

sakal_logo
By
दीनानाथ परब

तिरुअनंतपुरम: केरळमध्ये मतमोजणी सुरु असून डाव्यांच्या नेतृत्वाखाली LDF आघाडी पुन्हा सत्ता मिळवेल असे चित्र आहे. मागच्या ४० वर्षांपासून केरळमध्ये कुठल्याही आघाडीला सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवता आलेली नाही. पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत केरळमधील ही परंपरा खंडीत होणार असे दिसतेय. मागची चार दशक केरळच्या जनतेने डाव्याच्या नेतृत्वाखाली LDF आणि काँग्रेस प्रणीत UDF ला आलटून-पालटून संधी दिली आहे. पण चार दशकांची ही परंपरा आज खंडीत होईल.

आता जे काही ट्रेंडस आहेत त्यानुसार, LDF आघाडीला ८५ ते ९५ दरम्यान जागा मिळतील असे चित्र आहे. केरळच्या जनतेने पिनाराई विजयन यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. UDF ला ४० ते ५० जागांवर समाधान मानून पुन्हा विरोधी पक्षात बसावे लागेल. भाजपाने केरळमध्ये संघटनात्मक बांधणीवर भर देऊन विविध मुद्दे उचलले. पण प्रत्यक्षात निवडणुकीत भाजपाला त्याचा लाभ झालेला दिसत नाही. भाजपाला केरळमध्ये फक्त १ ते ३ जागा मिळू शकतात.

हेही वाचा: ममता बॅनर्जींना चॅलेंज देणारे सुवेंदू अधिकारी आहेत तरी कोण?

प्रत्येक एक्झिट पोलने सुद्धा असाच अंदाज वर्तवला होता. कन्नूर, कोझीकोडे, थ्रिसूर, पलक्कड आणि तिरुअनंतपुरम या जिल्ह्यामध्ये LDF ला चा प्रभाव कायम आहे. सीपीएमसह त्यांच्या घटकपक्षांनी आपला बालेकिल्ला असलेल्या भागात चांगली कामगिरी केली आहे.

हेही वाचा: क्रिकेटर मनोज तिवारी TMC ला हॅटट्रिक मिळवून देणार

एर्नालकुलम आणि मालाप्पुरम या दोन जिल्ह्यातच UDF ला चांगली कामगिरी करता आली आहे. नीमोम, पलक्कड आणि थ्रिसूर या तीन विधानसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार आघाडीवर आहेत. पण इथे भाजपा उमेदवार आणि प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या आघाडीमध्ये फार कमी मतांचा फरक आहे.