
स्थानिक उत्पादने जनतेने खरेदी करावीत
अहमदाबाद : भारताला कोणत्याही स्थितीमध्ये स्वावलंबी व्हावेच लागेल त्याला आता थांबता येणार नाही असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील जनतेला स्थानिक पातळीवर तयार करण्यात आलेली उत्पादनेच खरेदी करावी असे आवाहन केले.
देशातील जनतेने पुढील २५ वर्षे देशात तयार झालेली उत्पादनेच खरेदी केल्यास आपल्याला बेरोजगारीसारख्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही असेही त्यांनी नमूद केले. गुजरातमधील मोर्बी येथील भगवान हनुमानाच्या १०८ फूट उंचीच्या भव्य मूर्तीचे मोदींच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अनावरण झाले, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मोदी म्हणाले की, ‘‘ भारताला आता थांबता येणार नाही, आपण जागे असू अथवा झोपलेले पण आपल्याला आहे त्या स्थितीमध्ये थांबता येणार नाही.
सध्या सगळे जग हे आपण कसे आत्मनिर्भर बनू याचाच विचार करत आहे. मी देशातील साधू आणि संतांना आवाहन करू इच्छितो की, त्यांनी लोकांना स्थानिक उत्पादने खरेदी करण्यास सांगावे. ‘व्होकल फॉर लोकल’ हाच आपला मूलमंत्र आहे. आपण घरामध्ये देखील आपल्याच देशातील लोकांनी तयार केलेली उत्पादने वापरायला हवीत. या सगळ्यामुळे लोकांना किती मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळेल याची कल्पनाच केलेली बरे. पुढील २५ वर्षे आपण फक्त स्थानिक उत्पादनेच खरेदी करायला हवीत त्यामुळे आपल्या देशात कुणीही बेरोजगार राहणार नाही.’’
भव्य पुतळा
सौराष्ट्र भागातील मोर्बी येथे परमपूज्य केशवानंदजी यांच्या आश्रमामध्ये भगवान हनुमानाचा हा पुतळा उभारला आहे. हनुमानजी चार धाम प्रकल्पान्वये या पुतळ्याची उभारणी करण्यात आली असून याच शृंखलेतील पहिला पुतळा हा उत्तरेकडे शिमला येथे २०१० मध्ये उभारण्यात आला होता. आता दक्षिणेकडे रामेश्वर येथेही अशाच प्रकारच्या पुतळ्याच्या उभारणीचे काम सुरू आहे.
मोदी म्हणाले
भगवान हनुमंत हे ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ची प्रेरणा
हनुमान समर्पणाच्या माध्यमातून देवांना एकत्र आणतो
ऐक्याचे सूत्रच भारतीय संस्कृतीचा मोठा आधार आहे
देशाच्या स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणाही हनुमानाकडून मिळाली
‘भगवान राम हे सबका साथ, सबका विकास’चे उदाहरण
खोखरा हनुमान धाम येथूनच मला प्रेरणा मिळाली
कच्छमधील पर्यटन विकासाचा मोर्बीलाही मोठा फायदा
Web Title: Local Products Purchased Public Vocal For Local Motto Prime Minister Modi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..