
"Leaders of the Lingayat community in Karnataka appeal to record identity as Veerashaiva-Lingayat instead of Hindu in the upcoming caste census."
esakal
लिंगायत समाजाने स्वतःची ओळख स्वतंत्र धर्म म्हणून नोंदवण्याचे आवाहन केल्याने कर्नाटकातील राजकीय वातावरण तापले आहे.
या समाजाच्या लोकसंख्येवरून वाद निर्माण झाला आहे.
लिंगायत नेत्यांनी राज्याच्या एकूण लोकसंख्येत १७ टक्के वाटा असल्याचा दावा केला आहे.
Karnataka Lingayat vs Hindu : कर्नाटकात होणाऱ्या सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणाबाबत रविवारी एक नवीन बाब समोर आली आहे. लिंगायत समाजाच्या सर्वोच्च संस्थेने कर्नाटकातील या प्रभावशाली समाजातील लोकांना आगामी सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणात स्वतःची ओळख हिंदू म्हणून नव्हे तर वीरशैव-लिंगायत म्हणून नोंदवावी असे आवाहन केले आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.