
पावसाळी अधिवेशनदरम्यान राज्यसभेतील विरोधकांच्या कृत्याबद्दल, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व वरिष्ठ सभागृहातील खासदार शरद पवार यांनी आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दिला आहे. राज्यसभेत बुधवारी विरोधी पक्षांच्या महिला खासदारांना झालेल्या धक्काबुक्कीसंदर्भात शरद पवार यांनी अत्यंत कठोर शब्दांत केंद्र सरकारवर टीका केली होती. यासंदर्भात गोयल यांनी, ‘विरोधकांच्या कृतीबद्दल पवारांनी आत्मपरीक्षण करावे’, असे मत मांडले.
पावसाळी अधिवेशन मुदतीआधी गुंडाळण्यापूर्वी राज्यसभेत झालेल्या लज्जास्पद गोंधळामुळे लोकशाहीचे वस्त्रहरण झाले आहे. संसदेची प्रतिष्ठा पार धुळीला मिळविणाऱ्या, महिला मार्शलनाही धक्काबुक्की करणाऱ्या, गोंधळाची परिसीमा गाठणाऱ्या विरोधी पक्षांच्या खासदारांवर राज्यसभाध्यक्षांनी कठोर कारवाई करावी. काँग्रेस व तृणमूलसह विरोधकांना जरा लाज असेल तर त्यांनी देशाची जाहीर माफी मागावी.’’ अशी घणाघाती टीका केंद्र सरकारकडून करण्यात आली. ‘‘ याच गोंधळाच्या मुद्यावरून टीका करणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी झाल्या प्रकाराची खरी माहिती घेऊन स्वतः आत्मपरीक्षण करावे.’’ असे मत राज्यसभेचे सभागृहनेते पीयूष गोयल, संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी, माहिती प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह सात वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी मांडले.
राज्यसभेत बुधवारी गोंधळादरम्यान महिला मार्शल्सना धक्काबुक्की करणाऱ्या विरोधी पक्षीय खासदारांचे व्हिडिओ जाहीर झाल्यानंतर काही मिनिटांतच सर्वश्री गोयल, जोशी, ठाकूर, मुख्तार अब्बास नक्वी, भूपेंद्र यादव, अर्जुन राम मेघवाल, भूपेंद्र यादव, व्ही. मुरलीधरन आदी मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन गोंधळ घालणाऱ्या खासदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी 50 वर्षांच्या राजकीय आयुष्यात विरोधकांकडून झालेले आक्षेपार्ह कृत्य कधी पाहिलेय का? संसदेच्या मालमत्तेचे नुकसान झालेले त्यांनी पाहिले आहे का? विरोधकांनी मार्शलना धक्काबुक्की केली, ते टेबलावर उभे राहून गोंधळ घालत होते, हे पवारांनी पाहिले नाही का? नियमपुस्तक फेकले गेले हे दिसले नाही का? विरोधकांच्या कृतीचे पवार समर्थन करतात का? त्यांनी गोंधळ घालणाऱ्या खासदारांचा निषेध का केला नाही, असे प्रश्न पीयुष गोयल यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केले.त
सुरक्षा संस्थेचेच कर्मचारी
राज्यसभेत त्या वेळी अध्यक्षांच्या आसनाच्या सुरक्षेसाठी कोणीही बाहेरून आणलेले नव्हते व विरोधकांचा याबाबतचा आरोप संपूर्ण खोटा आहे असे सांगून गोयल म्हणाले की, विरोधकांचे एकूण कारस्थान पाहता त्यावेळी सभागृहात १८ पुरूष व १२ महिला सुरक्षा रक्षक होत्या. मार्शल कोणत्याही पक्षाचे नसतात. अध्यक्ष व सदनाची सुरक्षा हे त्यांचे कर्तव्य असते. हे सारे संसदीय सुरक्षा संस्थेचे कर्मचारी आहेत. त्यांना आम्ही नेमलेले नाही. ही संख्या कॅमेऱ्यातून कोणीही पडताळून पाहू शकते. या गोंधळामध्ये महिला मार्शल जखमी झाल्या आहेत व त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संसदेत अराजकता निर्माण करणाऱ्या विरोधी खासदारांवर कठोर कारवाई केलीच पाहिजे अशी आमची मागणी आहे व लोकशाहीची प्रतिष्ठा राखण्यासाठी अशी गुंडगिरी सहन करता कामा नये. गोंधळ घालणाऱ्या विरोधी खासदारांनी खुर्च्या तोडल्या, दरवाजे तोडले, दरवाजांवर लाथा मारल्या.
राजस्थानातील कॉंग्रेस सरकारने एका तासात तब्बल १३ विधेयके गोंधळात मंजूर करवून घेतली होती. यूपीएच्या काळात प्रचंड गोंधळात जी १८ विधेयके मंजूर झाली त्यात २००७ मध्ये सर्वाधिक ११ विधेयकांचा समावेश होता . २०१४ मध्ये यूपीए सरकारने सत्तेवरून जाता जाता मंजूर केलेल्या तेलंगण राज्यानिर्मिती विधेयकाच्या मंजुरीवेळी जो हिंसक गोंधळ झाला तो लोकशाहीचे रक्षण करणारा होता का?
- पीयूष गोयल, केंद्रीय मंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.