Local leaders Raise Concerns About Shivaji Maharaj Statue : भारतीय सैन्य दलाने काही दिवसांपूर्वी पूर्व लडाखमधील पँगाँग तलावाच्या काठावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केलं होतं. शिवाजी महाराजांचा हा पुतळा शौर्य, दूरदृष्टी आणि अटळ न्यायाचे प्रतीक असल्याचं यावेळी भारतीय सैन्य दलाकडून सांगण्यात आलं. मात्र, आता या पुतळ्यावर स्थानिक नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे विविध चर्चांनाही उधाण आलं आहे.