Crime News: महिला लेक्चररवर कॉलेजमध्येच पतीचा चाकू हल्ला; विद्यार्थी धावले अन्... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Crime News: महिला लेक्चररवर कॉलेजमध्येच पतीचा चाकू हल्ला; विद्यार्थी धावले अन्...

हैद्राबाद - मागील काही दिवसांत महिला अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. श्रद्धा वालकर हत्येचं प्रकरण ताजे असतानाच हैदराबादमधील एका लेक्चररवर तिच्या पतीने कॉलेज कॅम्पसमध्ये चाकूने हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली. (Crime news in Marathi)

हेही वाचा: Ketaki Mategaonkar: विश्वास ठेवा पण.. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणावर केतकीची पोस्ट

हैदराबादमधील येथील अनंतपूर कला महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये आज एका महिला लेक्चररवर तिच्या पतीने चाकूने हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पीडित महिला कॉमर्सची लेक्चरर म्हणून काम करते. वाणिज्य विभागाच्या मैदानावरच महिलेवर हल्ला करण्यात आला.

महिलेचा पती पेरेस याने चाकूने आपल्या पत्नीवर हल्ला केला. जेव्हा हल्ला करण्यात आला तेव्हा त्यांनी आरडाओरडा केला, तेव्हा विद्यार्थ्यांनी धावून येत आरोपी पतीला पकडले. त्यानंतर आरोपीला 3 टाऊन पोलिस स्टेशनच्या पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

हेही वाचा: लेकीला पाठीवर घेवून सैन्यातील जवानाप्रमाणे 'ही' आई चालतेय भारत जोडो यात्रेत; कारण....

दरम्यान पीडित महिला आणि तिचा पती गेल्या एक वर्षापासून वेगळे राहत आहेत. महिलेने याआधीच पतीविरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. तसेच आधीच पतीकडे घटस्फोट मागितला आहे..