UPSC अंतर्गत येतात एवढी पदं, प्रत्येकाला मिळतो एवढा पगार अन् सुविधा

यूपीएससी परीक्षा पास करणाऱ्यांना त्यांच्या पदानुसार किती पगार आणि कोणत्या सुविधा मिळतात ते जाणून घेऊया.
POST UNDER UPSC
POST UNDER UPSCesakal

POST UNDER UPSC : सगळ्यात कठीण परीक्षा मानल्या जाणाऱ्या UPSC परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालाय. कठोर परिश्रम घेतल्यानंतर या परीक्षेत इशिता किशोरे हिने प्रथम स्थान तर गरीमा लोहिया हिने दुसरे आणि उमा हराथीत हिने तिसरे स्थान मिळवलेय. स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना लाल बहादुर शास्त्री नॅशनल अॅकेडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन येथे प्रशिक्षणासाठी पाठवले जाते.

तसेच परीक्षार्थींना त्यांच्या ऑल इंडिया रँकनुसार आणि त्यांनी दिलेल्या प्राधान्यानुसार प्रशासकीय पद मिळतं. तेव्हा यूपीएससी परीक्षा पास करणाऱ्यांना त्यांच्या पदानुसार किती पगार आणि कोणत्या सुविधा मिळतात ते जाणून घेऊया.

यूपीएससी अंतर्गत येणाऱ्या या प्रत्येक पदासाठी किती पगार आणि सुविधा मिळतात ते जाणून घेऊया

  • Indian Administrative Service (IAS)

  • Indian Foreign Service (IFS)

  • Indian Police Service (IPS)

  • Indian P & T Accounts & Finance Service, Group 'A'

  • Indian Audit and Accounts Service, Group 'A'

  • Indian Revenue Service (Customs and Central Excise), Group 'A'

  • Indian Defence Accounts Service, Group 'A'

POST UNDER UPSC
POST UNDER UPSC
  • Indian Administrative Service (IAS)


    TA, DA, आणि HRA सारखे भत्ते वगळून IAS अधिकाऱ्याचा सुरुवाती पगार INR 56,100 प्रति महिना आहे आणि तो कॅबिनेट सचिवासाठी INR 2,50,000 पर्यंत पोहोचू शकतो. आयएएस अधिकार्‍यांना ग्रेड पे देखील मिळतो, जो पदानुसार बदलतो.

  • Indian Foreign Service (IFS)

    TA, DA, आणि HRA सारखे भत्ते वगळून IFS ऑफिसरचा सुरुवातीचा पगार 60000 रुपये आहे. पदोन्नतीनुसार तो 2,40,000 पर्यंत पोहोचू शकतो. IFS अधिकाऱ्याचा सर्वोच्च पगार राजदूत किंवा परराष्ट्र सचिव म्हणून मिळू शकतो.

  • Indian Police Service (IPS)

    TA, DA, आणि HRA IPS अधिकाऱ्याचा सुरुवातीचा पगार 56,100 असतो. पदोन्नतीनुसार तो वाढत 2,25,000 हजारापर्यंत जातो.

  • Indian P & T Accounts & Finance Service, Group 'A'

    या पोस्टसाठी गूगल आणि सीव्हील सर्व्हिसेसवर डॉट कॉमवर दर्शवलेल्या आकड्यानुसार 39100 असल्याचे कळते.

POST UNDER UPSC
UPSC Result : युपीएससीमध्ये दोघा नागपूरकरांचा झेंडा; विदर्भातील एकूण पाच उमेदवारांना मिळाले यश
  • Indian Audit and Accounts Service, Group 'A'

    या पोस्टसाठीचा पगार हा पदानुसार बदलतो. या पदासाठी पगाराची सुरुवात 20 हजारापासून ते 90 हजारापर्यंत पदानुसार बदलतो.

  •  Indian Revenue Service

    https://7thpaycommissioninfo.in ने दिलेल्या माहितीनुसार या पदासाठीचा पगार 80000 असतो.

  • Indian Defence Accounts Service, Group 'A'

    7 व्या वेतन आयोगाने शिफारस केल्यानुसार 67000-79000 रुपयांऐवजी 182200-224100 रुपये मूळ मासिक वेतन मिळेल. केंद्राने दिलेल्या या पदोन्नतीमुळे, त्याच पदावरील आयडीएएसच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या मासिक पगाराच्या रूपात सुमारे 20,000 रुपये अधिक मिळतील. (Salary)

POST UNDER UPSC
UPSC Topper मात्र IAS पदाचा राजीनामा देत स्वीकारला 2500 रुपयांचा जॉब अन् आज...

या सगळ्या पदांसाठीच्या सुविधा

या पदांसाठी शासन भरपूर सुविधा उपलब्ध करून देते. अधिकाऱ्यांना राहाण्याची सोय, इलेक्ट्रिसीटी, फोन कॉलचे बिल, घरात कूक इत्यादी सुविधा शासनामार्फत यांना मिळतात.

सहली आणि पॉलिटीकल पॉवर

आयएएस अधिकाऱ्याला फ्लाइटमध्ये पोहोचायला उशीर झाल्यास आणि तो ऑफिशीयल ट्रिपवर असल्यास फ्लाइटला तो येईपर्यंत त्याची प्रतीक्षा करावी लागते. जर तो अधिकृत सहलीवर असेल तर त्याला उशीर झाल्यास फ्लाइटला त्याला बसण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल.

राजनैतिक प्रतिकारशक्ती हा नागरी सेवकाला मिळणारा आणखी एक फायदा आहे. तुम्ही भारताबाहेर कुठेतरी अडकल्यास, तुम्ही भारताचे मुत्सद्दी, जे साधारणपणे IAS किंवा IFS अधिकारी असाल तर कोणीही तुम्हाला अटक करू शकत नाही. (UPSC)

डिस्क्लेमर - वरील पगाराचे आकडे गूगल आणि https://7thpaycommissioninfo.in ने दिलेल्या माहितीनुसार देण्यात आलेले आहे. प्रत्येक वर्षी हे आकडे बदलू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com