
भारत सरकारने उघड नाराजी व्यक्त केल्यानंतर व्हॉट्सॲप या मेसेजिंग ॲपने प्रस्तावित गोपनीयता धोरणाबाबत सावध भूमिका घेतली आहे. या धोरणामुळे लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून तो दूर करण्यासाठी कंपनी काम करते आहे. लोकांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आम्ही तयार आहोत, असे कंपनीकडून सांगण्यात आले.
नवी दिल्ली - भारत सरकारने उघड नाराजी व्यक्त केल्यानंतर व्हॉट्सॲप या मेसेजिंग ॲपने प्रस्तावित गोपनीयता धोरणाबाबत सावध भूमिका घेतली आहे. या धोरणामुळे लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून तो दूर करण्यासाठी कंपनी काम करते आहे. लोकांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आम्ही तयार आहोत, असे कंपनीकडून सांगण्यात आले. केंद्र सरकारने व्हॉट्सॲपच्या गोपनीयता धोरणाला आक्षेप घेत कोणत्याही स्थितीमध्ये त्याची अंमलबजावणी केली जाऊ नये असे म्हटले होते. हे नवे धोरण आम्हाला अस्वीकारार्ह असल्याचेही सरकारकडून सांगण्यात आले होते.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
नव्या धोरणाच्या माध्यमातून लोकांना अधिक पारदर्शक सेवा देण्याबरोबरच उद्योगांसाठी नवे पर्याय उपलब्ध करून देण्यावर आमचा भर राहणार आहे. या नव्या धोरणामुळे आमची डेटा शेअरिंगची क्षमता वाढणार नाही पण त्याचा उद्योजक आणि ग्राहकांना मोठा फायदा होईल असे कंपनीने म्हटले आहे. व्हॉट्सॲपकडून खासगी संदेशांची गोपनीयता नेहमीच कायम ठेवली जाते.
भारत-अमेरिका मैत्रीचं नवं पर्व; PM मोदींचा US राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना खास संदेश!
त्यामुळे व्हॉट्सॲप असो की फेसबुक या कंपन्यांना हे मेसेज पाहणे शक्य होत नाही, असेही कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. तत्पूर्वी इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने व्हॉट्सॲपचे सीईओ विल कॅथकार्ट यांना पत्र लिहिताना नाराजी व्यक्त केली होती.
Edited By - Prashant Patil