G7 PM Modi : यंदाचं G7 शिखर संमेलन कॅनडात १६-१७ जून २०२५ रोजी पार पडणार आहे. पण गेल्या सहा वर्षांत असं पहिल्यांदाच होणार आहे, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर राहणार नाहीत. यामागील धक्कादायक कारणही समोर आलं आहे. कॅनडाकडून अद्याप पंतप्रधानांना संमेलनासाठीचं निमंत्रण आलेलं नाही, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. टाईम्स ऑफ इंडियानं याबाबत वृत्त दिलं आहे.