लेकीला पाठीवर घेवून सैन्यातील जवानाप्रमाणे 'ही' आई चालतेय भारत जोडो यात्रेत; कारण....

Bharat Jodo
Bharat Jodo

अकोला - काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या अकोल्यात दाखल झाली आहे. या यात्रेत अनेक लोक सहभागी होत आहे. याच यात्रेत सहभागी झालेल्या आईचा व्हिडीओ समोर आलं आहे. विशेष म्हणजे ही आई आपल्या दोन लोकरांना घेऊन सैन्यातील जवानाप्रमाणेच भारत जोडो यात्रेत चालत आहे. Bharat Jodo Yatra news in Marathi

Bharat Jodo
MPSC Exam Result: पीएसआयच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, पाहा संपूर्ण यादी

एकीकडे भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल होताच या यात्रेवर टीकेची झोड उठवली जात आहे...या यात्रेवरुन राज्यातील राजकारण चांगलचं तापलंय, तर दुसरीकडे या यात्रेत अनेक लोक सहभागी होताना पाहायला मिळत आहे. या यात्रेत अशीच एक महिला आपली दोन मुलं घेऊन चालतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

हेही वाचा Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

पाठीवर आपली छोटीशी लेक, आणि सोबत चालणारा मुलगा भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. या महिलेचं नाव आहे ओजस असून त्या गेल्या काही दिवसांपासून या पदयात्रेत आपल्या मुलांना घेवून चालत आहे. ओजस ह्या मूळच्या वर्धा येथील सेवाग्रामच्या आहेत. या यात्रेत सहभागी होण्याचा मुख्य उद्देश त्यांनी सांगितला.

Bharat Jodo
Veer Savarkar : उद्धव ठाकरेंनी चूक सुधारली असेल तर…; चंद्रकांत पाटलांचं विधान

या भारत जोडो यात्रेचा राजकीय उद्देश अनेकांचे वेगळे असू शकतात.. परंतु आपल्या चिमूकल्या मुलांना घेवून भारताच्या भ्रमंतीसाठी निघालेल्या या आईचा उद्देश आपल्या मुलांप्रति प्रामाणिक असल्याचं यातून दिसून येतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com