Video: खल्लास, काय नाचलीये चिमुकली....

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

एक चिमुकली भारतीय शास्त्रीय संगीतावर काय नाचलीये. खल्लास, चिमुकलीच्या नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटिझन्सनी तिच्या नृत्याला दाद तिली आहे.

पुणे: एक चिमुकली भारतीय शास्त्रीय संगीतावर काय नाचलीये. खल्लास, चिमुकलीच्या नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटिझन्सनी तिच्या नृत्याला दाद तिली आहे.

सोशल मीडियावर अनेकजण आपल्या नृत्याचे व्हिडिओ शेअर करताना दिसतात. अनेकांच्या व्हिडिओंना नेटिझन्सची पसंती मिळताना दिसते. परंतु, या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून अनेकांनी तिचे कौतुक केले आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये चिमुकली भारतीय शास्त्रीय संगीतावर नृत्य करताना दिसत आहे. एवढ्या लहान वयातही तिचे नृत्यकौशल्य थक्क करणारे आहे. विशेष म्हणजे हे नृत्य ती सहजपणे करते आणि तिच्यावर साक्षात सरस्वतीचाच आशीर्वाद असल्यासारखे वाटते. शास्त्रीय नृत्यात चेहऱ्यावर दाखवले जाणरे नवरसातील काही मुद्राही ती करून दाखवते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: little girl dance on classical music video viral on social media