तरुणांनो हिंसेचा मार्ग सोडा 

पीटीआय
रविवार, 20 मे 2018

रस्ता चुकलेल्या तरुणांनी हिंसेच्या मार्गाचा त्याग करत मुख्य राष्ट्रीय प्रवाहामध्ये यावे, जम्मू-काश्‍मीरमधील तरुणाने हाती घेतलेला एखादा दगड अथवा शस्त्र राज्य आणि देशात अस्थिरता निर्माण करू शकते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. मोदींच्या हस्ते आज येथील 330 मेगावॉट क्षमतेच्या किशनगंगा ऊर्जा प्रकल्पाचे राष्ट्रार्पण झाले त्या वेळी ते बोलत होते. 

श्रीनगर - रस्ता चुकलेल्या तरुणांनी हिंसेच्या मार्गाचा त्याग करत मुख्य राष्ट्रीय प्रवाहामध्ये यावे, जम्मू-काश्‍मीरमधील तरुणाने हाती घेतलेला एखादा दगड अथवा शस्त्र राज्य आणि देशात अस्थिरता निर्माण करू शकते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. मोदींच्या हस्ते आज येथील 330 मेगावॉट क्षमतेच्या किशनगंगा ऊर्जा प्रकल्पाचे राष्ट्रार्पण झाले त्या वेळी ते बोलत होते. 

रमजानच्या पार्श्‍वभूमीवर लष्कराच्या मोहिमांना स्थगिती देण्यात आल्यानंतर आज प्रथमच मोदींनी राज्यातील स्थितीवर भाष्य केले. ते म्हणाले, शांतता आणि स्थैर्याला पर्याय असू शकत नाही. वाट चुकलेल्या तरुणांनी मुख्य प्रवाहात यावे यातच त्यांचे कौटुंबिक सौख्य सामावले आहे. परकी शक्तीच राज्यात अस्थिरता निर्माण करत आहेत. 
 

Web Title: leave the path of violence says modi