
Unknown Facts : कृष्णभक्तीत तल्लीन या IPS ऑफिसर्सने बक्कळ पगाराची नोकरी सोडली, आज आहेत...
Unknown Facts : नुकताच यूपीएससी परीक्षेचा निकाल लागलाय. या परीक्षेत पास होत आयएस, आयपीएस ही पदं मिळवणं या परीक्षेसाठी मेहनत करणाऱ्या प्रत्येक परीक्षार्थीचं स्वप्न असतं. मात्र या पदावर कार्यरत असणाऱ्या काही अधिकाऱ्यांनी मात्र मिळालेलं पद, प्रतिष्ठा आणि सुविधा सोडून कृष्णभक्ती स्वीकारली.
या अधिकाऱ्यांना पोलिसांच्या नोकरीत रस नव्हता आणि म्हणून ते कृष्णाच्या भक्तीत एवढे तल्लीन झाले की पोलिसांचा खाकी पोशाख सोडून त्यांनी पिवळे वस्त्र धारण केले. काहींनी राधाचे रूप धारण केले तर काही कथाकार बनले. तर दुसरीकडे काहींनी तर कृष्णप्रेमात नावंही बदलली आहेत.आज आम्ही तुम्हाला अशाच काही पोलीस अधिकाऱ्यांबद्दल सांगत आहोत.
भारती अरोरा - भारती अरोरा हरियाणा कॅडरच्या आयपीएस होत्या. भारती या दबंग पोलीस अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. निवृत्तीच्या १० वर्षे आधी २०२१ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. व्हीआरएससाठी पाठवलेल्या पत्रात त्यांनी नोकरी सोडण्याचे असे कारण लिहीले होते की , त्यांना आता चैतन्य महाप्रभू, कबीरदास आणि मीराबाई यांच्याप्रमाणे कृष्णाची पूजा करायची आहे.
डीके पांडा - 1971 च्या बॅचचे यूपी कॅडरचे आयपीएस अधिकारी असलेले डीके पांडा यांचे नावही गणवेशाचा त्याग करून कृष्णाच्या आश्रयाला गेलेल्या पोलिस अधिकाऱ्यामध्ये सामील आहे. त्यांच्या सेवेत ते कृष्णाच्या भक्तीत तल्लीन होऊ लागले, कृष्णाच्या प्रेमात ते असे तल्लीन झाले, की कर्तव्यावर असताना ते स्त्रियांसारखे जगू लागले. त्यानंतर 2005 मध्ये त्यांनी व्हीआरएस घेतली. आता त्यांनी राधाचा अवतार सोडून बाबा कृष्णानंद हे नाव धारण केले आहे.
गुप्तेश्वर पांडे - बिहारचे माजी पोलिस (IPS) डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांचेही नाव या यादीत सामील आहे. सप्टेंबर 2020 मध्ये त्यांनी व्हीआरएस घेतला आणि भक्तीमार्गाला सुरुवात केली. व्हीआरएस घेण्याच्या एक वर्ष आधी 2019 मध्ये त्यांची बिहार पोलिसांच्या डीजीपी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे आता निवेदक आहेत.
कुणाल किशोर - यानंतर कुणाल किशोरचे नाव येते, ज्यांची प्रतिमा देखील दबंग आयपीएस अशी आहे. कृष्णाच्या भक्तीमध्ये मग्न असल्यामुळे त्यांना कामात रस नव्हता आणि ते पाटण्याच्या प्रसिद्ध महावीर मंदिरात सेवेसाठी रूजू झाले. कुणाल किशोर हे संस्कृतचे अभ्यासक असून केएसडी संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरूही राहिले आहेत. (IAS officers)