Husband and Wife
Husband and Wife

'7 दिवस पत्नी अन् 7 दिवस प्रेयसीसोबत राहतो'; कराराच्या आधारे कोर्टाने केली आरोपीची सुटका

Husband and Wife: जोडप्यामध्ये झालेल्या कराराच्या आधारावर कोर्टाने एका बलात्काराच्या प्रकरणातील आरोपीची निर्दोष सुटका केली आहे

नवी दिल्ली- इंदौरमध्ये एक चकित करणारं प्रकरण समोर आलं आहे. जोडप्यामध्ये झालेल्या कराराच्या आधारावर कोर्टाने एका बलात्काराच्या प्रकरणातील आरोपीची निर्दोष सुटका केली आहे. करार नेमका काय आहे हे ऐकून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. प्रियकर आणि प्रेयसी यांच्यामध्ये सहमतीने करार झालाय, यात असं ठरवण्यात आलंय की प्रियकर ७ दिवस आपल्या पत्नीसोबत असेल आणि सात दिवस प्रेयसीसोबत असेल.

एका तीन वर्ष जुन्या प्रकरणावर कोर्टाने सुनावणी घेतली. यामध्ये एका व्यक्तीविरोधात महिलेने तक्रार दाखल केली होती. कोर्टात हे प्रकरण आलं होतं. त्यानंतर जोडप्यामध्ये झालेला करार आणि महिलेला व्यक्तीच्या लग्नाबाबत असलेली संपूर्ण माहिती याच्या आधारे कोर्टाने आरोपीची सुटका करण्याचा निर्णय घेतला.

Husband and Wife
Nashik Crime News : सराईत गुन्हेगारांच्या 6 मित्रांची ‘तडीपारी’! पोलीस उपायुक्त चव्हाण यांचा दणका; 52 गुन्हेगारांची तडीपारी

नेमकं काय आहे प्रकरण?

२७ जुलै २०२१ रोजीचे हे प्रकरण आहे. यात एका तरुणीने आपल्या प्रियकराविरोधात भंवरकुआं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बलात्काराची तक्रार केली होती. आरोपी आणि प्रियकर चंद्रभान पंवार याने तिच्यावर बलात्कार केला. तसेच तरुणीचा गर्भपात करवण्यात आला असा आरोप होता. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर दाखल करुन आरोपीला अटक केली होती. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलं.

कोर्टामध्ये सुनावणी सुरु झाली. कोर्टाने सर्व प्रकरण समजून घेतलं. याच दरम्यान कोर्टामध्ये एक करारनामा सादर करण्यात आला. यात म्हणण्यात आलं होतं की, चंद्रभान हा कथित पीडित तरुणीला गेल्या दोन वर्षांपासून ओळखतो. शिवाय अद्याप तो तिच्या संपर्कात आहे. दोघेही एकमेकांसोबत राहण्यास तयार आहेत.

Husband and Wife
Session Court : लैंगिक छळ प्रकरणात माजी पंतप्रधान आणि माजी मुख्यमंत्र्यांचे नाव वापरण्यास बंदी; न्यायालयाचा आदेश जारी

तरुणीला आपल्या प्रियकराच्या पहिल्या पत्नीबाबत माहिती होती. तरी ती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती, असं कोर्टाने मान्य केलं. सर्व माहिती असूनही तरुणीने प्रेमसंबंध कायम ठेवले. गर्भपातानंतरही तरुणी तरुणासोबत होती. त्यामुळे ती त्याच्यासोबत राहण्यासाठी तयार होती असं यातून दिसतं. लैगिक संबंध देखील सहमतीने ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे गर्भपात आणि बलात्कारासाठी तरुणाला दोषी म्हणता येणार नाही, असं कोर्ट म्हणालं.

करारामध्ये असं ठरवण्यात आलंय की, तरुण आपल्या पत्नीसोबत सात दिवस राहील आणि आपल्या प्रेयसीसोबत सात दिवस राहील. करार मान्य करत कोर्टाने तरुणाला दिलासा दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com