कर्नाटकात दोन लाखांपर्यंत कर्जमाफी 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 6 जुलै 2018

कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) सरकारने दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ करण्याची घोषणा करून शेतकरीवर्गाला दिलासा दिला. कर्जमाफीसाठी अर्थसंकल्पात 34 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कर्जमाफीची तूट भरून काढण्यासाठी पेट्रोल, डिझेल, वीज व मद्यावरील सेस वाढविण्यात आला आहे. 

बंगळूर: कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) सरकारने दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ करण्याची घोषणा करून शेतकरीवर्गाला दिलासा दिला. कर्जमाफीसाठी अर्थसंकल्पात 34 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कर्जमाफीची तूट भरून काढण्यासाठी पेट्रोल, डिझेल, वीज व मद्यावरील सेस वाढविण्यात आला आहे. 

अर्थ खाते सांभाळणारे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी आज 2018-19 आर्थिक वर्षासाठी 2,13,734 लाख कोटी रुपयांचा पहिला अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. मात्र, प्राप्तिकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीतून वगळण्यात आले आहे. 

राज्यात इस्राईल पद्धतीने शेती करण्यात येणार आहे. यासाठी 150 कोटींची रक्कम राखून ठेवण्यात आली आहे. कोलार, चित्रदुर्ग, कोप्पळ व गदग जिल्ह्यांत प्रत्येकी पाच हजार हेक्‍टर जमिनीत इस्रायली पद्धतीने शेती करण्यात येईल. केंद्राच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेप्रमाणे रेशीम, कडधान्य, जोंधळा आदी पिकांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

पेट्रोलवरील सेस 30 वरून 32 रुपये करण्यात आला आहे. त्यामुळे कर्नाटकात पेट्रोल 1.14 रुपयाने महागणार आहे. डिझेलवरील सेसही 19 वरून 21 रुपये करण्यात आला आहे. त्यामुळे डिझेल दरात 1.12 रुपये वाढ होणार आहे. घरगुती वीजदरातही प्रतियुनिट 10 ते 20 पैसे दरवाढ करण्यात येणार आहे. वीज वापरावरील करात सहा ते नऊ टक्के वाढ करण्यात येणार आहे. 

 कर्जमाफीसाठी 6500 कोटींची तरतूद 
- इंदिरा कॅंटिनसाठी 211 कोटी रुपयांचे अनुदान राखीव 
- धारवाड कृषी विद्यापीठाला 3 कोटी, शेतात सेन्सर बसविण्यासाठी 5 कोटी अनुदान. 
- इस्राईलच्या धर्तीवर कृषी पद्धतीसाठी 150 कोटी रुपये अनुदान 
- बिदरमध्ये कृषी उत्पादन संरक्षण केंद्र 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loan waiver of Rs 25,000 for farmers with borrowings below Rs 2 lakh