
Thorat Vs Tambe: लोकसभेचे विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका करणाऱ्या सत्यजीत तांबेंना त्यांचे मामा आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी चांगलंच झापलं. आता बालिशपणा सोडा आणि मॅच्युअर व्हा, अशा आशयाचं विधान त्यांनी केलं आहे. त्याचबरोबर आपल्यावरचे उपकार कधीही विसरु नका, असा सल्लाही त्यांना दिला.