Assam Flood : आसाममध्ये जनजीवन विस्कळित; २१ जिल्हे पूरग्रस्त, दोन लाख जणांना फटका

आसाममधील पूरस्थिती आणखी गंभीर झाली असून पूरग्रस्त जिल्ह्यांची संख्या २१ झाली आहे.
Brahmaputra River Water Level
Brahmaputra River Water Levelsakal

गुवाहाटी - आसाममधील पूरस्थिती आणखी गंभीर झाली असून पूरग्रस्त जिल्ह्यांची संख्या २१ झाली आहे. या जिल्ह्यांमधील सुमारे १.९० लाख लोकांना त्याचा फटका बसला आहे. गेल्या चोवीस तासात एकाचा मृत्यू झाला आहे. पर्वतीय भागात सतत पाऊस पडत असल्याने राज्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

पाणीपातळी वाढल्याने ब्रह्मपुत्रा नदीवरची गुवाहाटी आणि जोरहाटच्या निमतीघाट नौकासेवा निलंबित केली आहे. आसाम राज्य आपत्कालीन व्यवस्थापनाने (एएसडीएमए) दिलेल्या माहितीनुसार, शिवसागर जिल्ह्यातील डेमो येथे एक जणाचा मृत्यू झाला आहे.

त्यामुळे यावर्षी पुरामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या पंधरावर पोहोचली आहे. आसामच्या १७ जिल्ह्यांत पूरजन्य स्थिती होती. ही संख्या आता २१ झाली आहे. पुराचा सर्वाधिक फटका लखीमपूर जिल्ह्याला बसला आहे. धेमाजी जिल्ह्यातील ४०,९९७ जणांनाही पुरामुळे फटका बसला आहे.

राज्यात एकूण साडेचारशे जण मदत छावण्यांत राहत आहेत तर ४५ मदतकेंद्र उभारण्यात आली आहेत. स्थानिक प्रशासन आणि एसडीआरएफच्या पथकाने विविध पूरग्रस्त भागात मदतकार्य राबविले आहे. दिब्रुगड, धुब्री, तेजपूर आणि जोरहाट येथील निमतीघाट येथे ब्रह्मपुत्राने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

पिकांचे नुकसान

आसाममध्ये सध्याच्या पुरामुळे राज्यातील ८०८६.४० हेक्टरवरील पीक नष्ट झाले आहे. तसेच १,३०,५१४ जनावरांना फटका बसला असून त्यात ११,८८६ कोंबड्यांचा समावेश आहे. पावसामुळे आणि पुरामुळे रस्ते, पूल, विजेचे खांब, शाळांसह अन्य पायाभूत सुविधांची बरीच हानी झाली आहे.

त्याचप्रमाणे आसाममध्ये अंतर्गत सुरू असलेली नौका सेवा स्थगित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे येथील अनेक गावांतील शेतांमधील माती मोठ्या प्रमाणात वाहून गेली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com