UPSC Result : 'हा' घाट चाळे करणाऱ्या कपल्सने नव्हे तर मन लावून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी भरलेला असतो!

एस के झा हे शिक्षक या विद्यार्थ्यांना मोफत शिकवतात.
Patna UPSC
Patna UPSCSakal

नुकताच UPSC चा निकाल लागला. त्यामध्ये देशातल्या जवळपास ९३३ जणांची निवड झाली. या दरम्यान, एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये काही तरुण नदीच्या घाटावर अभ्यास करताना दिसत आहेत.

पटनाच्या गंगा घाटावर गेल्या काही दिवसांपासून दर आठवड्याच्या शेवटी, शेकडो सरकारी नोकरी इच्छुक देशाच्या विविध भागांतून विशेषतः बिहार, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधून स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी येतात. याचं कारण म्हणजे या विद्यार्थ्यांना मोफत वर्ग उपलब्ध करून देणारे शिक्षक, त्यातील बहुसंख्य विद्यार्थी आर्थिक दुर्बल घटकातील आणि राज्यातील दुर्गम भागातील आहेत. (Competitive Exams)

Patna UPSC
UPSC Result : कापड दुकानदाराच्या पोरानं करुन दाखवलं! यूपीएससीत ओंकार गुंडगे देशात 380 वा

या विद्यार्थ्यांना मोफत वर्ग घेणारे एसके झा म्हणाले की, सुमारे १२,०००-१४,००० इच्छुक सध्या त्यांच्या परीक्षेची तयारी करत आहेत. इथं शिकणारे बहुतेक विद्यार्थी रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) आणि कर्मचारी निवड आयोगासाठी (SSC) इच्छुक आहेत.

Patna UPSC
UPSC Result : ‘यूपीएससी’परीक्षेत महाराष्ट्रराज; जाणून घ्या मराठी मुलांची संपूर्ण यादी !

"इथं सर्व विद्यार्थी, नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (NTPC) मधले आहेत, ज्यांनी त्यांची पहिली संगणक-आधारित चाचणी (CBT-1) आधीच उत्तीर्ण केली आहे," एसके झा यांनी ANI ला सांगितलं. एसके झा यांच्याकडे ३०-३५ लोकांची टीम आहे जी परीक्षेच्या तयारीसाठी आठवडाभर अथक परिश्रम करतात.

या विद्यार्थ्यांचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. प्रत्येकजण हा फोटो पाहून विद्यार्थ्यांचं कौतुक करत आहे. तसंच त्यांच्या परिश्रमाचंही कौतुक करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com