esakal | किमान 50 आमदारांचे इनकमिंग होईल; भाजप नेत्याच्या वक्तव्याने खळबळ
sakal

बोलून बातमी शोधा

bjp

पश्चिम बंगाल भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी बुधवारी मत्री ज्योतिप्रिया मल्लिक यांना आव्हान दिलं की भाजपच्या बूथवरच्या एका नेत्याला तरी तृणमूलमध्ये घेऊन दाखवा.

किमान 50 आमदारांचे इनकमिंग होईल; भाजप नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आता तापत चालले आहे. तृणमूल काँग्रेसची सत्ता असलेल्या बंगालमध्ये भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपच्या दिग्गज नेत्यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये पश्चिम बंगाल दौरा करून ममता बॅनर्जींच्या सरकारवर टीका केली. दरम्यान, आता पश्चिम बंगालच्या भाजप प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या वक्तव्याने राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  

पश्चिम बंगाल भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी बुधवारी मत्री ज्योतिप्रिया मल्लिक यांना आव्हान दिलं की भाजपच्या बूथवरच्या एका नेत्याला तरी तृणमूलमध्ये घेऊन दाखवा. याबाबतचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. मल्लिक यांनी दावा केला होता की जे आमदार भाजपमध्ये गेले होते ते पुन्हा परत येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यावर उत्तर देताना घोष यांनी असा दावा केला. ते म्हणाले की, तृणमूल काँग्रेसचे किमान 50 आमदार पुढच्या महिन्यात भाजपमध्ये येतील.

हे वाचा - धनंजय मुंडे प्रकरणात भाजपची गोची; आरोपांची धार कमी होणार?

दिलीप घोष म्हणाले की, मी मल्लिक बाबूंना आव्हान देतो की त्यांनी आमच्या एका बूथवरच्या नेत्याला त्यांच्या पक्षात घेऊन दाखवालं. त्यांचा दावा मी मान्य करतो. तृणमूलचे किमान 50 आमदार पुढच्या महिन्यात भाजपमध्ये येतील असा दावा घोष यांनी केला. 

मल्लिक यांनी मंगळवारी असं म्हटलं होतं की, जे आमदार तृणमूल काँग्रेस सोडून गेले आहेत ते विधानसभा निवडणुकीआधी पक्षात पुन्हा येतील. सहा ते सात आमदार पक्षात येणार असून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ते तृणमूलमध्ये येतील. तुषार बाबु यांनी कालच पक्षात प्रवेश केला. 

हे वाचा - SC च्या समितीतून एकाचा काढता पाय; शेतकऱ्यांच्या हितासाठी आधीच माघार

भाजपने पश्चिम बंगालमध्ये जास्त लक्ष दिलं असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्यावेळी ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक असलेल्या सुवेंदु अधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्यासह आणखी काही नेतेही भाजपमध्ये गेल्यानं ममता बॅनर्जी यांना धक्का बसला होता. 

loading image