‘टीआरएस’आंदोलनाचे शिवसेनेकडे नेतृत्व! - विनायक राऊत

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

कायदा झाल्यावर तीन वर्षांनीही रूळांवर येत नसलेल्या वस्तू व सेवा करापोटी (जीएसटी) राज्यांना मिळणारा न्याय्य वाटा केंद्रातील सरकार देत नसल्याबद्दल विविध राज्यांच्या खासदारांत संतप्त भावना आहे. याच मागणीसाठी आज संसद परिसरात तेलंगण राष्ट्र समितीच्या (टीआरएस) खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. मात्र त्यांचे नेतृत्व करणाऱ्यांत चक्क एक शिवसेना खासदारही असल्याचे दिसून आले! विनायक राऊत हे त्यांचे नाव.

नवी दिल्ली - कायदा झाल्यावर तीन वर्षांनीही रूळांवर येत नसलेल्या वस्तू व सेवा करापोटी (जीएसटी) राज्यांना मिळणारा न्याय्य वाटा केंद्रातील सरकार देत नसल्याबद्दल विविध राज्यांच्या खासदारांत संतप्त भावना आहे. याच मागणीसाठी आज संसद परिसरात तेलंगण राष्ट्र समितीच्या (टीआरएस) खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. मात्र त्यांचे नेतृत्व करणाऱ्यांत चक्क एक शिवसेना खासदारही असल्याचे दिसून आले! विनायक राऊत हे त्यांचे नाव.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

जीएसटीचा मोबदला व कर परताव्याची केंद्राकडून राज्यांना मिळणारी कोट्यवधी रुपयांची रक्कम थकित आहे. ती लवकरात लवकर मिळावी यासाठी ‘टीआरएस’च्या खासदारांनी आज सकाळी कामकाज सुरू होण्यापूर्वी महात्मा गांधी पुतळ्यासमोर घोषणाबाजी केली व केंद्राच्या दिरंगाईचा निषेध केला. याच मागणीसाठी शिवसेना खासदारही आंदोलन करणार असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात फक्त राऊत हेच वेळेवर आंदोलनस्थळी पोचले. त्यांनी सरळ ‘टीआरएस’च्या खासदारांमध्ये जाऊन घोषणाबाजी सुरू केली व एका वेळी तर तेच नेतृत्व करत असल्याचे दिसून आले. काही मिनिटांनी तेथे आलेले धौर्यशील माने वगळता एकही शिवसेना खासदार आंदोलनस्थळी आला नाहीत.

मध्य रेल्वेचं वेळापत्रक बदललं, पाहा पूर्ण वेळापत्रक..

अर्थव्यवस्थेची मंदी लक्षात घेता, यापुढेही महाराष्ट्राला कर परतावा कमी मिळण्याची चिन्हे आहेत. चालू आर्थिक वर्षात केंद्राकडून राज्याला केवळ ५,६३५ कोटींचाच जीएसटी परतावा मिळाला आहे. पूर्ण परतावा मिळाला, तर ठाकरे सरकारला राज्यातील विकासकामांना वेग देता येणे शक्‍य होणार आहे, असे राऊत यांनी नमूद केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leader of TRS movement to Shiv Sena