Delhi Liquor Policy : आरोग्यमंत्र्यांच्या चौकशीपूर्वीच ED ची 40 ठिकाणी धाड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Liquor Policy ED CBI

दिल्लीतील दारू घोटाळ्याचं राजकारण संपण्याचं नाव घेत नाहीय.

Delhi Liquor Policy : आरोग्यमंत्र्यांच्या चौकशीपूर्वीच ED ची 40 ठिकाणी धाड

दिल्लीत दारू धोरणावरून (Liquor Policy) गदारोळ सुरु असतानाच अंमलबजावणी संचालनालयानं (ED) 40 ठिकाणी छापे टाकले आहेत. तर, हैदराबादमध्ये ही 25 ठिकाणी छापा सत्र सुरू आहे. दारू धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन (Satyendra Jain) यांची आज ईडी चौकशी करणार आहे.

दारू धोरण घोटाळा प्रकरणी विशेष सीबीआय (CBI) न्यायाधीश गीतांजली गोयल (Geetanjali Goyal) यांनी गुरुवारी ईडीला सत्येंद्र जैन यांची चौकशी करण्याची परवानगी दिली होती. आता ED आज त्यांची चौकशी करणार आहे. न्यायालयानं ईडीच्या पथकाला तिहार तुरुंगातच चौकशी करण्यास सांगितलंय. जैन यांच्या चौकशीपूर्वीच ईडीकडून 40 ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत.

हेही वाचा: युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांना मोठा झटका; सरकारनं स्पष्टच सांगितलं, प्रवेश देऊ शकत नाही

6 सप्टेंबरलाही ईडीनं दिल्ली, यूपी, पंजाबसह अनेक राज्यांतील दारू व्यापाऱ्यांच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. गुरुग्राम, लखनौ, हैदराबाद, मुंबई, बंगळुरूसह सुमारे 35 ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. दिल्लीतील दारू घोटाळ्याचं (Liquor Scam) राजकारण संपण्याचं नाव घेत नाहीय. सीबीआय तपासासोबतच भाजप उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही सातत्यानं घेरण्याचा प्रयत्न करत आहे. मनीष सिसोदिया यांच्या घराबाहेर भाजप नेत्यांनी निदर्शनंही केली आहेत.

हेही वाचा: Malegaon : रुग्णांच्या जीवाशी खेळ! मालेगावच्या मुन्नाभाईला अटक; बोगस डॉक्टरचा भांडाफोड

Web Title: Liquor Policy Ed Conducting Searches At 40 Locations In Connection With Excise Policy Case

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..