Cylinder Explosion : औरंगाबादमध्ये गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट; आगीत 7 पोलिसांसह 30 जण होरपळले, 10 जण गंभीर जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cylinder Blast in Aurangabad Bihar

आग विझवण्यासाठी पोलिसांनी सिलिंडरवर पाणी टाकताच त्याचा स्फोट झाला.

Cylinder Explosion : औरंगाबादमध्ये गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट; आगीत 7 पोलिसांसह 30 जण होरपळले, 10 जण गंभीर

औरंगाबाद : बिहारमधील औरंगाबादमध्ये (Aurangabad Bihar) गॅस सिलिंडरचा स्फोट (LPG Cylinder) होऊन 7 पोलिसांसह 30 जण दगावले. यापैकी 10 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. शुक्रवारी रात्री अडीच वाजता ही घटना घडली.

नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साहेबगंज परिसरातील प्रभाग क्रमांक 24 मधील अनिल गोस्वामी यांच्या घरी छठ पूजा सुरू होती. घरातील सर्व सदस्य प्रसाद बनवण्यात व्यस्त होते. त्यानंतर अचानक गॅस गळतीमुळं आग लागली. यानंतर परिसरात आरडाओरड झाली आणि परिसरातील नागरिकांनी आग विझवण्यास सुरुवात केली.

हेही वाचा: डोनाल्ड ट्रम्प, कंगना रणौत सारखी लाखो बंद ट्विटर खाती पुन्हा सुरु होणार? Elon Musk नं दिलं स्पष्ट उत्तर

दरम्यान, गस्तीवर असलेले पोलिसांचे पथकही तिथं पोहोचलं. आग विझवण्यासाठी पोलिसांनी सिलिंडरवर पाणी टाकताच त्याचा स्फोट झाला. सध्या जखमींवर सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, यापैकी 10 जणांना चांगल्या उपचारांसाठी रेफर करण्यात आलं आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या सर्वांवर प्राथमिक उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती सामान्य आहे. त्याचबरोबर अशा प्रसंगी सावध राहण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलंय.

हेही वाचा: Elon Musk ला मोठा धक्का! 'जनरल मोटर्स'नं ट्विटरवरील जाहिरातींबाबत घेतला महत्वाचा निर्णय

या अपघातात 7 पोलीस जखमी

महिला कॉन्स्टेबल प्रीती कुमारी, डीएपी अखिलेश कुमार, जगलाल प्रसाद सैफ, जवान मुकुंद राव जगलाल प्रसाद, ड्रायव्हर मोहम्मद मुअज्जम, साहेबगंज परिसरातील नगर परिषद अध्यक्षपदाचे उमेदवार अनिल ओडिया, राजीव कुमार, शबदीर, अस्लम, सुदर्शन, एरियन गोस्वामी, छोटू आलम, अनिल कुमार, शाहनवाज यांच्यासह 30 हून अधिक लोक जखमी झाले. यातील सुमारे 10 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे.