धार्मिक ग्रंथांची विटंबना केल्यास जन्मठेपेची शिक्षा 

यूएनआय
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

चंडीगड (यूएनआय) : धार्मिक ग्रंथांच्या विटंबनेच्या गुन्ह्यास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याची तरतूद करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता व भारतीय दंड संहितेतील दुरुस्तीस पंजाबच्या मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली. यामुळे राज्यात अशा घटनांवर लगाम घालण्यासाठी व जातीय सलोखा राखण्यासाठी पंजाब सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. 

मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आगामी विधानसभा अधिवेशनात मांडण्यात येणाऱ्या विधेयकांनाही या वेळी मंजुरी देण्यात आली. अधिकृत प्रवक्‍त्याने दिलेल्या माहितीनुसार भारतीय दंड संहितेतील कलम "295 अअ'मध्ये ही दुरुस्ती करण्यात आली आहे. नागरिकांच्या भावना दुखावण्याच्या हेतूने कोणी गुरू ग्रंथसाहिब, भगवत गीता, कुराण व बायबलची विटंबना, नुकसान पोचविल्यास संबंधित आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येईल, असा बदल यात केला आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता (पंजाब दुरुस्ती) विधेयक 2016 आणि भारतीय दंड संहिता (पंजाब दुरुस्ती) विधेयक 2016 हे 2016 मधील 14 व्या विधानसभेच्या 12 व्या सत्रात मंजूर करण्यात आले होते. 2018 मधील पंजाब विधानसभेच्या अधिवेशनात या दोन्ही संहितांमधील बदल करण्याचे सूचित करण्यात आले होते. 

Web Title: Life sentence imprisonment due to irrelevance of religious texts