esakal | लॉकडाऊनमध्ये दारुचे दर वाढले; UP सरकारचा मोठा निर्णय

बोलून बातमी शोधा

Liquor

उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, प्रीमियम ते विदेशी अशा सर्व प्रकारच्या दारुवर १० ते ४० रुपये अतिरिक्त कर लावण्यात आला आहे.

लॉकडाऊनमध्ये दारुचे दर वाढले; UP सरकारचा मोठा निर्णय
sakal_logo
By
वृत्तसंस्था

लखनऊ : कोरोनामुळे उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) लागू करण्यात आलेल्या मिनी लॉकडाउनचा परिणाम सरकारच्या तिजोरीवरही होताना दिसत आहे. सरकारला मिळणाऱ्या महसूलात घट होत चालल्याने योगी आदित्यनाथ सरकारने (Yogi Adityanath) एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने दारुच्या दरात (Liquor) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दारुच्या किंमतीवर सरकारने कोरोना उपकर (Corona Cess) लावला आहे. (liquor prices to go up in UP due to Corona Cess)

हेही वाचा: 18 दिवसांनी पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकल्या

उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, प्रीमियम ते विदेशी अशा सर्व प्रकारच्या दारुवर १० ते ४० रुपये अतिरिक्त कर लावण्यात आला आहे. लॉकडाउनमुळे सरकारला पैशाची चणचण भासू लागली आहे. दारुच्या प्रकारानुसार सेस आकारण्यात येत आहे. प्रीमियम दारुसाठी प्रति ९० मिलीवर १० रुपये, सुपर प्रीमियमसाठी २० रुपये, स्कॉचसाठी ३० रुपये तर परदेशातून आयात केलेल्या दारुवर ४० रुपये कोरोना सेस आकारण्यात येत आहे. यासंबंधीचा आदेश सोमवारी (ता.३) जारी करण्यात आला आहे.

हेही वाचा: बिल-मेलिंडा गेट्स विभक्त; 27 वर्षांच्या संसारानंतर घेतला निर्णय

दरम्यान, आर्थिक वर्ष २०२१-२२ सुरू होताच सरकारने दारुच्या किंमती वाढविल्या होत्या. परदेशातून आयात करण्यात येणाऱ्या स्कॉच, वाइन, व्हिस्की, वोडकासहित अन्य प्रकारच्या दारूवरील परमिटचे दर वाढविण्यात आले होते. १ एप्रिलला उत्पादन शुल्क विभागाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, उत्तर प्रदेशमध्ये परदेशी दारुच्या दरात १५ ते २० टक्के वाढ करण्यात आली होती. बिअरचे दर १० ते २० रुपयांपर्यंत कमी केले होते. २१ वर्षाखालील कोणतीही व्यक्ती दारुची खरेदी करू शकत नाही, असेही या आदेशात म्हटले होते.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.