मनीष सिसोदियांनंतर ED कडून आणखी एकावर कारवाई; आतापर्यंत 11 जणांना अटक I Liquor Scam | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arun Ramachandra Pillai Liquor Scam Case

आप नेत्याला पहिले पाच दिवस आणि नंतर दोन दिवस चौकशीसाठी सीबीआय कोठडी देण्यात आली. ही मुदत संपल्यानंतर आज सिसोदिया यांना न्यायालयात हजर करण्यात आलं.

Liquor Scam : मनीष सिसोदियांनंतर ED कडून आणखी एकावर कारवाई; आतापर्यंत 11 जणांना अटक

दिल्ली सरकारच्या कथित अबकारी घोटाळ्याप्रकरणी (Liquor Scam Case) अंमलबजावणी संचालनालयाची (ED) कारवाई सुरू आहे.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या अटकेनंतर आता अंमलबजावणी संचालनालयानं हैदराबादच्या अरुण रामचंद्र पिल्लई (Arun Ramachandra Pillai) नावाच्या व्यक्तीला अटक केलीये.

दिल्ली सरकारच्या (Delhi Government) कथित अबकारी घोटाळ्याप्रकरणी ही 11 वी अटक आहे. अबकारी घोटाळ्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांना 20 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत (दिल्ली तिहार तुरुंग) पाठवण्यात आलं आहे.

दिल्ली न्यायालयानं सोमवारी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अबकारी घोटाळ्याप्रकरणी 20 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सीबीआयनं न्यायालयाला सांगितलं की, आता आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते सिसोदिया यांच्या कोठडीची गरज नाही. सिसोदिया यांना विशेष न्यायाधीश एमके नागपाल यांच्या न्यायालयात हजर करण्यात आलं.

आप नेत्याला पहिले पाच दिवस आणि नंतर दोन दिवस चौकशीसाठी सीबीआय कोठडी देण्यात आली. ही मुदत संपल्यानंतर आज सिसोदिया यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. तत्पूर्वी, सोमवारी न्यायालयानं अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात हैदराबादस्थित चार्टर्ड अकाउंटंट बुचीबाबू गोरांतला यांना सोमवारी जामीन मंजूर केला आहे.