esakal | मध्य रेल्वेचं वेळापत्रक बदललं, पाहा पूर्ण वेळापत्रक..
sakal

बोलून बातमी शोधा

मध्य रेल्वेचं वेळापत्रक बदललं, पाहा पूर्ण वेळापत्रक..
 • शनिवारपासुन रेल्वेचे  नविन वेळापत्रक लागु
 • लोकलच्या 42 फेऱ्यांच्या वेळात बदल, परेल लोकलमध्ये वाढ 

मध्य रेल्वेचं वेळापत्रक बदललं, पाहा पूर्ण वेळापत्रक..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर  येत्या शनिवारपासुन (14  डिसेंबर) नविन वेळापत्रक लागु होणार आहे. या वेळापत्रकात पहिली कसारा-सीएसएमटी लोकल 34 मिनिटे आधी सुटणार आहे. तसेच लोकलच्या 42 फेऱ्यांच्या वेळात पाच मिनिटांनी बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळे वेळापत्रक सुधारण्यास मदत होणार आहे. तसेच परेल लोकलच्या संख्येत 3 ने वाढ करण्यात आल्यामुळे परेल लोकलची संख्या आता 38 झालेली आहे असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. 

महत्त्वाची बातमी :  मुंबईतील पाण्यात आढळला सर्वात मोठा विषाणू; नाव बॉम्बे व्हायरस..

मध्य  रेल्वेवर दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात नविन वेळापत्रक होते. मात्र यंदा वेळापत्रकास काहीसा विलंब झाला असून, या नविन वेळापत्रकात लोकलच्या फेऱ्या वाढविण्यावर भर न देता लोकलच्या वेळात बदल करुन वेळापत्रकाचा वक्तशीरपणा सुधारण्यावर विशेष भर देण्यात आलेला आहे. वेळा बदलण्यात आलेल्या लोकलमध्ये  कल्याण, कर्जत, टिटवाळा, खोपाली, ठाणे लोकलचा समावेश असल्यामुळे या स्थानकातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. 

महत्त्वाची बातमी :  आदित्य ठाकरेंचा तो 'ड्रीम प्रोजेक्‍ट' डब्यात.. 

12 लोकलच्या गंतव्य स्थानकातील वेळेत बदल

अनेक लोकलच्या गंतव्य स्थानकात देखील बदल करण्यात आलेला आहे. स.11.42 ची सीएसएमटी -कल्याण लोकल आता सकाळी 11.42 वाजता परेल स्थानकातुन कल्याणकरिता सुटणार आहे. बदलापुर-सीएसएमटी रात्री 9 ची लोकल आता रात्री 9 वाजून 8 मिनिटांनी निघणार आहे. ठाणे-कर्जत स. 10.48 ची लोकल सीएसएमटी स्थानकातुन स. 10 वाजता सुटणार आहे. बदलापुर-सीएसएमटी दु.12.22 ची लोकल आता दु.12.20 ला धावणार आहे. कर्जत-ठाणे दु.12.21 ची लोकल दु.12.23 वाजता, अबंरनाथ-सीएसएमटी रात्री 9.15 ची लोकल रात्री 9 वाजून 7 मिनिटांनी सुटणार आहेत. याशिवाय संध्या.6 .48 ची लोकल कल्याण-दादर,स.9 . 54 ची टिटवाळा-ठाणे लोकल, स.11.17 ची कल्याण-दादर लोकल परेल स्थानकापर्यत चालविण्यात येणार आहेत.


           लोकल      -       सध्याची वेळ      -          नविन वेळ

 • कसारा-सीएसएमटी -       प.4.25 वा    -   प.3.51 वा
 • कर्जत-सीएसएमटी  -       प.4.32 वा    -   प.4.28 वा
 • कर्जत-सीएसएमटी  -       प.4.4 वा      - प.4.53वा.
 • टिटवाळा-सीएसएमटी -    प.5.05 वा    -   प.5.11वा
 • ठाणे-सीएसएमटी -          प.5.34 वा     -  प 5 .47 वा
 • ठाणे-सीएसएमटी            प.5.46 वा      -  प.5.56 वा
 • ठाणे-सीएसएमटी           स.6 वा         -  स.6.08 वा
 • सीएसएमटी-कल्याण     स. 7 .56 वा -    स.7.50 वा
 • सीएसएमटी-कुर्ला         स.10.56 वा  -स.11.00वा
 •  सीएसएमटी-ठाणे         स.11.00वा    - स.10.56 वा
 • सीएसएमटी-कुर्ला         स .11.08 वा  -    स.11.12वा
 • सीएसएमटी-ठाणे         स.11.12वा     - स.11.08वा
 • सीएसएमटी- ठाणे         दु.12.50 वा    - दु.12.45 वा
 • सीएसएमटी-अंबरनाथ   दु.12.54 वा   -  दु.12.50 वा
 • सीएसएमटी-कल्याण    दु.12.55 वा   -   दु.12.54 वा
 • कल्याण- सीएसएमटी   दु. 2 .05 वा  -   दु.2.02 वा
 • सीएसएमटी-कसारा      दु. 2.25 वा   -  दु.2.17 वा
 • खोपोली-कर्जत             दु.2.50 वा     दु.2.58 वा
 • सीएसएमटी-कल्याण    दु.2.56 वा    दु.3 वा
 • सीएसएमटी-कर्जत        दु 2.54 वा   दु.2.48 वा
 • सीएसएमटी-आसनगाव   दु.3 वा   दु.3.32वा
 • टिटवाळा-सीएसएमटी     दु.3.05 वा    दु.3.09 वा
 • सीएसएमटी- कल्याण    दु.3.16 वा    दु..3.30वा
 • सीएसएमटी-टिटवाळा    दु..3.20 वा   दु. 3.16वा
 • सीएसएंमटी-खोपोली    दु. 3.22 वा   दु.3.13 वा
 • कर्जत-खोपोली           दु.3.27 वा        दु.3.37 वा
 • सीएसएमटी-टिटवाळा     दु.3.31 वा     दु.3.36 वा
 • सीएसएसमटी-ठाणे     दु 3.36 वा      दु. 3.28 वा
 • सीएसएमटी-कसारा     दु.3.40 वा    दु.3.21 वा
 • सीएसएमटी-कर्जत   दु. 3.53 वा   दु.3.44 वा
 • ठाणे-सीएसएमटी     दु.3 .55 वा    दु.3 .51 वा
 • कल्याण-सीएसएमटी दु.4.32 वा    दु. 4.25 वा
 •  डोबिवली-सीएसएमटी दु. 4 .44 वा     दु.4.39 वा
 • सीएसएमटी-कल्याण     संध्या 6 .08 वा     संध्या 6 .07वा
 • सीएसएमटी-अंबरनाथ      संध्या 6 .53वा     संध्या 6 .57 वा
 • सीएसएमटी-कर्जत        संध्या 7 .31 वा       संध्या 7.30 वा
 • सीएसएमटी- टिटवाळा       संध्या 7 .35 वा   संध्या 7 .45 वा
 • सीएसएमटी-ठाणे       संध्या  7 .45 वा        संध्या  7.38वा
 • कर्जत-सीएसएमटी      रा. 9 .15 वा      रा. 9 .10 वा
 • परेल-कल्याण       रा.9.59 वा  -  रा.10.03 वा