positive story: शिक्षकाची नोकरी सोडून सुरु केला पोळ्या विकण्याचा स्टार्टअप, 30 लाखांचा टर्नओव्हर

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 22 November 2020

गुजरातच्या वडोदरात राहणाऱ्या मीनाबेन शर्मा एक खाजगी शाळेत काम करायच्या

गांधीनगर- गुजरातच्या वडोदरात राहणाऱ्या मीनाबेन शर्मा एक खाजगी शाळेत काम करायच्या. पगारही चांगला मिळायचा, पण त्यांचे मन त्या कामात लागायचं नाही. त्या काहीतरी वेगळ करु पाहात होत्या, जेणे करुन त्यांची स्वत:ची अशी ओळख तयार होईल. दोन वर्षांपूर्वी त्यांनी नोकरी सोडून दिली आणि पोळ्या विकण्याचा व्यवसाय सुरु केला. 100 पोळ्यांपासून सुरु करण्यात आलेला त्यांचा व्यवसाय आज 4 हजार पोळ्यांपर्यत पोहोचला आहे. त्यांचा वर्षाचा टर्नओव्हर 30 लाख रुपये आहे. शिवाय त्यांनी अनेक महिलांना रोजगार दिला आहे. 

पगार चांगला होता पण...

वडोदराच्या मुजमहुडा येथे एमडी कॉर्पोरेशन नावाने पोळी बनवून विकण्याला सुरुवात केलेल्या मीनाबेन यांनी पोस्ट ग्रेजुएशन केले आहे. त्या दोन वर्षांपूर्वी एका खाजगी शाळेत शिकवायच्या. काही दिवसानंतर त्यांचे कामात मन लागेणासे झाले. त्यांनी असा विचार केला की काहीतरी असं केले पाहिजे, जेणे करुन सेल्फ डिपेंडन्ट होता येईल आणि दुसऱ्या महिलांनाही रोजगार देता येईल. 2018 मध्ये वडोदरा जिल्हा उद्योग केंद्रातून PMRY योजनेअंतर्गत त्यांनी 7 लाख रुपयांचे लोन घेतले आणि व्यवसाय सुरु केला. 

Corona Update : अदर पुनावालांनी सांगितली, चांगली व्हॅक्सिन कोणती?

मीनाबेन सांगतात की, ''पोळी सगळ्यांच्याच घरी बनते. गुजरातमध्ये राईस कमी आणि पोळी जास्त खाल्ली जाते. पण, पोळीचा व्यवसाय खूप कमीजण करतात. थोडा रिसर्च केल्यानंतर कळालं की पोळ्यांचा व्यवसाय केला जाऊ शकतो. 2018 मध्ये व्यवसाय सुरु केला तेव्हा 100 पोळ्यांनी सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू ऑर्डर वाढत गेल्या आणि व्यवसाय वाढला.''

आज दररोज 4 हजार पोळ्यांचा सप्लाय केला जातोय, असं मीनाबेन सांगतात. त्यांच्या यूनिटमध्ये 10 महिला कामाला आहेत. मीनाबेन यांनी 2 पोळ्या बनवण्याच्या मशीन घेतल्या आहेत. यामुळे त्या सेल्फ डिपेंडन्ट झाल्या असून त्यांनी महिलांना रोजगारही दिला आहे. एका रोटीची किंमत 1.70 रुपये आहे. मिनाबेन यांनी आता पराठे बनवण्यासही सुरुवात केली आहे, यामुळे त्यांचा व्यवसाय अधिक वाढत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leaving teachers job started poli selling startup turnover reached rs 30 lakh