esakal | क्रिकेटर मनोज तिवारी TMC ला हॅटट्रिक मिळवून देणार

बोलून बातमी शोधा

manoj tiwari

क्रिकेटर मनोज तिवारी TMC ला हॅटट्रिक मिळवून देणार

sakal_logo
By
टीम ई सकाळ

देशाचे लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे कल हळूहळू समोर येऊ लागले आहेत. क्रिकेटच्या मैदानात विशेष छाप सोडण्यात अपयशी ठरलेला माजी क्रिकेटर राजकीय मैदानात षटकार मारण्याचे संकेत मिळत आहेत. पश्चिम बंगालमधील शिबपूर मतदार संघातून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार आणि माजी क्रिकेटर मनोज तिवारी आघाडीवर आहेत. या मतदार संघात भाजपच्या तिकीटावर डॉ. रथींद्रनाथ चक्रवर्ती नशिब आजमावत आहेत. शिबपूर विधानसभा मतदार संघ ग्रेटर कोलकाता रिजनचा भाग असून हावडा जिल्ह्यात आहे.

हेही वाचा: Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममतादीदी; भाजपची मुसंडी

1967 मध्ये या जागेवर पहिल्यांदा काँग्रेसच्या उमेदवार विजयी झाला होता. 2011 च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला पहिल्यांदा या जागेवर यश मिळाले. त्यानंतर 2016 मध्ये तृणमूल काँग्रेसला गड राखण्यात यश मिळाले होते. सध्याच्या घडीला तृणमूल काँग्रेसचे जुटू लाहडी हे आमदार आहेत. क्रिकेट मनोज तिवारी विजय मिळवून तृणमूल काँग्रेसची हॅटट्रीक साधणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या मतदार संघात एकुण 10 उमेदावारांमध्ये चुरस असून मनोज तिवारी आघाडीवर आहेत. 294 जागा असलेल्या विधानसभेत बहुमताचा आकडा हा 148 आहे.

  • मनोज तिवारी यांची क्रिकेट कारकिर्द

    मनोज तिवारीने 2008 ते 2015 या कालावधीमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधीत्व केले आहे. 3 फेब्रुवारी 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध गाबाच्या मैदानात त्यांनी वनडे पदार्पण केले होते. 12 वनडेतील 6 डावात 150 धावा करणाऱ्या मनोज तिवारी यांनी झिम्बाब्वे विरुद्ध हरारेच्या मैदानात 14 जूलै 2015 मध्ये अखेरचा वनडे सामना खेळला. 3 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात एकदा बॅटिंगची संधी मिळालेल्या मनोज तिवारीच्या नावे 15 धावांची नोंद आहे. आयपीएलमध्ये त्यांनी 98 सामने खेळले असून यात 85 डावात 1695 धावांची नोंद आहे.